ब्रेकिंग न्यूज़

अंगण

विकलांगांची माऊली लोकविश्‍वास प्रतिष्ठान

- सौ. लक्ष्मी ना. जोग ‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ ही फक्त शाळा नाही तर कर्णबधीर मुलांसाठी संजीवनी आहे. संस्थेनं १९८१ मध्ये लहानशा भाड्याच्या घरात पहिली ते चौथीपर्यंत निवासी शाळा सुरू केली होती. या इवल्याशा रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या लांबच लांब पारंब्या दूरवर पसरल्या आहेत. लोकविश्‍वास म्हणजे एक शक्ती आहे, सावली आहे आणि लोकविश्‍वास म्हणजे विकलांग मुलांची माऊली आहे! घरात मूल ... Read More »

सावी

- सौ. पौर्णिमा केरकर कशी जगतात माणसे… संघर्ष, अडचणीला कशी सामोरी जातात? त्यांचे परिस्थितीमुळे कोलमडून जाणे, परत नव्याने उभारी घेणे, आयुष्यातील प्रत्येक प्रश्‍नाला भिडणे, त्यावर मात करूनही जगणे, खूप अस्वस्थ करते मन. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं… आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं… आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते… परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ... Read More »

सुट्टीतला आनंद

- सौ. पौर्णिमा केरकर रेतीत रुतलेले खुबे स्वतः पाण्यात बसून काढण्याचे ते असीम समाधान जसे मी अनुभवलेय, तसाच खुबे काढण्याच्या नादातील भरारक, जीवावर बेतलेला प्रसंगही तेवढाच स्मरणात राहिला. त्या प्रसंगाची प्रखरता आजही आठवली की अंगावर क्षणिक काटा उभा राहतो. वाढणारे वय… बदलणारा काळ… वेगवान स्पर्धात्मक जीवनशैली… आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सगळ्याच सुखसोयी हात जोडून दिमतीला असतानाच्या या कालखंडातही मनात सतत एक ... Read More »

नाताळ एक आनंदसोहळा

- फादर डॉ. रॉबर्ट डिसौझा  शांतता, सद्भावना, दया, क्षमा, शांती, परोपकार आदींची शिकवण देणारा नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा साजरा करण्याचा एक आनंदी मुहूर्त… प्रथा आणि परंपरांचं पालन करत साजरा होणारा हा सण प्रत्येक पिढीला जगण्याचा संदेश देत असतो. समाजरचना उत्तम राखण्यासाठी हा संदेश उपयुक्त ठरतो. नाताळनिमित्त सजणारी बाजारपेठ, जाणवणारा खरेदीचा उत्साह आणि हे सूचक संदेश अशा सणाच्या दोन बाजू ... Read More »

आम्ही (बि)घडलो!

- विनायक विष्णू खेडेकर जन्माला आलेला अर्भक म्हणे साधारण अडीच किलोचं असतं. माणसाच्या मृतदेहाचे जळून राहिलेले अवशेष म्हणे जवळजवळ तेवढ्याच वजनाचे शिल्लक राहतात. याचाच अर्थ, माणसांचा भार भूमीला होत नाही, मग तो घडलेला असो वा बिघडलेला. तर भूमीला भार होतो तो सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणीय संतुलन बिघडविणार्‍यांचा. घडतं ते बिघडतं, कधीकधी बिघडता बिघडता घडतं. बिघडणं सब्जेक्टीव्ह असावं अनेकदा. कारण खरी घडत ... Read More »

नावीन्य अनुभवांचे…

- सौ. पौर्णिमा केरकर आयुष्यात त्या-त्या वेळी येणारे क्षण त्याचवेळेला समरसून जगावेत. नपेक्षा सुटून जातात माणसे आयुष्यातून, तसेच निसटून जातात क्षण जगण्यातून. जीवनभराची खंत मात्र मनात ठणकत राहते. आठवण करत राहते- त्याचवेळेला जर तू ती गोष्ट केली असतीस तर…? पौषातल्या पौर्णिमेचे हवेतील गारठा लपेटून झाडाझाडांवर, पाना-दगडा-मातीवर शिंपडलेले प्रसन्न चांदणे… याच वेळेला भोवतालचा परिसरही प्रसन्न, प्रगल्भतेच्या नैसर्गिक-सांस्कृतिक वैभवावर अधिराज्य गाजवल्यासारखाच. स्वतःच्या ... Read More »

राष्ट्रगीताचा मान राखलाच पाहिजे!

- दत्ता भि. नाईक राष्ट्रधर्मापेक्षा दुसरा कोणताही धर्म नाही व राष्ट्रनिष्ठेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही निष्ठा नाही. ज्याच्याकडे राष्ट्रनिष्ठा नाही त्याला जीवननिष्ठा नाही म्हणूनच तो भरकटत कुठेही जात असतो. राष्ट्रगीताचा मान राखणे हे केवळ कायद्याने आपले कर्तव्य ठरत नसून नैतिकदृष्ट्याही ते आपले कर्तव्य आहे, हे सर्वजणांनी ध्यानात ठेवले पाहिजे. साधारणपणे तीस-पस्तीस वर्षांमागे सिनेमाघरात चित्रपट संपल्यानंतर पडद्यावर तिरंगा फडकावून राष्ट्रगीत सादर करण्याची पद्धत ... Read More »

‘ई-कॅश’ला प्रोत्साहन का?

- शशांक मो. गुळगुळे सध्या चलनात आणलेली २ हजार रुपयांची नोट काही कालावधीनंतर चलनातून रद्दबातल करून, त्यानंतर भारतात सर्वात मोठी ५०० रुपयांचीच नोट चलनात राहणार. परंतु केंद्र सरकारने ५०० रुपयांऐवजी सर्वात मोठी १०० रुपयांची नोट चलनात ठेवायला हवी; परिणामी ‘कॅशलेस’ व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर करण्याशिवाय जनतेसमोर पर्याय राहणार नाही. ८ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने डिजिटल व्यवहार वाढावेत म्हणून डिजिटल व्यवहार ... Read More »

तुला देतो ‘ई-पैसा’

india3-angan-1

- डॉ. दीपक शिकारपूर (ज्येष्ठ आयटीतज्ज्ञ) गोवा हे देशातील पहिले ‘कॅशलेस’ राज्य करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन व्यवहारदेखील ‘कॅशलेस’कडे नेण्यासाठी नक्की कोणाला काय व कसे काम करावे लागेल, तंत्रज्ञानाची भूमिका यामध्ये कशी असेल, बँकिंग तंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या सुधारणा कराव्या लागतील, सर्वसामान्यांना मोबाईल तंत्रज्ञानातील कोणत्या गोष्टी शिकाव्या लागतील, ऑनलाईन मनी ट्रान्स्ङ्गरच्या माध्यमातून पूर्णपणे कॅशलेस इकॉनॉमी खरेच शक्य आहे का ... Read More »

आनंद यादव ः मराठी साहित्यातला भूमिपुत्र

anand-yadav6-angan-2

- नारायण महाले मराठी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रणेते अशी ओळख असलेले ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या वाङ्‌मयीन कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त गोषवारा- साहित्यिक म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळाली. सन्मानाचे व प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. ‘झोंबी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. पण साहित्यक्षेत्रातील राजकारणामुळे त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवता आले नाही. २००९ ... Read More »