रामचंद्र कामत यांना विद्याधिराज पुरस्कार प्रदान

0
175
पर्तगाळी मठाधीश विद्याधिराज तीर्थ स्वामी श्री. कामत यांना पुरस्कार प्रदान करताना.

पर्तगाळ पैंगीण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या गुरुपीठारोहणाचा ४२ वा वर्धापनदिन सोहळा आणि पर्तगाळी मठ स्थापनेच्या ५४० व्या वर्धापनदिनी देण्यात येणारा २०१४ चा विद्याधिराज पुरस्कार यंदा कामत हॉटेलचे संस्थापक रामचंद्र रंगप्पा कामत यांना काल प्रदान करण्यात आला. पर्तगाळी मठाधिश श्रीमद् विद्याधिराज तीर्थस्वामी महाराजांच्या हस्ते पर्तगाळच्या वटवृक्षाची प्रतिकृती, मानपत्र आणि रोख रु. २५ हजार यावेळी श्री. कामत यांना प्रदान करण्यात आले. याचवेळी मंगळूर येथील प्रसिध्द उद्योजक एस. प्रभाकर कामथ आणि कुमठा येथील गणपती श्रीधर कामत यांना जीवोत्तम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मठ स्थापनेचा ५४० वा आणि गुरू पीठारोहणाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त रामचंद्र कामत यांना वटवृक्षाची प्रतिकृती, मानपत्र आणि रोख २५ हजार रु. पुरस्काराच्या स्वरुपात तर जीवोत्तम पुरस्काराने सन्मानीत केलेल्या कामत आणि गणपती कामत यांना रोख १५ हजार रु. मानपत्र स्वरुपात स्वामीजींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.समाजाच्या हितासाठी कर्तव्यबुध्दीने काम करणार्‍या समाजातील व्यक्तींना दर वर्षी विद्याधिराज आणि जीवोत्तम पुरस्काराने गौरविण्यात येत असते असे सांगून धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी स्वामीजी दरवर्षी चातुर्मास करीत असतात. स्वामीनी कधीच पैशांची याचना केली नाही. समाजाच्या हिताचाच नेहमी विचार केला. देव मंदिराच्या विकासाचा विचार करून संपूर्ण देशभर ३६ मठांचा उध्दार केला. गोवा आणि अन्य स्थळी मिळून एकूण ६६ मंदिरे अकज स्वामींच्या अधिपत्त्याखाली आली आहेत. सत्कर्म स्मरणात ठेवून काम करतानाच समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासारखे काम समाज बांधवांकडून घडावे असे मत आपल्या आशीर्वचनपर भाषणातून स्वामी महाराजांनी व्यक्त केले. पर्तगाळी मठासाठी बनविलेल्या सोनेरी रथाचे स्वामी महाराजांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या रथासाठी साडे चौदा किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. यावेळी रामचंद्र कामत, एस. एस. प्रभाकर कामत आणि गणपती कामत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मिनाक्षी कामत आणि जया कामत यांची इंदिराबाई नायक यानी खणा नारळाने ओटी भरली. पुत्तू पै, के. एन. प्रभू यांनी सत्कार मूर्तीचा परिचय करून दिला. अनिल पै यांनी संचालन आणि मानपत्राचे वाचन केले. यावेळी मठ समितीचे उपाध्यक्ष मोहनदास नायक आणि अन्य सदस्य उपस्थित होते.