‘आप’च्या निमंत्रकांना केजरीवाल यांचे मार्गदर्शन

0
115

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल सकाळी येथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात पक्षाच्या निमंत्रकांची बैठक घेऊन २०१७ च्या निवडणुकीतील रणनिती संबंधी मार्गदर्शन केले.

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या कोणत्या समस्या आहेत. तसेच त्यांना कोणत्या पद्धतीचे प्रशासन हवे, हे समजून घेण्याचा सल्ला दिला. या बाबतीत नागरिकांना बोलते करण्यासाठी निमंत्रकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
मोहल्ला धर्तीवर गोव्यातही काम करण्याची त्यांनी गरज व्यक्त केली. भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आम आदमीशिवाय अन्य पर्याय नाही, हे नागरिकांना कसे पटवून द्यावे यासंबंधी केजरीवाल यांनी मार्गदर्शन केले.