एफसी गोवा-ऍटलेटिको झुंज रंगणार

0
105
ऍटलेटिको दी कोलकाताविरुध्दच्या आयएसएल लढतीच्या पूर्वसंध्येला यजमान गोवा एफसीच्या खेळाडूनी कसून सराव केला (छाया : गणादीप शेल्डेकर).

स्थानिक एफसी गोवा आणि आघाडीवीर ऍटलेटिको दे कोलकातामधील इंडियन प्रिमियर लीग लढत आज येथील नेहरू स्टेडियमवर (फातोर्डा) होईल. पहिल्या सामन्यातील निसटत्या पराभवानंतर दुसरा सामना अनिणिर्ंत राहिला गोवा संघ तिसर्‍या सामन्यात विजय मिळविण्यास उत्सुक असेल.चेन्नईन एफसीविरुध्द स्वगृहीच्या पहिल्या सामन्यात आक्रमणात सफाईची उणीव भासलेल्या एफसी गोवाने गुवाहाटी येथील दुसर्‍या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुध्द भरीव प्रगती दर्शविली पण बरोबरीच्या एका गूणावर समाधान मानावे लागले. तिसर्‍या सामन्यात विजयी लय साधण्यास उत्सुक असलेल्या गोवा संघाला बहरातील कोलकाता संघाविरुध्द मिळालेल्या प्रत्येक संधीचा लाभ उटविणे क्रमप्राप्त ठरेल.
नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुध्द खेळलेल्या ब्राझिलियन आंद्रे सांतोसने कर्णधार रॉबटर्ं पीरिसच्या साथीत सुंदर समन्वयात आक्रमण तसेच बचावफळीलाही स्थैर्य दिले. रॉबर्ट पीरिस, सांतोस आणि एडगर मार्सेलिनो पाहुण्या संघातील लुइस गार्सिया, बोजां फर्नांडिस आणि जोफ्रे मॉंतेव गोन्झालेझ यांच्या आक्रमक चालीना कसे थोपवितात यावर यजमानांचे भवितव्य अवलंबून असेल. गोलरक्षक जॅन सेडाने नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुध्द सुंदर बचावाचे दर्शन घडविले आणि आज त्याला तेजतर्रार इथिओपियन स्ट्रायकर फिक्रू तेफारा लेमासेला रोखण्यासाठी आणखी सतर्क रहावे लागेल.
आम्ही दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी केली पण मिळालेल्या संधीचा लाभ उठविण्यात यश आले नाही. आक्रमक आणि बचावात सक्षम असलेल्या ऍटलेटिकोविरुध्द आमचे खेळाडू मिळालेल्या संधी हुकविणार नाहीत अशी अपेक्षा बाळगतो, असे एफसी गोवाचे ब्राझिलियन प्रशिक्षक झिको म्हणाले.
सांतोसचा खेळ संतुलित आहे आणि आघाडीला पासेस देण्यात तो किमयागार आहे, असेही ते म्हणाले.
अपराजित ऍटलेटिको दे कोलकाता संघ तीन सामन्यातील सात गुणावर आघाडीवर आहे. अकरा दिवसात तीन समाने खेळावे लागल्याने आपल्या खेळाडूना दुगापतीतून सावरण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याबद्दल कोलकाता संंघाचे प्रशिक्षक अंतोनिओ लोपेझ हबास यांनी नाराजी प्रगटविली. गेवल्या सामन्यात रेड कार्ड मिळालेल्या राकेश महेशच्या अनुपस्थितीत ऍटलेटिको दे कोलकाताला खेळावे लागेल. दिल्ली डायनामोजविरुध्दच्या गेल्या सामन्यात स्नायुदुखीमुणे उत्तरार्धात खेळू न शकलेला लुइस गार्सियाही या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. तथापि रेडकार्ड मुळे तिसरा सामना हुकलेला ब्रोजा फर्नांडिस आज खेळणार असल्याने पाहुण्यांच्या आक्रमणाला बळकटी येईल.
सामन्याच्या सर्व तिकीटा संपलेल्या असल्याने यजमान संघाला पाठिराख्यांची उत्स्फूर्त दाद मिळणार असून या अनुकुलतेत एकसी गोवा संघ आयएसएलमधील पहिला विजय नोंदविल अशी अपेक्षा गोमंतकीय फुटबॉलप्रेमी बाळगून आहेत.