राज्याच्या पर्यटक संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

0
101

शेवटच्या तीन महिन्यात मोठी वाढ
वर्ष एकूण पर्यटक संख्या देशी विदेशी
२०१३ ३१,२१,४७३ २६,२९,१५१ ४,९२,३२२
२०१४ ४०,५८,२२६ ३५,४४,६३४ ५,१३,५९२
मागच्या वर्षी म्हणजेच २०१४ साली गोव्यात येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत २०१४ साली ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पर्यटन खात्याने काल दिली.
२०१४ साली एकूण ४०,५८,२२६ पर्यटक गोव्यात आले. २०१३ साली राज्यात ३१,२१,४७३ पर्यटक आले होते. २०१४ साली राज्यात आलेल्या देशी पर्यटकांची संख्या ३५,४४,६३४ एवढी होती. तर २०१३ साली आलेल्या देशी पर्यटकांची संख्या २६,२९,१५१ एवढी होती.२०१४ साली ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत देशी पर्यटकांत झालेली वाढ ही ६२ टक्के एवढी होती.
२०१४ साली राज्यात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या ५,१३,५९२ एवढी होती. तर २०१३ साली आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या ४,९२,३२२ एवढी होती.
२०१४ च्या शेवटच्या तिमाहीत राज्यात देशी पर्यटकांच्या संख्येत ६२ टक्के एवढी वाढ झाली. या काळात राज्यात आलेल्या देशी पर्यटकांची संख्या १९,७०,७९२ एवढी होती. तर याच काळात राज्यात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या २,३०,८११ एवढी होती.
२०१४ साली विदेशी पर्यटकांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पर्यटन संचालक अमेय अभ्यंकर यांनी म्हटले आहे.
२०१४ साली राज्यात आलेल्या पर्यटकांपैकी १७,०५,७५५ पर्यटक हे भू मार्गाने आले. ७,८६७ जण हे जहाजातून आले. तर ८४,८७५ जण हे चार्टर विमानातून आले.