पडत्या काळात कॅसिनोंची मदत झाली ः मुख्यमंत्री

0
117

>>बंद केल्यास चुकीचा संदेश

खाण बंदीच्या काळात कॅसिनोंमुळे राज्याला महसूल मिळाला. शहरातील अनेक व्यापार्‍यांनाही त्याचा ङ्गायदा होत आहे. त्यामुळे कॅसिनो पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यास गुंतवणूकदारांना चुकीचा संदेश जाऊ शकेल, त्यामुळेच विचार करावा लागतो, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकारांकडे बोलताना सांगितले. राज्याच्या पडत्या काळात कॅसिनोंची मदत झाली याचा विसर पडू शकत नाही, असेही ते म्हणाले.
कॅसिनोंवर अनेक गोमंतकीय युवकांना रोजगारही मिळाला आहे.
कळंगुट येथील आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाची आपण पाहणी केली आहे. येत्या गुरुवारी किनारी भागातील १२ ते १३ सरपंचांची बैठक घेऊन वरील प्रकल्पात कशा पद्धतीने कचर्‍यावर प्रक्रिया केली जाईल, याची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आप’ला गृहीत
धरणार नाही ः पार्सेकर

राज्यात विरोधकांनी निर्माण केलेली पोकळी कोणतरी भरून काढणारच. ‘आप’ने त्याचा ङ्गायदा घेतला. आपण कोणत्याही राजकीय पक्षाला गृहीत धरणार नाही. त्यातही आम आदमी पक्षाला गृहीत धरू शकत नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी झालेली आम आदमी पार्टीची सभा यशस्वी झाल्याने काही भाजप नेते या सभेसाठी बाहेरून लोक आणले होते, असे बोलू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.