केजरीवालांनी गोव्याची माङ्गी मागावी ः भाजप

0
135

>>राज्याची बदनामी केल्याचा दावा

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारच्या जाहीर सभेत भाजपच्या कार्य पद्धतीचा
समाचार घेतानाच गोवा अमली पदार्थ व सेक्स यासाठी प्रसिद्ध असल्याचा आरोप करून गोव्याची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांनी गोमंतकीय जनतेची माङ्गी मागावी, अशी मागणी प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी केजरीवालांचा निषेध केला.
केजरीवाल हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. पर्रीकर हे गेली अनेक वर्षे राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्याचा केजरीवाल यांना अधिकार नसल्याचा दावा त्यांनी केला.
कॅसिनोंबाबत
थातूरमातूर कारणे
आपल्या पक्षाने जाहीरनाम्यातील ८५ टक्के आश्‍वासनांची पूर्तता केली आहे. कॅसिनोही
मांडवीतून हटविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही पंचायतींनी हरकत घेतल्याने अडचण निर्माण झाली. जागा उपलब्ध नसल्यानेच कॅसिनो हटविणे शक्य झाले नाही, असे तेंडुलकर एका प्रश्‍नावर म्हणाले.

पंतप्रधानांच्या सभेवरील
खर्चाची आठवण नाही
केजरीवालांच्या सभेसाठी पैसा कोठून आला याची चौकशी करण्याची मागणी तेंडुलकर यांनी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोव्यातील सभेसाठी किती खर्च आला होता, असा पत्रकारांनी प्रश्‍न केला असता आठवत नसल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.
केजरीवाल यांनी भाजपने केलेला भ्रष्टाचार पुराव्यांसह दाखवून द्यावा, असे आव्हानही प्रदेश भाजप अध्यक्षांनी दिले. २०१७ च्या निवडणुकीत कोणत्याही एका मतदारसंघात केजरीवाल यांनी
अनामत रक्कम वाचवावी, असेही आव्हान तेंडुलकर यांनी दिले. पुरावे नसताना केजरीवाल यांनी आरोप करू नयेत, भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी लोकआयुक्तांकडे तक्रारी सादर कराव्यात, असे ते म्हणाले.