पर्वरी येथील अपघातात युवक जागीच ठार

0
83

पर्वरी महामार्गावरील दमानिया गोवा या फर्निचर शोरुमसमोर काल पहाटे दीड वाजता अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र गंभीररीत्या जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल पहाटे दीड वाजता मानस नारायण दास (३१) आणि त्याचा मित्र सागर दनपत (२०) आपल्या दुचाकीवरून पर्वरी महामार्गावरून पणजीला जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजखांबाला जोराची धडक दिली. यामुळे मानस हा युवक जागीच ठार झाला तर त्याचा मित्र सागर गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला गोमेकॉमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. दोघेही युवक मूळचे ओरिसातील असून त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. हवालदार जी. एफ. मार्टीन यांनी अपघाताचा पंचनामा केला असून उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर पुढील तपास करीत आहेत.