भाजपचे जि.पं.साठी २८ उमेदवार जाहीर

0
112

भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीचे आपले २८ उमेदवार काल जाहीर केले. उत्तर गोव्यासाठी १९ तर दक्षिण गोव्यासाठी ९ उमेदवारांची यादी काल भाजपने जाहीर केली. उर्वरित उमेदवारांची यादी नंतर जाहीर करण्यात येणार आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे अशी आहेत.उत्तर गोवा
हरमल- (ओबीसी) अरुण बंधाकर, मोरजी- (महिला) माया लक्ष्मीकांत शेटगांवकर, धारगळ- (ओबीसी) दीपक कळंगुटकर, तोर्से- रमेश सावळ, कोलवाळ- (ओबीसी) गोविंद कुबल, हळदोणा- गोकुळदास हळर्णकर, शिरसई- (महिला ओबीसी) दीक्षा दिलीप कांदोळकर, हणजुण- वासुदेव कोरगांवकर, कळंगुट- शॉन ब्रायन जुझे मार्टिन्स, सुकूर (महिला ओबीसी)- धनश्री दयानंद गडेकर, रेईश-मागुस- रुपेश नाईक, पेन्ह द फ्रान्स- घनश्याम नाईक, ताळगांव- योगेश देसाई, खोर्ली (महिला)- शुभदा कुंडईकर, लाटंबार्से- शिल्पा देऊ नाईक, सर्वण- कारापूर (महिला), अंकिता नावेलकर, पाळी (महिला)- मनिषा मंगलदास गांवस, केरी- गोविंद कोरगांवकर, नगरगांव- राजेश गांवकर.
दक्षिण गोवा
बोरी (ओबीसी)- दीपक नाईक बोरकर, शिरोडा- नागू कवळेकर, (गिरदोली (महिला)- संजना संजीव वेळीप, सावर्डे (महिला)- सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा- गोविंद गांवकर, रिवण (ओबीसी)- नवनाथ नाईक, खोर्ली (अनुसूचित जमाती)- कृष्णा वेळीप, पैंगीण (महिला)- डॉ. पुष्पा अय्या, कुठ्ठाळी- ओलान्सियो सिमोईश.
अनुसूचित जातींना आरक्षण नसल्याबद्दल
पणजीत मोर्चा
जिल्हा पंचायत निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी आरक्षण न ठेवल्याच्या निषेधार्थ काल भारतीय रिपब्लिकन पक्ष व दलित संघटनेने पणजी शहरातून मोर्चा काढला. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते ज्ञानेश्‍वर वारखंडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. दलित संघटना या मोर्चात सहभागी झाली होती. जिल्हा पंचायत निवडणुकीत अनुसूचित जातींना आरक्षण का देण्यात आले नाही यासंबंधी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व राज्यपाल मृदुला सिन्हा यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे दलित संघटनेचे नेते कांता जाधव यानी सांगितले. या निवडणुकीसाठी दलितांना आरक्षण न देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आल्याचे दलित नेते जाधव यांनी सांगितले.