ब्रेकिंग न्यूज़

अग्रलेख

महागठबंधन ते समझोता

महागठबंधनाच्या कल्पनेपासून सुरू झालेली उड्डाणे अखेर कॉंग्रेसशी मोजक्या जागांसाठीच्या समझोत्यापर्यंत येऊन ठेपली आहेत. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांचा सुरवातीपासून महागठबंधनाच्या कल्पनेला वा इतर पक्षांशी युती करण्यास विरोध होता. पक्षश्रेष्ठींनीही त्यांना पाठबळ दिले असल्याचे एकंदर घडामोडींवरून दिसते. अर्थात, हा निर्णय कितपत शहाणपणाचा ते येणारी निवडणूकच सांगेल, परंतु त्या निमित्ताने पक्षातील या विषयावरील दुफळी स्पष्टपणे जनतेसमोर आली. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सर्वच्या सर्व ... Read More »

वाढती विषमता

दावोसमधील वार्षिक जागतिक आर्थिक परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम इंटरनॅशनल या ख्यातनाम जागतिक बिगरसरकारी संस्थेने एक बॉम्बगोळा फोडला आहे. ‘जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या आठ व्यक्तींपाशी जी संपत्ती आहे, तेवढ्या पैशांत अर्धे जग आपला उदरनिर्वाह करीत असते’ अशा निष्कर्षाप्रत ‘ऑक्सफॅम’ यंदा आली आहे. अशा प्रकारचे अहवाल दरवर्षी येत असतात, परंतु गरीब आणि श्रीमंतांमधील ही दरी एवढी रुंदावल्याचे हे चित्र धक्कादायक आहे. २०१५ च्या ... Read More »

व्यक्तिस्तोम

खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या या वर्षीच्या दिनदर्शिकेवरून महात्मा गांधींचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वापर झाल्याने विरोधकांनी मोठा गदारोळ माजवला आहे. सध्या निवडणुकीचे दिवस असल्याने या वादाला अधिक खतपाणी मिळालेले असले, तरी देखील अशा प्रकारच्या व्यक्तिपूजनाद्वारे कॉंग्रेसच्या राजवटीतील अंधभक्तीचेच अनुसरण या नव्या राजवटीत होणार आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतामध्ये सत्तेवरील राजकारण्यांनी आपापला वैचारिक ... Read More »

कैफियत

सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आपल्याला मिळणार्‍या निकृष्ट नाश्ता व जेवणाविषयी सोशल मीडियावरून आवाज उठवल्याचे प्रकरण ताजे असतानाच सीआरपीएफ म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या आणखी एका जवानाने निमलष्करी दलांना मिळणार्‍या भेदभावाच्या वागणुकीविषयीचा रोष सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. लष्करासारख्याच संवेदनशील जबाबदार्‍या सोपविल्या जात असूनही निमलष्करी दलांना दुय्यम लेखले जाते आणि त्यांना लष्कराप्रमाणे निवृत्ती वेतन, कँटिन सुविधा किंवा वैद्यकीय सुविधा देखील मिळत ... Read More »

गोव्यातील ‘दंगल’!

आगामी राज्य विधानसभा निवडणुकीचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यावेळी विरोधकांशी एकाकी लढत देणार आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांची युती, दुसरीकडे होऊ घातलेली कॉंग्रेस – गोवा फॉरवर्ड – राष्ट्रवादी कॉंग्रेस – युनायटेड गोवन्स यांची संभाव्य युती आणि दिल्लीची पुनरावृत्ती घडवण्याचे स्वप्न पाहणारा आम आदमी पक्ष असा प्रामुख्याने एकंदर सामना असेल ... Read More »

निरोपाचे शब्द

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल आपल्या शहरात – शिकागोत निरोपाचे पहिले भाषण केले. आणखी दहा दिवसांनी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सोडतील आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांची जागा घेतील. पद सोडतानाही ओबामांची व्यक्तिगत लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही हे विशेष आहे. बराक, त्यांची पत्नी मिशेल यांनी आपला आब सदैव राखला. बिल क्लिंटन किंवा बुश यांच्याप्रमाणे आपल्या पदाला काळीमा येऊ ... Read More »

कृतघ्नता

सीमा सुरक्षा दलाच्या २९ बटालियनमधील एक जवान तेजबहादुर यादव याने बीएसएफच्या जवानांना देण्यात येणारा अपुरा नाश्ता आणि निकृष्ट जेवण यावर प्रकाश टाकणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आणि ते व्हायरल होताच संपूर्ण देश त्यामुळे अस्वस्थ झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असले, तरी सीमा सुरक्षा दलाकडून सदर जवानाचेच चारित्र्यहनन सुरू असून त्याच्या तक्रारीला बेदखल करण्याची धडपड ... Read More »

सत्ताकांक्षी मगो

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची गेली पावणे पाच वर्षे सत्तेत साथसोबत करीत आलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षच आज भाजप विरोधात सर्वांत आक्रमकपणे येत्या निवडणुकीत उभा ठाकलेला दिसत आहे. हो, नाही करता करता गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेसारख्या समविचारी मंडळींना आपले पाठबळ देत मगोने या निवडणुकीत प्रथमच आपला राजकीय विस्तार करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. मगो पक्षाची गेली अनेक वर्षे ढवळीकर ... Read More »

थोडी प्रतीक्षा!

गोवा विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे मतदारसंघांमधील वातावरण तापू लागल्याचे दिसते आहे. काही मतदारसंघांमध्ये विविध पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एव्हानाच दिसू लागलेला संघर्ष चिंताजनक आहे. येणारी निवडणूक अटीतटीची ठरणार असली, तरी त्याचे अशा प्रकारचे शारीरिक पातळीवरील पडसाद उमटू नयेत याची काळजी सुरक्षा यंत्रणांना घ्यावी लागेल. गोवा राज्य उत्साही आणि शांततापूर्ण मतदानासाठी प्रसिद्ध आहे. काही मतदानकेंद्रे भले संवेदनशील जाहीर केली ... Read More »

चतुरस्र

ओम पुरी यांच्या निधनाने एक वैविध्यपूर्ण अभिनयाचे पर्व संपले आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि अतिशय गंभीर सामाजिक आशयाच्या चित्रपटांपासून बाष्कळ विनोदपटापर्यंत नानाविध प्रकारच्या भूमिका करून आपल्या अंगभूत कसदार अभिनयगुणांचे दर्शन घडवणारे ओम पुरी हे एक अजब रसायन होते. खरे तर चित्रपटास योग्य नसलेला खडबडीत चेहरा, जाडाभरडा आवाज अशी सगळी व्यंगे असूनही त्या व्यंगांनाच आपली बलस्थाने बनवून त्यांनी अभिनयक्षेत्रात जी भरारी घेतली ... Read More »