Monthly Archives: July 2020

अनलॉक २.०ची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारने गृह मंत्रालयाने अनलॉक २ साठीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जारी केली आहे. तथापि, गोवा सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. नवीन मार्गदर्शक तत्त्वावर विचारविनिमय सुरू असून लवकरच जारी केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यालय, महाविद्यालये ३१ जुलै २०२० पर्यत बंद राहणार आहेत. थिएटर, व्यायामशाळा, ... Read More »

गरिबांच्या मोफत अन्न योजनेत नोव्हेंबरपर्यंत वाढ ः पंतप्रधान

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटींहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे दिले जाणार आहेत. काल मंगळवारी देशवासीयांना व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी वरील घोषणा केली. यावेळी पंतप्रधानांनी, केंद्र सरकार ... Read More »

जून महिन्यात ४० इंच पावसाची नोंद

राज्यात मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली असून जून महिन्यात साधारण ४० इंच पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत मोसमी पावसाचे सरासरी प्रमाण १८ टक्के जास्त आहे. दरम्यान, पेडण्यात मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक (५०.७५ इंच) पूर्ण केले आहे. राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे आगमन चार- पाच दिवस उशिराने झाले. या महिन्यात ११ ते २० जून या काळात जोरदार पाऊस पडल्याने पावसाचे सरासरी प्रमाण ... Read More »

अर्जुन पुरस्कारासाठी ब्रिज खेळाडूंची शिफारस

>> वर्धन – सरकार जोडीचे नाव पाठवले क्रीडा मंत्रालयाकडे भारतीय ब्रिज महासंघाने प्रणव वर्धन व शिवनाथ सरकार यांची काल मंगळवारी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धेत या दुकलीने सुवर्णपदक मिळवले होते. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले हे पहिलेच ब्रिज खेळाडू आहेत. यापूर्वी पुरस्कारांसाठीच्या यादीत ब्रिज या खेळाचा समावेश नव्हता. ‘बीएफआय’ने दोन्ही खेळाडूंची नावे क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली आहेत. ... Read More »

झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर

ऑस्ट्रेलिया व झिंबाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका दोन्ही मंडळांनी सहमतीने पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. तीन सामन्यांच्या मालिका ऑगस्ट महिन्यात होणार होती. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात एकूण कोरोनाची ७५०० प्रकरणे झाली असून ७ हजारांहून जास्त लोकांनी यावर मात केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १०४ झाली आहे. मालिकेचे अल्प स्वरूप, ऑगस्ट ... Read More »