Monthly Archives: July 2020

राजस्थानमध्ये राज्यपालांचा अधिवेशन बोलावण्याचा निर्णय

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी काल अखेर अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. विधानसभा अधिवेशन बोलावले जाऊ नये, अशी आपली भूमिका कधीच नव्हती, असेही त्यांनी हा निर्णय देताना स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजस्थानात बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी कॉंग्रेसविरोधात उच्च न्यायालयात हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळली गेली आहे. तर दुसरीकडे, राजस्थान उच्च न्यायालयात राज्यपाल मिश्र यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. ... Read More »

इंग्लंड संघात विली, टॉपलीचे पुनरागमन

>> आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने काल सोमवारी आपला १४ सदस्यीय संघ जाहीर केला. डावखुरा मध्यमगती गोलंदाज रिस टॉपली तब्बल ४ वर्षांनंतर संघात परतला आहे. गुरुवारपासून सुरू होणार्‍या या मालिकेसाठी संघाचे नेतृत्व ऑईन मॉर्गन करणार आहे. उपकर्णधारपद मोईन अली याच्याकडे सोपविण्यात आले आहे. मालिकेतील दुसरा सामना १ ऑगस्ट रोजी व तिसरा सामना ४ ऑगस्ट ... Read More »

आनंदचा सलग सहावा पराभव

माजी विश्‍वविजेत्या विश्‍वनाथन आनंद याचा १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या लिजंडस् ऑफ दी चेस स्पर्धेतील संघर्ष सुरूच आहे. काल सोमवारी आनंदला रशियाच्या इयान नेपोमनियाच्ची याच्याकडून सहाव्या फेरीत २-३ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याची पराभवाची मालिका सुरूच राहिली. सहाव्या फेरीची सुरुवात आनंदने सावधरित्या केली. त्याने पहिल्या सामन्यात इयान याला ५३ चालींत बरोबरीत रोखले. दुसरा सामना इयानने केवळ ३४ चालींत जिंकला. ... Read More »

लढायचे आहे!

शत्रूविरुद्ध जेव्हा लढायचे असते, तेव्हा केवळ त्याच्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून ते युद्ध लढायचे असते. कोरोनासंदर्भातही आपली हीच नीती असायला हवी. परंतु राज्यामध्ये कोरोनाशी चाललेला लढा हा अशा प्रकारे एकचित्त एकाग्रतेने लढला जातो आहे असे दिसत नाही. अवांतर वायफळ गोष्टींमध्ये सरकार जास्त रमलेले दिसते आणि त्याबाबत ओरडा होताच नामुष्की पत्करीत निमूट माघारीही वळते. कोरोना गोव्यात यायला निघाला तेव्हा सरकार जिल्हा ... Read More »

विधानसभेचे आज एक दिवशीय अधिवेशन

>> कोविडवरून विरोधक सरकारला घेरणार? >> केवळ कोरोनावर चर्चा करण्याची मागणी राज्यातील वाढत्या कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गोवा विधानसभेचे सोमवार २७ जुलै २०२० रोजी आयोजित एकदिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. सरकारने या एक दिवसीय अधिवेशनात वर्ष २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प, अनुदानित पुरवणी मागण्या आणि विधेयके संमत करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. तर, राज्यातील वाढत्या कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कोविड विषयावर चर्चेसाठी विरोधकांकडून ... Read More »

नवीन १७५ कोरोना पॉझिटिव्ह

>> आणखी एकाच्या मृत्यूमुळे राज्यात ३५ बळी राज्यात कोरोना विषाणूने शनिवारी एकाच दिवशी पाच कोरोना रुग्णांचा बळी घेतल्यानंतर रविवारी आणखी एका रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता ३५ झाली आहे. दरम्यान, नवीन १७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १५४९ झाली आहे. नवेवाडा वास्को येथील ६३ वर्षीय रुग्णाचे निधन झाले आहे. आरोग्य ... Read More »

आत्मनिर्भरतेची शपथ स्वातंत्र्यदिनी घ्या

>> मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी येत्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी देशवासीयांना आत्मनिर्भर होण्याची शपथ घ्या असे आवाहन केले. पंतप्रधान म्हणाले की, पुढच्या मन की बातच्या अगोदर भारताचा स्वातंत्र्यदिन येणार आहे. यावेळचा स्वातंत्र्यदिन वेगळ्या परिस्थितीत साजरा होणार आहे. मात्र कोरोनाच्या या संकटात देशवासीयांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प करावा. कोरोनापासून ... Read More »

राजस्थानात गेहलोत यांची अधिवेशनाची नव्याने मागणी

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारने राज्यपाल कालराज मिश्रा यांना विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा नवा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावात ३१ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावात कोरोनाच्या स्थितीबद्दल चर्चा करण्याविषयी उल्लेख असून त्यात विश्वासदर्शक ठरावाचा उल्लेख नाही. कोरोनासह काही विधेयकावरील चर्चेचा या प्रस्तावात देखील उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्यपालांना रविवारी पाठविण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन ३१ जुलैपासून ... Read More »

डॉ. एडविनच्या पत्नीची न्यायालयात याचिका

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने डॉ. एडवीन गोम्स यांच्या पत्नीने दाखल केलेल्या एका याचिकेची दखल घेऊन आरोग्य सचिव आणि डॉ. गोम्स यांनी एका आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन निगडीत प्रश्‍नांवर सामंजस्याने तोडगा काढावा, असा निर्देश दिला आहे. डॉ. गोम्स यांची पुन्हा कोविड इस्पितळात नियुक्ती करण्यासाठी हालचाल सुरू झाल्याने डॉ. गोम्स यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात खास याचिका ... Read More »

वास्कोत दामोदर सप्ताहास प्रारंभ

>> कोरोना संकट दूर करण्याचे श्रीचरणी गार्‍हाणे वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून १२१ व्या अखंड २४ तासांच्या वार्षिक दामोदर भजन सप्ताहाची काल रविवारी प्रारंभ झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा सप्ताह सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचे समितीने ठरवले असून काल प्रथमच १२१ वर्षांच्या इतिहासात सप्ताहाची सुरुवात भाविकांना प्रवेश न देता झाली. जोशी कुटुंबातील प्रशांत जोशी यांच्या हस्ते श्रीचरणी ... Read More »