गुणी नेत्याचा अंत

कोरोनाने राज्यात काल आठवा बळी घेतला, तो माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश कुसो आमोणकर यांचा. एक विनम्र, सुसंस्कृत नेता कोरोनाच्या कहरात हकनाक बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाने आधीच धास्तावलेल्या राज्याच्या जनतेला मोठा हादरा देणारा हा मृत्यू आहे यात शंका नाही. आमोणकर गेली काही वर्षे राजकीय विजनवासात होते. त्यांची जागा भरून काढून विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले स्थान भक्कम ... Read More »

डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनाने निधन

माजी आरोग्य मंत्री, तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर (६८ वर्षे) यांचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले. कोरोना विषाणूची बाधा झाल्याने डॉ. आमोणकर यांना कोविड इस्पितळात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. येथे दाखल करण्यापूर्वी डॉ. आमोणकर यांच्यावर एका खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले होते. डॉ. आमोणकर यांनी संयम, चिकाटी व जिद्दीने भाजपच्या कार्याचा गोव्यात विस्तार करण्यासाठी ... Read More »

राज्यात कोरोनाचे नवे ५२ रुग्ण

राज्यात कोरोना विषाणूने आठवा बळी घेतला आहे. माजी आरोग्यमंत्री, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश आमोणकर यांचे कोविड हॉस्पिटलमध्ये काल निधन झाले. दरम्यान, राज्यात नवीन ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४५ झाली आहे. खोली – म्हापसा येथे एक आयसोेलेटेड रुग्ण आढळला आहे. धारबांदोडा, मडगाव, फोंडा, वेर्णा, वाळपई, मंडूर, साखळी, उसगाव, पर्वरी या भागात कोरोना ... Read More »

सध्या तरी मांगूर हिल ‘निर्बंधित क्षेत्र’ः मुख्यमंत्री

मांगूर हिल येथे अजूनही कोरोनाचा फैलाव चालूच आहे. त्यामुळे निर्बंधीत क्षेत्र असलेले मांगूर हिल एवढ्यात अनिर्बंधित क्षेत्र घोषित केले जाणार नाही, पंधरा दिवसांनंतर याबाबत निर्णय घेऊ, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. निर्बंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या मांगूर हिलचा फेरआढावा घेण्यासाठी काल पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. कोरोना ... Read More »

अधिवेशन काळात मंत्री, आमदारांना सुविधा नकोत : सुदिन ढवळीकर

कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचा महसूल आता कमी होत जाणार असल्याने सरकारने येत्या २७ जुलै रोजी जे एका दिवसाचे अधिवेशन होणार आहे. त्यावेळी आमदार, मंत्र्यांना पिण्याचे पाणी सोडल्यास अन्य काही देऊ नये. आमदार मंत्र्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवणही देऊ नये. फक्त पाणी, चहा व कॉफी देण्याची सोय करावी, अशी सूचना मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सभापती राजेश पाटणेकर यांना काल घेतलेल्या ... Read More »

कुवेतमध्ये विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा

>> गोमंतकीय नागरिकांनाही बसणार फटका कुवेत प्रशासनाने विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतल्याने तेथे कार्यरत असलेल्या अनेक गोमंतकीय नागरिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुवेत नॅशनल ऍसेंब्लीच्या न्याय व विधी समितीने विदेशी कामगारांच्या संख्येवर मर्यादा घालणार्‍या मसुदा विधेयकाला मान्यता दिली आहे. त्यामुळे कायद्याची अमलबजावणी सुरू झाल्यानंतर कुवेतमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ७ लाख भारतीय नागरिकांना परतावे लागणार आहे. ... Read More »

चीनचे सैन्य मागे हटले

कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ज्या ठिकाणाहून सैन्य मागे घेण्याचे निश्चित झाले होते, तिथून चीनचे सैन्य, वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे. परंतु सैन्य, वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. या सर्व परिस्थितीवर भारतीय सैन्याचे बारीक लक्ष आहे. संपूर्ण पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जशाप्रकारे स्थिती होती, तीच स्थिती कायम करण्याची भारताची मागणी आहे. ... Read More »

राज्यात ४५ पोलिसांना कोरोना

राज्यातील पोलीस खात्यातील आत्तापर्यंत ४५ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३६ जणांवर कोविड इस्पितळ, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर ९ पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. दक्षिण गोव्यातील ३२ पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. उत्तर गोव्यात एका पोलिसाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तसेच, पोलीस विशेष विभागाने ३, एटीएस विभागाचा १, एससीआरबी विभाग ... Read More »

पु. शि. नार्वेकर, भेंब्रे व देवदत पाटील यांना पुरस्कार

गोवा सरकारचे भाषा पुरस्कार जाहीर झाले असून मराठी साठीचा बा द सातोस्कर भाषा पुरस्कार पु. शि. नार्वेकर यांना,कोकणी साठीचा रवींद्र केळेकर भाषा पुरस्कार उदय भेंब्रे यांना तर संस्कृत साठीचा दुर्गाराम उपाध्ये पुरस्कार देवदत पाटील यांता जाहीर झाला आहे.डॉ सोमनाथ कोमरपंत, दामोदर मावजो व लक्षण पित्रे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे ... Read More »

अनुभवी स्टुअर्ट ब्रॉडची जागा धोक्यात

>> आर्चर, वूडच्या वेगाला मिळू शकते झुकते माप इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाबाहेर बसवले जाण्याची शक्यता आहे. बुधवारपासून हा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. जोफ्रा आर्चर व मार्क वूड या वेगवान गोलंदाजांना जेम्स अँडरसनच्या जोडीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलद मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्यासह अष्टपैलू ख्रिस वोक्स यालादेखील संघात ... Read More »