कुटुंब

मातृभाव भक्ती जागृत करणारे संत साहित्य संमेलन

– पौर्णिमा केरकर मराठी संतवाणीचा महागजर ज्याला संबोधावे लागेल, असे हे संत सोहिरोबानाथ साहित्य संमेलन म्हणजे संतांचे वाड:मय, व्यक्तित्व आणि कार्य यांचे मंथन करून अभ्यासकांना आणि उपासकांना नवी दृष्टी आणि दिशा देणारे एक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जागरण असेच म्हणावे लागले… गोमंतकात दीर्घकाळापासून मराठी वाचले, लिहिले जाते. त्याचाच एक स्वतंत्र साहित्येतिहास लिहिला जाऊ शकेल. इथे अनेक मराठी वृत्तपत्रे प्रकाशित ... Read More »

मोटारसायकलवर तोललेली जिंदगी !!

– अंजली मुतालिक मोटारसायकल आपल्या घरची सदस्य आहे. त्यामुळे केवळ दिवाळी-दसरा, उत्सव अशा वेळीच नाही तर, कायमच तिचे आपण कोडकौतुक करत असतो. आडवाटेला कुठे पंक्चर झाली तर, मित्राला फोन करून चाक खोलून नेतो. माणूस अचानक कधी साथ सोडतो तर बाईक हे यंत्र आहे. या गाडीमुळे हेल्मेट, रेनकोट, टोपी, स्कार्फ, गॉगल आमचे मित्र बनले आहेत… गुरुत्व बलाचा सुवर्णमध्य साधत आमचे आयुष्य ... Read More »

शिगमो ः एक निसर्गसंस्कृती

-प्रा. सुरेंद्र सिरसाट भारतीय संस्कृती ही पर्यावरणीय संस्कृती आहे. आपलं ऐहिक आयुष्य ज्याच्यामुळे चालू राहतं त्या निसर्गाला पूज्य मानून त्याची काही निमित्ताने पूजा करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, त्या-त्या काळच्या निसर्गवैशिष्ट्यांकडे लक्ष वेधणे अशा अनेक उद्देशांनी सण-समारंभांची रचना या संस्कृतीने केली आहे. कालमानानुसार यात काही विकृतीही आली आहे. पण ती आपणच दूर केली पाहिजे. एका नित्यनूतनशील संस्कृतीचे आपण पाईक आहोत, तिला ... Read More »

केशव सेवा साधना ः एक व्रत

– अनुराधा गानू समाजात जितके वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, तितकेच चांगल्या प्रवृत्तीचेही लोक आहेत म्हणूनच अशी कार्यशिल्पे उभी राहतात. समाजासाठी झोकून देणारे असे कार्यकर्ते आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आधार देणारे नानांसारखे नेतृत्व विरळाच. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करायला शब्द शोधावे लागतील. २००६ चं वर्ष असेल. आमच्याकडे एक बाई कामाला होती. तिला दोन मुली आणि एक मुलगा. परिस्थिती हलाखीचीच होती. त्या लहान ... Read More »

होळी ः एक लोकोत्सव

– सौ. पौर्णिमा केरकर मर्दानी उत्सवाचा महोत्सव म्हणजेच होळीपासून सुरू होणारा शिगमोत्सव. हा तर सामूहिक लोकोत्सवच असल्याने सभोवतालच्या निसर्गात रंगगंधाची नैसर्गिक होळी जशी अनुभवता येते, तसेच पारंपरिक विधी-परंपरांनी सजलेली, श्रद्धाळू-भाविक मनाने आत्मीयतेने पुजलेली होळी आठवताना, हा लोकोत्सव साजरा करताना लोकमानस किती दक्षतेने आणि आत्मीयतेने या उत्सवाकडे पाहायचा याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पानगळीला सुरुवात… उन्हाचा रखरखाट… शाल्मली, पळस, पंगारा, बहावा ... Read More »

सुखाचा परिघ ः माझं माहेर

– सौ. अंजली विवेक मुतालिक (कुडाळ) ज्या दिवशी माहेरी जायचं त्याच्या आदल्या रात्री झोप लागत नाही. माहेरच्या आठवणींचा हादगा फेर धरून डोळ्यासमोर नाचू लागतो. पुन्हा त्याच आठवणींच्या परिघावर…! ‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात, माहेरी जा सुखाची तू कर बरसात!!’ ‘मायका’ मतलब ‘माहेर’- ज्या ठिकाणी आपली ‘माय’ आहे ‘का?’ आणि जबतक ‘मॉं’ उधर है तो माहेर! प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनात केंद्रबिंदू ... Read More »

सोसण्याचा सोस बाई सोड गं…

 पुरुषा’च्या मनाचा कोतेपणा ’बाई’च्या मनाच्या प्रचंड मोठेपणात फार गोंडस रुपात झाकला आहे. संस्कृतीने फार हुशारीने तिच्या सोसण्याचा सोहळा करुन तिला इतकं उदात्त करुन ठेवलं आहे की तिच्यावर अन्याय करणारा पुरुषच मग भला ठरवला गेला आहे!.. मुलगा आईला म्हणाला दिव्याची वात जरा मोठी कर मला वाचता येत नाही. वडील म्हणाले दिव्याची वात जरा छोटी कर मला झोप येत नाही. आई रात्रभर ... Read More »

नाती जपताना….

मुग्धा कुलकर्णी कुटुंबातील तशी एकुलती एक मुलगी. तिचा विवाह हा तसा त्या कुटुंबातील घरातील जवळजवळ शेवटचाच. कारण दोन्ही मोठ्या भावांची लग्ने होऊन काही वर्षे उलटली होती. कुलकर्णी कुटुंब म्हणजे काही वेगळंच, अर्थातच चांगल्या अर्थाने. आठ दहा जणांचं ते एकत्र कुटुंब. शिवाय दररोज कुणी ना कुणी पाहुणा, परिचित हा जेवणाला असणारच. जयंतराव व त्यांच्या पत्नी राधा आता निवृतीचे जीवन सुना नातवंडासमवेत ... Read More »

‘प्रेमा’ला पर्याय नाही!

– आरती सुखटणकर (निवृत्त मुख्याध्यापिका) मुलामुलींच्या आयुष्यात त्यांच्या विकासास आईवडील कारणीभूत होतात. मुलांना केवळ अन्न, वस्त्र व निवारा दिला की आईवडिलांचे कर्तव्य संपत नाही. योग्य वयाच्या वाढीबरोबर होणारा बौद्धिक, मानसिक विकास होण्याकरता आईवडिलांनी प्रेम दिले पाहिजे. मागील अंकात आपण पाहिले की… मुलांना आपल्या मनाप्रमाणे शैक्षणिक साहित्य निवडण्याचे स्वातंत्र्य तरी आपण देतो का? बालपणी शैक्षणिक साहित्यापासून ते मोठेपणी व्यवसाय निवडण्याचे ‘स्वातंत्र्य’ही ... Read More »

‘‘संजीवन’’ ः एक नवजीवन, नव चैतन्य

– अनुराधा गानू (आल्त सांताक्रूझ-बांबोळी) अनेक समाजोपयोगी उपक्रमांमुळे संजीवन ही संस्था समाजासाठी विशेषतः महिलांसाठी ‘‘संजीवन’’ बनली आहे. यापुढेही नव्या-नव्या समाजोपयोगी कल्पना साकार करण्याचा मानस आशाताईंनी बोलून दाखवला. पण त्यासाठी आर्थिक पाठबळाइतकेच महत्त्वाचे आहे ते माणसांनी माणसांसाठी दिलेला वेळ (ज्याचा आज खूपच अभाव आहे) आणि हात! इतकी सगळी कामं करण्यासाठी दिवसाचे २४ तास आणि माणसाचे २ हात अपुरे पडतायत. मग चला ... Read More »