0
165

तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे ९४ वर्षीय अध्यक्ष एम. करूणानिधी मूत्रसंसर्ग, रक्तदाब व अन्य कारणांमुळे चेन्नईतील कावेरी इस्पितळात उपचार घेत असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल सदर इस्पितळात जाऊन त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांकडे त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. करूणानिधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी डॉक्टरांनी नायडू यांना सांगितले. यावेळी करूणानिधी यांचे कुटुंबियही उपस्थित होते. तसेच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हेही उपस्थित होते.