मीरा कोसंबी यांचे निधन

0
178

प्रख्यात इतिहासकार डी. डी. कोसंबी यांच्या कन्या तथा भारतीय समाजशास्त्राच्या अभ्यासक मीरा कोसंबी यांचे काल संध्याकाळी पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले.मुंबई येथील महिला अभ्यास केंद्राच्या त्या संचालक म्हणून निवृत्त झाल्या होत्या. नागरी समाजशास्त्र आणि महिलांवरील अभ्यासात त्यांचे फार मोठे योगदान आहे. इंग्रजी आणि मराठीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. हल्लीच त्यांचे ‘पंडिता रमाबाई यांचे चरित्र’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यांचा गोव्याशी संबंध होता. २००७ साली त्यांनी डीडी कोसंबी विचार महोत्सवात त्यांनी आपल्या वडिलांच्या योगदानावर व्याख्यान दिले होते. गेल्या वर्षी इंटरनेशनल सेंटरने आयोजित केलेल्या कला आणि साहित्य महोत्सवात त्या सहभागी झाल्या होत्या.