30 जूनपूर्वी पूर्ण करावयाच्या दहा आर्थिक बाबी

0
319
  • शशांक मो. गुळगुळे

31 मार्चनंतर 2018-19 या वर्षाचा रिटर्न फाईल करता येत नाही व करदाता आयकर खात्यातर्फे ‘डिफॉल्टर’ ठरविला जातो. पण यावेळी ‘कोरोना’च्या संसर्गामुळे वित्तमंत्र्यांनी हा कालावधी वाढवून तो 30 जून केला आहे व दंडाची रक्कमही कमी करण्यात आली आहे.

 

10-11 दिवसांनंतर 2019-20 हे आर्थिक वर्ष संपणार. ते संपण्यापूर्वी 10 आर्थिक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे-

1) करदात्याला 2018-19 या आर्थिक वर्षाचा टॅक्स रिटर्न 31 जुलै 2019 पूर्वी फाईल करणे आयकर खात्याच्या नियमाप्रमाणे बंधनकारक होते. ज्या करदात्याने 2018-19 चा आयकर रिटर्न अजून फाईल केला नसेल तर त्याला तो 31 मार्च 2020 पूर्वी फाईल करावयास हवा होता. उशिरा फाईल होणार असल्यामुळे 5 लाख रुपयांहून एकूण उत्पन्न कमी असणार्‍यांना 1 हजार रुपये दंड, तर एकूण उत्पन्न 10 लाख रुपयांहून अधिक असणार्‍यांसाठी 10 हजार रुपये दंड. कराची रक्कम 10 हजार रुपयांहून अधिक असेल तर करदात्याला दंड होऊ शकतो व त्याच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. पण यापूर्वी करदात्याला आयकर खात्यातर्फे नोटीस देण्यात येते. 31 मार्चनंतर 2018-19 या वर्षाचा रिटर्न फाईल करता येत नाही व करदाता आयकर खात्यातर्फे ‘डिफॉल्टर’ ठरविला जातो. पण यावेळी ‘कोरोना’च्या संसर्गामुळे वित्तमंत्र्यांनी हा कालावधी वाढवून तो 30 जून केला आहे व दंडाची रक्कमही कमी करण्यात आली आहे.

2) वेतनधारकांचा कर वेतनातून कापला जातो. स्वयंरोजगार करणार्‍यांना व व्यावसायिकांना किंवा ज्या वेतनधारकांना अन्य मार्गे उत्पन्नही आहे अशांनी त्यांच्या उत्पन्नावर योग्य कर किती रकमेचा भरावा लागेल याचा आकडा निश्चित करून कर भरणे आवश्यक आहे. जर एकूण आयकर भरण्याची रक्कम 10 हजार रुपयांहून अधिक असेल अशांनी ‘अ‍ॅडव्हान्स’ कर भरणेही आवश्यक आहे. संपूर्ण उत्पन्न एकत्र करून ‘अ‍ॅडव्हान्स’ कर भरावा लागतो. उद्योगातून, व्यवसायातून, कॅपिटल गेनमधून, व्याजातून, भाड्यापोटी किंवा बक्षिसापोटी असे सर्व तर्‍हेचे उत्पन्न समाविष्ट करून एकूण उत्पन्न ठरवावे लागते. अ‍ॅडव्हान्स कराचा शेवटचा हप्ता भरायची तारीख 15 मार्च होती. जर तुम्ही त्यापूर्वी अ‍ॅडव्हान कर भरला नसेल तर तुम्ही डिफॉल्टर सिद्ध होऊ शकता.

3) वर्षाचे सर्व उत्पन्न तपासा. कित्येक करदाते त्यांच्या वार्षिक एकूण उत्पन्नाबद्दल अनभिज्ञ असतात. जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कर भरावा लागत नाही. 5 लाख रुपयांवर एक रुपयाने जरी उत्पन्न वाढले तरी तुम्ही करपात्र होता. वर्षाचे उत्पन्न तपासताना तुमच्या लक्षात आले की तुमचे उत्पन्न थोड्याच रकमेने 5 लाख रुपयांच्या पुढे जात आहे तर कर वाचविण्यासाठी संस्थांना देणगी द्या. ज्या संस्थांना देणगी दिल्यामुळे आयकर सवलत मिळू शकते अशाच संस्थांना द्या. आरोग्य विम्याची पॉलिसी स्वतःसाठी, कुटुंबासाठी व आईवडिलांसाठी घ्या. नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला आयकर कायद्याच्या 80-सी अन्वये मिळणार्‍या दीड लाख रुपयांच्या करसवलतीशिवाय अतिरिक्त 50 हजार रुपयांची करसवलत मिळते.

4) कोरोनासाठी आरोग्य विमा उतरावा. ‘डब्ल्यूएचओ’ने कोरोना महामारी जाहीर केला आहे. इन्शुरन्स अथॉरिटी रेग्युलेटरी डेव्हलप्मेंट अथॉरिटीने कोरोनाचा दावा आरोग्य विमा पॉलिसीत संमत करावा असे पत्रक काढले आहे. जे नव्याने पॉलिसी घेतील त्यांचा दावा मात्र एक महिना संमत होणार नाही. त्यामुळे सध्याचा कोरोनाचा प्रसार होण्याचा वेग बघितल्यास, ज्यांचा आरोग्य विमा नाही अशांनी तात्काळ आरोग्य विम्याचे संरक्षण घ्यावे. तुमच्यासाठी व कुटुंबासाठी उतरविलेल्या आरोग्य विम्यावर 25 हजार रुपयांपर्यंत करसवलत मिळते. आईवडिलांसाठी आरोग्य विम्याचे संरक्षण घेतल्यास अतिरिक्त रु. 2500 इतक्या रकमेची करसवलत मिळते. 31 मार्चपूर्वी आरोग्य विमा उतरविल्यास या आर्थिक वर्षी (2019-20) तुम्ही करसवलतीस पात्र ठरू शकता.

5) अल्पबचत संचालनालयाच्या गुंतवणूक योजनांत गुंतवणूक करा. बँका अचडणीत असल्यामुळे सामान्य माणसे फक्त बचत खात्यापुरता बँकांशी संबंध ठेवत असून गुंतवणूक पर्यायांसाठी शासकीय योजनांना प्राधान्य देत आहेत.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे- यातील गुंतवणुकीवर सध्या दरसाल दरशेकडा 7.9 टक्के दराने व्याज मिळत असून किसान विकास पत्रावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. 1 एप्रिलपासून या गुंतवणुकीवरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करावी.

6) फायदा मिळवा ः शेअर बाजार खाली खाली येत आहे. लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये बर्‍याच जणांची गुंतवणूक आहे. आता वर्षाला 1 लाख रुपयांहून अधिक कॅपिटल गेन झाला तर तो करपात्र आहे. त्यामुळे कॅपिटल गेनवर भरावा लागणारा कर वाचविण्यासाठी योग्य वाटल्यास काही शेअर्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विका व 31 मार्चपूर्वी पुन्हा विकत घ्या. हा निर्णय योग्य ‘कॅल्क्युलेशन’ करून घ्या.

7) प्रधानमंत्री वय वंदन योजना (पीएमव्हीव्हीवाय) ः या योजनेत 31 मार्चपूर्वीच गुंतवणूक करता येणार. इतर पेन्शनच्या अ‍ॅन्युटी योजना आयुष्यभर (मरेपर्यंत) गुंतवणूकदाराला पेन्शन देतात, पण हिचा कालावधी 10 वर्षे असून परतावा निश्चित मिळतो. जर पेन्शनर या योजनेत गुंतवणूक केल्यापासून 10 वर्षे जगला म्हणजे मुदतपूर्तीपर्यंत जगला तर त्याला मूळ गुंतविलेली रक्कम परत केली जाते. ही योजना कार्यरत असताना गुंतवणूकदाराला मृत्यू आल्यास त्याच्या ‘नॉमिनी’ला रक्कम दिली जाते. करतज्ज्ञांच्या मतानुसार ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनेनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात चांगली गुंतवणूक योजना आहे. सध्याच्या केंद्र सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक योजनांत 15 लाख रुपयेपर्यंतची कमाल गुंतवणूक केली असेल तर उरलेली रक्कम या योजनेत गुंतवावी. या योजनेत आयकर कायद्याच्या 80-सी अन्वये करसवलत मिळत नाही व पेन्शन करपात्र आहे. गुंतविलेल्या रकमेवर जीएसटी आकारला जात नाही.

8) पॅन व आधार संलग्न करणे ः पॅन व आधार 31 मार्चपूर्वी संलग्न केले नाही तर पॅन रद्द होणार. याशिवाय रु. 10,000 दंडही आकारला जाणार. हे संलग्न करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. ळपलेाशींरुळपवळरषळश्रळपस.र्सेीं.ळप या वेबसाईटवर पॅन आधारशी संलग्न करता येते.

9) एफएमपी फंड्स ः म्युच्युअल फंडचे फिक्स मॅच्युरिटी प्लान्स हे क्लोज्ड-एन्डेड-डेट् आहेत. फिक्स मॅच्युरिटी प्लान्समध्ये तीन वर्षांहून अधिक गुंतवणुकीवर मिळणारा ‘गेन्स’ हा दीर्घ मुदतीचा कॅपिटल गेन मानला जातो. बर्‍याच म्युच्युअल फंड कंपन्या डेट फंडन्समध्ये फार मोठ्या प्रमाणावर तोट्यात आहेत. त्यामुळे या गुंतवणुकीवर 31 मार्चपूर्वी पुनर्विचार करा.

10) टर्म इन्शुरन्स विकत घ्या ः हा सर्वात चांगला विमा प्लान. कमी पैशात जास्त रकमेचे संरक्षण मिळते. तुम्ही अजूनपर्यंत टर्म इन्शुरन्स उतरलेला नसेल तर तात्काळ उतरवा. 1 एप्रिलपासून प्रिमियम रकमेत 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.