बातम्या

अर्थसंकल्प लोकाभिमुख असेल : पर्रीकर

राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यास कमी वेळ मिळाला. त्यामुळे सर्वच गोष्टींचा त्यात समावेश करणे शक्य झालेले नाही. घाईगडबडीत अर्थसंकल्प तयार करावा लागला असला तरी जनतेला लाभ होईल अशा पद्धतीचाच यंदाचा अर्थसंकल्प असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. सर्वसामान्य जनतेवर करांचा भार अधिक पडणार नाही, याची आपल्या सरकारने काळजी घेतली आहे. राज्याच्या विकासावर सरकारने भर दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सरकारचे ... Read More »

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल प्रारंभ झाला. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या छायाचित्रात नवनिर्वाचित सभापती प्रमोद सावंत, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि गोव्याच्या सातव्या विधानसभेचे इतर सदस्य. Read More »

म्हादई ः कर्नाटकाच्या साक्षीदाराची भंबेरी

म्हादई पाणी तंटा सुनावणीवेळी काल ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी कर्नाटकाच्या साक्षीदाराची उलटतपासणी घेताना प्रश्‍नांचा भडीमार करत कर्नाटकाला उघडे पाडले. साक्षीदाराने दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर कोणतीही शहानिशा करण्यात आलेली नाही. तसेच त्या प्रतिज्ञापत्रावर साक्षीदाराने स्वाक्षरीही केली नसल्याचे नाडकर्णी यांनी लवादाच्या निदर्शनास आणून दिल्याने साक्षीदाराची भंबेरी उडाली. यावेळी नाडकर्णी यांनी कर्नाटकाच्या साक्षीदाराच्या वरील बेजबाबदार कृतीवर तीव्र हरकत घेतल्यानंतर लवादाने हा मुद्दा उचलून धरला. कर्नाटकाच्या ... Read More »

प्रमोद सावंत यांची सभापतीपदी निवड

भाजपचे उमेदवार आमदार डॉ. प्रमोद सावंत यांची काल सभापतीपदी २० विरुद्ध १५ मतांनी निवड झाली. कॉंग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा त्यांनी पराभव केला. प्रमोद सावंत यांच्या बाजूने भाजपचे ११, मगो व गोवा ङ्गॉरवर्डचे प्रत्येकी ३ व तीन अपक्ष आमदारांनी मतदान केले. तर रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या बाजूने १५ कॉंग्रेस आमदारांनी मतदान केले. कॉंग्रेस उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे सभागृहात उशिरा ... Read More »

पर्वरीत माधान्ह आहारातून १६ विद्यार्थ्यांना विषबाधा

काल सकाळी आल्त बेती, पर्वरी येथील चोपडेकर मेमोरियल सरकारी प्राथमिक शाळेतील १६ विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार घेतल्यानंतर उलट्या सुरू झाल्याने तारांबळ उडाली. यानंतर त्वरित दाखल झालेल्या पर्वरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली असता ४ विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वरील शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे काल सकाळी मधल्या सुटीत पर्वरी येथील गायत्री स्वयं साहाय्य गटातर्फे ... Read More »

ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत गोविंद तळवलकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे काल अमेरिकेत निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी २७ वर्षे काम पाहिले. त्या काळात व त्यानंतरही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भाष्यकार म्हणून त्यांनी वाचकांवर आपला ठसा उमटवला. त्यांची सुमारे २५ पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. २२ जुलै १९२५ रोजी डोंबिवली, मुंबई येथे जन्मलेल्या तळवलकरांनी १९४७ साली बी. ए. झाल्यानंतर शंकरराव देव ... Read More »

सभापदीपदासाठी आज निवडणूक

>> डॉ. प्रमोद सावंत व आलेक्स रेजिनाल्ड रिंगणात विधानसभेत आज सभापतीपदाची निवडणूक होणार असून भाजप आघाडीतर्ङ्गे वरील पदासाठी साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी तर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल सकाळी उमेदवारी अर्ज भरले. सरकार स्थापन केल्यानंतर विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव भाजप आघाडीने जिंकला असल्याने डॉ. सावंत यांची सभापतीपदी निवड नक्की मानली जात आहे. जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने ... Read More »

जांबावली येथे श्री दामबाबाचा प्रसिद्ध गुलालोत्सव काल भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा झाला. उत्सवात श्रींचा जयघोष करीत पालखीवर गुलाल उधळताना भाविक. Read More »

राम मंदिर प्रश्‍न चर्चेद्वारे सोडवा

>> सर्वोच्च न्यायालयाची सूचना अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्‍न धर्म व आस्थेशी जोडलेला असल्याचे नमून करीत दोन्ही पक्षांनी सामंजस्याने या वादावर तोडगा काढावा अशी महत्त्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयाने काल केली. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मध्यस्थ म्हणून काम पाहतील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी याचिका सुब्रमण्यम ... Read More »

फोंड्यातील बेपत्ता बिल्डर अनमोड घाटात सापडले

>> अज्ञातांनी अपहरण केल्याची जबानी मंगेशी येथून रविवारपासून बेपत्ता असलेले गोपाळ नाईक हे बिल्डर अनमोड घाटात सोमवारी रात्री सापडले. फोंडा पोलिसांनी त्यांना तेथून आणल्यानंतर उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. दरम्यान, आपल्या तोंडावर कपडा बांधून अज्ञातांनी अपहरण करून जंगलात सोडल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मात्र, त्याचे अपहरण कोणी केले असा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला असून याप्रकरणी फोंडा पोलीस अधिक तपास करीत ... Read More »