Monthly Archives: July 2020

वीज उत्पादन क्षेत्रातही चीनला झटका देणार

भारताकडून चीन सतत आर्थिक स्तरावर झटके देण्यात येत आहेत. सरकार ऊर्जा क्षेत्रातील आयातीवर सीमा शुल्क वाढवणार आहेत. यामुळे आयातीवर काही प्रमाणात निर्बंध येतील. चिनी कंपन्यांना रोखण्यासाठी सीमा शुल्कासोबत नियम अधिक कडक केले जातील, असे केंद्रीय मंत्री आर. के. सिंह म्हणाले. डिजिटल आणि रस्ते बांधकाम क्षेत्रानंतर आता वीज उत्पादन क्षेत्रातून चीनला झटका देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. देशातील पुरवठा भारत ... Read More »

सर एव्हर्टन विक्स यांचे निधन

>> कॅरेबियन क्रिकेटचे पितामह म्हणून ओळख >> ठोकली होती सलग पाच शतके वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज फलंदाज सर एव्हर्टन विक्स यांचे बुधवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. विक्स यांनी क्लाइड वॉलकोट आणि फ्रँक वॉरेलसह १९५० च्या दशकात जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजला वर्चस्व मिळवून दिले होते. या त्रिकुटाला वेस्ट इंडिजचे ‘द थ्री डब्ल्यू’ म्हणून ओळखले जायचे. विक्स यांना कॅरेबियन ... Read More »

आजीवन बंदीचा पुनर्विचार करा

>> अंकित चव्हाणची ‘एमसीए’ला विनंती श्रीसंत याच्यासह आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला मुंबईचा माजी डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाण याने आपल्यावरील आजीवन बंदी हटवण्याची मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे केली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीत राजस्थान रॉयल्सचे तत्कालीन खेळाडू श्रीसंत, चव्हाण व अजित चंडिला हे तिघे दोषी आढळले होते. त्यामुळे या तिघांवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. दिल्लीतील कोर्टाने २०१५ साली ... Read More »

विराट कोहली माझा आदर्श ः सॅमसन

टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू समॅसनने कर्णधार विराट कोहलीची भरभरून स्तुती करताना तो त्याच्यासाठी आणि देशातील प्रत्येक युवा खेळाडूसाठी आदर्श असल्याचे सांगितले. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कर्णधाराकडून युवा खेळाडू बरेच काही शिकू शकतील असे सॅमसन म्हणाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर आयपीएलमध्येही सरस खेळ करीत संजूने भारतीय संघात स्थान मिळविले आहे. महंेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी म्हणून तो अग्रगण्य उमेदवार आहे. एका ... Read More »

पारदर्शकतेची गरज

कोरोनाच्या सावटाखाली कालची आषाढी एकादशी सुनी सुनी गेली. ना टाळ – मृदंगांचे सूर निनादले, ना तारस्वरातील भजनांचे – अभंगांचे स्वर. खुद्द पांडुरंगाच्या पंढरीमध्येच जेथे काल सुन्न शांतता होती, तिथे आपल्या गोव्याची काय कथा? कोरोनाचे हे संकट लवकर दूर कर असे साकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या विठोबाला काल घातले खरे, परंतु हे संकट काही एवढ्या लवकर दूर होण्याची चिन्हे ... Read More »

आजपासून हॉटेल्स खुली

>> पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांची माहिती राज्यातील हॉटेल्स आज दि. २ जुलैपासून पर्यटक व अन्य नागरिकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या हॉटेलवाल्यांनी पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेली आहे व हॉटेल्स खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे अर्ज केलेले आहेत त्यांनाच हॉटेल खुली करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. हॉटेल खुली करण्यास परवानगी द्यावी ... Read More »

राज्यात कोरोनाचा चौथा बळी

>> नवीन ७२ पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात कोरोना पॉझिटिव्ह एका ६६ वर्षीय ताळगाव येथील व्यक्तीचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये मंगळवारी मध्यरात्री निधन झाले असून राज्यातील कोरोना बळींची संख्या ४ झाली आहे. दरम्यान, राज्यात काल नवीन ७२ रुग्ण आढळून आले असून कामराभाट-करंजाळे आणि बोरी-शिरोडा येथे आयझोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, जुवारीनगरात नवीन २४ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ... Read More »

फातर्प्यात १० नवीन रुग्ण

फातर्पा आंबेमळ येथे काल आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने फातर्प्यात रुग्णसंख्या २१ झाली आहे. एक परिचारिका पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे फातर्पा सरपंच मंदा देसाई व केपेचे मामलेदार लक्ष्मीकांत देसाई यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. दरम्यान, फातर्प्यातील तो भाग निर्बंधित क्षेत्र करण्याची तयारी चालू आहे. दरम्यान, सासष्टी तालुक्यातील मडगावात १२, आंबेली २३, लोटली ११, नावेली ... Read More »

बस्तोडा-ऊसकईतील अपघातात एक ठार

म्हापशाहून बस्तोडामार्गे ऊसकई मार्गांवर काल बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास एका दुचाकीचा टायर फुटून अपघात झाला. यात शशांक श्यामसुंदर शेट हा युवक ठार झाला. तर त्याचे वडील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. शशांक शेट व त्याचे वडील एका स्कूटरवरून येत असताना बस्तोडा उसकई मार्गावर पोचताच दुचाकीचा टायर फुटला. त्यात चालक शशांक हा मरण पावला. तर त्याचे वडील ... Read More »

कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही ः मुख्यमंत्री

यापूर्वी केलेल्या आपल्याच विधानाशी फारकत घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, राज्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग नसल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग झालेला आहे असे मी यापूर्वी म्हटले होते. मात्र त्या संबंधी बारकाईने अभ्यास केल्यानंतर राज्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला नसल्याच्या निष्कर्षावर आपण आलो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत अशा भागांत गेलेल्या लोकांनाच ... Read More »