कोपार्डेत बिबट्या जेरबंद

0
119
कोपार्डे-सत्तरीत जेरबंद झालेला बिबटा

कोपार्डे (सत्तरी) येथे गुरुवारी रात्री वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला.
कोपार्डेतील अजय नेवर यांनी आपल्या घरामागे बिबट्याला पाहिले होते तसेच बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला होता. त्यांनी वनविभागाला तक्रार दिली होती. त्यानुसार बुधवारी वनविभागाने त्याच्या घरामागे सापळा लावला होता. गुरुवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास बिबट्या त्या सापळ्यात जेरबंद झाला. त्यानंतर वाळपई वनविभागाला माहिती दिली असता वन अधिकारी जॉन फर्नांडिससह रवी नाईक, नारायण गावस, अभिषेक नाईक, महादेव गावकर व पंकज परवार यानी त्या ठिकाणी जावून बिबट्याची रवानगी बोंडला अभयारण्यात केली. सत्तरीत ठिकठिकाणी बिबट्याचा वापर असून ते पाळीव जनावरांचा फडशा पाडत आहेत.