पार्सेकर षठ्यब्दिपूर्ती समितीतून सुभाष वेलिंगकर यांचा राजीनामा

0
95

भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे गोवा राज्य समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर षष्ठ्यब्दीपूर्ती समारोह समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सुपूर्द केला. कार्यकर्त्यांकडून संपूर्ण गोव्यातून आलेल्या तीव्र आक्षेपांचा आदर करून हा राजीनामा देण्यात आला. भा. भा. सु. मं. च्या २०११-१२ च्या आंदोलनात, गोमंकीय मराठी-कोकणी भाषाप्रेमींना, इंग्रजी प्राथमिक शाळांचे अनुदान आपण सत्तेवर आल्यास रद्द करू, अशा आणाभाका २०१२ च्या निवडणुकीपूर्वी घेऊन सत्तेवर येताच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कोलांटीउडी मारली. आणि चर्चच्या शाळांना अनुदान देण्याचे जे पाप केले, त्याला आताचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचेही भक्कम पाठबळ आहे. २६ जून २०१६ रोजी भाभासुमंने, पुन्हा आंदोलन जून २०१५ मध्ये सूर केल्यास वर्ष पूर्ण झाले. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी तब्बल एक वर्षभर आंदोलन बेदखल तर केलेच, परंतु कोणताही अपराध न केलेल्या हजारो मराठी-कोकणी भाषाप्रेमींना अनेकवेळा रस्त्यावर येण्यास भाग पाडले. एक वर्षभर ज्वलंत प्रश्‍न चिघळत ठेवून ते पर्रीकर सरकारच्या पापात तेवढेच वाटेकरी झाले. या कारणासाठी संपूर्ण गोव्यात मराठी-कोकणी भाषाप्रेमी जनता व हजारो कार्यकर्त्यांच्या मनात जो जनभोक्ष आणि संताप उङ्गाळलेला आहे त्याची वर्षभर तशीच अनुभूति या आठवड्यात मुख्यमंत्री सत्कार समितीवर आपले नाव पाहून आली व स्व-भाषा- द्रोही भाजपा सरकारविरुद्ध कार्यकर्त्यांच्या मनात अगदी खोलवर उमटलेल्या या भावनांचा आदर करून आपण लक्ष्मीकांत पार्सेकर षष्ठ्यब्दीपूर्ती समारोह समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वेलिंगकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. इंग्रजी अनुदान रद्द केल्यावर स्नेहपुनप्रस्थापना करू, असेही या पत्रात नमूद केलेले आहे.