भाभासुमंच्या शिरोडा सभेसाठी कार्यकर्त्यांची जोरदार तयारी

0
91

>>साडेतीन हजार भाषाप्रेमींची उपस्थिती लाभणार

शिरोडा येथे दि. ८ मे रोजी भारतीय भाषा सुरक्षा मंचाची जाहीर सभा संध्याकाळी ४.३० वा. पंचायतच्या पटांगणावर होणार आहे. अल्पसंख्यांकांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना बेकायदेशीररीत्या दिले जाणारे सरकारी अनुदान त्वरित रद्द करण्याची मागणी आणि सरकारचा जाहीर निषेध या सभेत होणार असल्याची माहिती शिरोडा मतदारसंघ प्रमुख मनोज आमशेकर यांनी दिली.
दि. ४ रोजी खास युवा कार्यकर्त्यांची मिरवणूक राजीव गांधी कला मंदिरासमोरून संध्या. ५ वा. सुरू होणार आहे. बेतोडा, निरंकाल, शिरोडा, बोरी येथून फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर मिरवणुकीची सांगता होणार आहे. तसेच दि. ७ रोजी बोरी पंचायत क्षेत्रातील कार्यकर्ते मिरवणूक काढणार आहेत. शिरोडा येथे जाहीर सभेला सुमारे साडेतीन हजार लोकांची उपस्थिती राहणार असल्याचे मनोज आमशेकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत ऍड्. हृदयनाथ शिरोडकर, गुरुदास कारेकर, गोविंद देव व रामदास सराफ उपस्थित होते.