सांतइनेज नाला दुर्घटना; महापौरांची जबानी नोंद

0
122

रविवारी सांतइनेज नाल्यात ‘डी व्हिडींग’ मशीन उलटून घडलेल्या दुर्घटनेसंबंधी काल पणजी पोलिसांनी पणजीचे महापौर सुरेंद्र ङ्गुर्तादो तसेच माजी उपमहापौर बेंतो लॉरेन यांची जबानी नोंदवून घेतली. दोघांनाही पोलिसांनी जबानीसाठी हजर राहण्यास सांगितल्याने त्यांनी काल पणजी पोलीस स्थानकात जाऊन जबानी दिली. दरम्यान, पोलिसांनी विनाकारण आपणाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पोलीस स्थानकात बोलावून घेऊन आपली जबानी नोंदवून घेतली. आपण पणजीचा महापौर असून आपणाला अशी वागणूक द्यायला नको होती, असे ते म्हणाले. दरम्यान, ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी या दुर्घटनेबाबत सुरेंद्र ङ्गुर्तादो यांच्याविरुद्ध पणजी पोलिसात लेखी तक्रार केली होती. पण ती नोंदवून न घेतल्याने त्यांनी काल उत्तर गोवा अधीक्षक उमेश गावकर यांच्यासमोर अपील केले आहे. त्यांनीही तक्रार नोंदवून घेतली नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा रॉड्रिग्ज यांनी दिला आहे.