Daily Archives: August 1, 2020

लोकमान्यांची थोरवी

सोमनाथ कोमरपंत लोकमान्य टिळक आणि अन्य नेत्यांचे चरित्रविषयक लेखन समकालीनांनी भरपूर प्रमाणात केले आहे. निखळ मनाने आणि निःपक्षपाती दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्मांडणी व्हावी. अशी ग्रंथनिर्मिती होत रहावी. त्यामुळे लोकमान्य टिळकांसारख्या हिमालयाच्या शिखरासारखी उत्तुंगता आणि हिंदी महासागराची अथांगता असलेल्या महापुरुषाचे चरित्र नव्या पिढ्यांना स्फूर्तिदायी ठरेल. भारतासारख्या खंडप्राय देशाचे जवळजवळ चाळीस-पंचेचाळीस वर्षे ज्या धीरोदात्त पुरूषाने नेतृत्व केले, त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ... Read More »

कर्तव्यनिष्ठ टिळक

 माधुरी रं. शे. उसगावकर प्राण पणाला लावून राष्ट्रसेवेची गुढी उभारताना लोकमान्य टिळकांनी आपला देह झिजविला. ना कुटुंबाची तमा ना राज्यकर्त्यांची भीती. लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांचा आत्मविश्‍वास वाढविणार्‍या तपस्व्याला कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या असामान्य कार्याची जागृती होणे हीच खरी श्रद्धांजली. आज १ ऑगस्ट २०२०. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीची शताब्दी! १०० वर्षांपूर्वी ‘असंतोषाचे जनक’ म्हणून दबदबा असणार्‍या या महापुरुषाची प्राणज्योत मालवली आणि देशाचा ... Read More »

आधुनिक भारताचा झुंजार नेता लोकमान्य टिळक

 सौ. निलांगी औ. शिंदे (धारगळ- पेडणे) उसळत्या रक्तात मॉं ज्वालामुखीचा दाह दे, वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असू दे | अशा प्रकारचे राष्ट्रभक्तीचे असीधाराव्रत ज्यांनी घेतले, भारताचे सर्वप्रथम पूर्णवेळ राजकारणी, ज्यांनी आपल्या निःस्वार्थ कार्य आणि असामान्य धैर्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतभूमीवर आपला ठसा उमटविला अशा प्राच्यविद्या पंडित, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीविरोधी अविश्रांत ... Read More »