लेख

म्हादईसाठी कायदेशीर लढाई महत्त्वाची!

– रमेश सावईकर   म्हादईचा पाणीतंटा लवकर सोडविला जाईल म्हणून गोवा सरकारने पुढाकार घ्यायला हवा. आपल्या मागण्यांचा केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. तसेच म्हादईची लढाई जिंकण्यासाठी गोव्याची बाजू भक्कमपणे मांडणारी ‘कायदा टीम’ सज्ज ठेवून हा प्रश्‍न लवकरात लवकर सुटावा म्हणून गोव्याने कार्यतत्पर राहण्याची गरज आहे. तसे झाले तर जीवनदायिनी म्हादईचे रक्षण करण्यात गोव्याला यश मिळेल… ‘म्हादई’ नदी ही गोव्याची जीवनदायिनी आहे. ... Read More »

आषाढी एकादशीची वारी धन्य जाहली पंढरपूरी…!

– रमेश सावईकर श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीत त्यांचे गोजिरे-साजिरे रुप पाहून, देव-भक्त भेटीचा आनंद लुटत धन्य-धन्य होऊन जातात. सुखमय, आनंदी जीवन जगण्याची नवी उर्मी, उमेद, सामर्थ्य हा साक्षात्कारी अनुभवांतून भक्तांना प्राप्त होतो. पंढरपूरच्या तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या पाण्याने अंगअंग न्हाऊन भक्तांचे नैराश्य लोप पावते. पापाचे क्षालन होते आणि या वारीसेवेच्या व्रत आचरणांतून मोक्ष प्राप्ती मिळेल, असा दृढ श्रद्धाभाव भक्तांचे ठायी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ... Read More »

‘फायटर’ महिलांची गरूडझेप!

– हेमंत महाजन(निवृत्त ब्रिगेडियर) देशातील तीन महिला वायुसेनेत लढाऊ विमानांच्या पायलट बनल्या आहेत. सरकारचा या निर्णय सैन्यदलांच्या ङ्गायटर स्ट्रीममध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. आता इतर सशस्त्र दलांमध्येही महिलांना लढाऊ विमानांच्या पायलट म्हणून महिलांना संधी मिळायला हवी… देशात प्रथमच तीन महिला वायुसेनेच्या लढाऊ विमानाच्या पायलट बनल्या आहेत. अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तीन महिलांना ... Read More »

यंदा तरी वाहून जाणारे पाणी रोखूया…

– देवेश कडकडे, डिचोली पाणी वाया घालविणार्‍यांकडून अतिरिक्त शुल्क आकारणे, तसेच शाळेत यावर जागृती करून विद्यार्थ्याला किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे इत्यादी शिकवण दिल्यास बरेच साध्य होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. योग्य नियोजन करून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम मनापासून राबविले नाहीत तर येणारा काळ सर्वांसाठीच कठीण आहे… मानवाच्या गरजांमध्ये ‘पाणी’ ही प्रमुख गरज आहे. निसर्गाचा ... Read More »

आजच्या मुलांची मानसिकता ओळखा…

– देवेश कु. कडकडे (डिचोली) केवळ गुण मिळवले म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ठरते ही धारणाच मुळी चुकीची आहे. नापास झालेली मुलेही समाजात पुढे भरीव कार्य करू शकतात हे सिद्ध झाले आहे. आपल्या मुलांची क्षमता ओळखूनच ती वाढवण्यासाठी आणि क्रियाशील रुप देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी आपल्या मुलांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढायला हवा… आज सगळा समाजच मुलांच्या वाढत्या आक्रमक आणि बेताल वागणुकीमुळे ... Read More »

गावोगावी पाणी वाचवण्याची मोहीम राबवूया

– नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मनकी बात’ या कार्यक्रमात यावेळी जलसंवर्धनाचा विषय मांडला. पावसाच्या पाण्याला वाहून न जाऊ देता ते जमिनीत मुरविण्यासाठी अनेक कल्पनाही त्यांनी त्यात मांडल्या. ‘मनकी बात’ च्या त्या भाषणाचा हा संपादित भाग…. माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपणा सर्वांना नमस्कार. सुट्‌ट्यांच्या काळात अनेक गोष्टी करायचे आपण ठरवतो. कार्यक्रम आखतो आणि ह्या सुट्‌ट्यांच्या काळात हंगाम ... Read More »

नाही तर तेलही जाईल आणि तूपही…

दिगंबर कामत सरकारच्या २००७ ते २०१२ या कार्यकाळात भ्रष्टाचार, अवैध खनिज उत्पादन, मांडवीच्या उरावर बसवलेले जुगारी अड्‌ड्यांचे कॅसिनो, राजकारणातील घराणेशाही आणि अल्पसंख्यकांच्या मतपेढीवर डोळा ठेवून चर्च संस्थेच्या प्राथमिक शाळांना दिलेले एकतर्फी अनुदान या आणि अशा किती तरी अलोकशाही निर्णयांमुळे जनता त्या सरकारला अक्षरशः विटली होती. अनेक बिगरराजकीय संस्था या निर्णयाविरुद्ध दंड थोपटून रस्त्यावर उतरल्या होत्या. याचा फायदा स्वपक्षाच्या फायद्यासाठी घेतला ... Read More »

जिल्हा पंचायत निवडणूकः शोध आणि बोध

– शंभू भाऊ बांदेकर, माजी उपसभापती उत्तर आणि दक्षिण गोवा अशा एकूण ५० जिल्हा पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत उत्तरेत २५ व दक्षिणेत २५ अशा मतदारसंघामध्ये ३९ नवे व ११ जुने चेहरे निवडून आले आहेत. पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायत स्तरावर गोव्यातील ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कोणता पक्ष कुठे आहे याचा शोध प्रत्येक पक्षाला घ्यावा लागणार आहे. पक्ष पातळीवर निवडणूक लढविण्यास कॉंग्रेस पक्षाने सुरुवातीपासून ... Read More »

खाणग्रस्तांचे जीवनमान कसे सुधारेल..?

राज्यात सन २००७ ते २०१२ सालापर्यंत खाणक्षेत्रात बेकायदा व्यवसायाचे जे घोटाळे झाले, त्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने शहा आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाने चौकशी करून आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. बेकायदा खनिज उत्खनन आणि खनिज मालाची निर्यात झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला. तो महसूल वसूल करण्याची जबाबदारी राज्य सरकारने साफ टाळली आहे. बेकायदा ... Read More »

मुकाबला आसाममधील दहशतवादाचा

गेल्या काही वर्षांपासून आसाममध्ये प्रत्येक वर्षी २५० ते ३०० दहशतवादी हे मारले जातात. मध्यंतरी, आसाममध्ये एनडीएङ्गबीच्या (नॅशनल डेमोक्रॅटिक ङ्ग्रंट बोडोलँड) विरुद्ध ऍन्टी टेरेरिस्ट ऑपरेशन करण्यासाठी भारतीय सैन्याला तिथे पाठवण्यात आले आणि त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, ८४ दहशतवाद्यांना पकडण्यात आले आणि १४ दहशतवाद्यांना मारण्यात सैन्याला यश आले आहे. निश्‍चितच ही एक मोठी उपलब्धी म्हणता येईल. पण यामुळे ... Read More »