Monthly Archives: August 2020

हे असेच चालायचे?

ट्रकांच्या पाठीमागे ‘हे असेच चालायचे’ असा एक संदेश अनेकदा रंगवलेला दिसतो. गोव्यातील कोरोनाची परिस्थिती पाहिली तर ‘हे असेच (रामभरोसे) चालायचे’ असेच एकूण चित्र दिसते आहे. काल राज्यात सर्वाधिक विक्रमी ५०६ कोरोनाबाधित सापडले! ही संख्या हादरवून टाकणारी आहे. जुलैमध्ये दर आठवड्याला सरासरी एक हजार रुग्ण पॉझिटिव्ह सापडत होते. या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही सरासरी दोन हजारांवर गेलेली आहे. तरीही सरकार ... Read More »

कोरोनाची मगरमिठी, नवे ५०६ रुग्ण

>> राज्यात २४ तासांत तिघांचा मृत्यू >> नऊ दिवसांत २७९९ बाधित तर ३० बळी राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. रविवारी नवे ५०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ऑगस्ट महिन्यात सुरुवातीच्या नऊ दिवसांत नवे २७९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून या काळात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील खास वॉर्डात ५१२ कोरोना ... Read More »

जम्मू- काश्मीरमध्ये आणखी एका भाजप नेत्यावर गोळीबार

जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हमीद नजार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, भाजपच्या ४ नेत्यांनी काल आपला राजीनामा पक्षाकडे सोपवला आहे. भाजाप नेते व कार्यकर्त्यांवर दहशवाद्यांकडून हल्ला होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाल्याचे दिसत आहे. या अगोदर ६ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंड ब्लॉकच्या वेस्सु गावात ... Read More »

पाकमधून राजस्थानात आलेल्या ११ जणांचे मृतदेह सापडले

राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एका शेतात पाकिस्तानातून भारतात आलेल्या हिंदू परिवारातील ११ सदस्यांचे मृतदेह सापडले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या परिवारातील एक सदस्य जिवंत सापडला आहे.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला या प्रकाराबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र सर्वांनी केमिकल सदृष्य पदार्थ पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. मृत्यू पावलेले सर्व निर्वासित हे पाकिस्तानमधील भिल्ल समाजाचे ... Read More »

आंध्र प्रदेशमध्ये कोविड सेंटरला आग लागून १० रुग्णांचा मृत्यू

विजयवाडा- आंध्र प्रदेश येथे असलेल्या एका हॉटेलला आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला. या हॉटेलचे कोविड निगा केंद्रामध्ये रुपांतर करण्यात आले असून मृत्यू पावलेले सर्वजण रुग्ण आहेत. यावेळी ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशामक दलाने युद्धपातळीवर काम करीत ही आग विझवली. काल रविवारी पहाटे ५ च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ... Read More »

२४ तासांत परतणार्‍यांस क्वारंटाईन नाही

>> आपत्ती व्यवस्थापनाकडून गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी परराज्यातून गणेश मूर्ती पूजन किंवा विक्रीसाठी आणणारी व्यक्ती चोवीस तासांच्या आत पुन्हा राज्यात परतल्यास त्याला क्वारंटाईन किंवा कोविड चाचणी करण्याची गरज नाही, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने श्री गणेश चतुर्थीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे. राज्याबाहेर राहणार्‍या मूळ गोमंतकीय व्यक्ती सध्याच्या एसओपीचे पालन करून येऊ शकतात. प्रवेशासाठी आयसीएमआर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेचे कोरोना ... Read More »

ब्रॉड, अब्बासची झेप

>> आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तानविरुद्ध जिंकलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दामदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलूंच्या यादीत ‘टॉप १०’मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद अब्बास ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याच्यासह संयुक्त दहाव्या क्रमांकावर आहे. या द्वयीचे समान ७६९ रँकिंग गुण आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अब्बास याने तीन बळी घेतले होते. पहिल्या डावात त्याने ... Read More »

गांगुलीच सर्वोत्तम कर्णधार

>> माजी कसोटीपटू मनिंदर सिंग यांचे मत आता भारताचे माजी फिरकीपटू मनिंदर सिंग यांनी सौरव गांगुली हाच भारताचा आत्तापर्यंतचा सर्वांत यशस्वी व सर्वोत्तम कर्णधार असल्याचे मत व्यक्त केले आहे. कोणत्याही कर्णधाराची श्रेष्ठता ही त्याने संघाला किती सामने किंवा स्पर्धा जिंकून दिल्या आहेत, यावरुन करता येत नाही. तर, त्याने खेळाडूंमध्ये किती विश्‍वास निर्माण केला व खेळाडूंचे कशा प्रकारे समर्थन केले यावरून ... Read More »

स्टोक्सची माघार

इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे काल रविवारी जाहीर केले. कौटुंबिक कारणास्तव त्याने आपली अनुपलब्धता इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाला कळवली आहे. ‘स्टोक्स येत्या काही दिवसांत इंग्लंडहून न्यूझीलंडसाठी रवाना होईल त्यामुळे एजिस बाऊल येथे १३ ऑगस्टपासून व २१ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या कसोटींना तो मुकेल, असे ईसीबीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ... Read More »

मन हो श्यामरंगी रंगले…

मीना समुद्र कृष्णाचं संपूर्ण जीवन म्हणजे मानवाला अनाकलनीय वाटणार्‍या अनेक विलक्षण घटनांची गुंफण. एकता, समानता, सत्यता, मित्रत्व, सख्यत्व, पावित्र्य, मांगल्य, सेवाभाव, निर्भयता याचं प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्या खेळातला आनंद म्हणून गोवर्धन उभारून, गोपाळकाला करून, दहिहंड्या फोडून, बासरीवादन, नर्तन करून आपण कृष्णजन्म साजरा करतो. माणसाच्या भोवतालचा निसर्ग जोपर्यंत डोंगर-नद्या-सागर-झाडेवेली यांच्या रूपाने कार्यरत आहे; भोवतीची सारी सृष्टी जोपर्यंत चैतन्यशील आहे, तोपर्यंत त्यांनीच ... Read More »