Monthly Archives: July 2020

‘कोविड-१९’ उपाययोजनांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून सर्वतोपरी मदत

>> आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची ग्वाही संरक्षण मंत्रालयाकडून गोवा सरकारला कोविड – १९ उपाययोजनांसाठी सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संरक्षण दलाच्या तिन्ही विभागाच्या राज्यातील प्रमुख अधिकार्‍यांसोबत आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय आहे. राज्य सरकार कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ... Read More »

राज्यात कोरोनाचे नवे १०० रुग्ण

राज्यात काल नवीन १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ८९५ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह ७४ रुग्ण बरे झाले आहेत. बेतकी येथे नवीन २५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोलवा, करासवाडा येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेतकी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. वळवई येथील एकाच कुटुंबातील ... Read More »

कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार

उत्तरप्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. त्याचवेळी शेजारी असलेल्या पोलिसांची बंदूक घेऊन तो पळून जाण्याच्या बेतात होता. त्यावेळी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. या दरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी दुबेला ठार केले. विकास दुबेचा मृत्यू झाल्याची माहिती ... Read More »

२४ तासांत २.६४ इंच पाऊस

राज्यात मागील तीन दिवस संततधार कोसळणार्‍या पावसाने काल थोडी उसंत घेतली. मागील चोवीस तासांत २.६४ इंच पावसाची नोंद झाली. दरम्यान, आगामी चार दिवस राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साखळी येथे सर्वाधिक ५.८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील तीन दिवसांत ६.२५ इंच पावसाची नोंद झाली असून राज्यात आत्तापर्यंत ६२.४४ इंच पावसाची नोंद झाली ... Read More »

पंचायतराज कायद्यात दुरूस्ती करणार : गुदिन्हो

गोवा पंचायतराज कायद्यात दुरुस्ती करून आमदार, जिल्हा पंचायत सदस्यांच्या ग्रामसभांतील सहभागाला कायदेशीर मान्यता देण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यातील पंचायत राज्य कायद्यात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आगामी पावसाळी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक सादर केले जाणार आहे, असे पंचायत मंत्री ... Read More »

वेस्ट इंडीज सर्वबाद ३१८

>> ब्रेथवेट, डावरिच यांची अर्धशतके; स्टोक्सचे ४ बळी क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी आपल्या पहिल्या डावात ११४ धावांची आघाडी मिळविली. विंडीजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. प्रथमच संघाचे नेतृत्व करणार्‍या कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ४ बळी मिळविले. विंडीजने इंग्लंडला पहिल्या डावात २०४ धावांवर रोखले होते. ... Read More »

‘त्या’ निर्णयामुळे ब्रॉड संतप्त

कोरोना महामारीच्या संक्रमणानंतर सुमारे ४ महिन्यांच्या कालावधीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेद्वारे काल बुधवारपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झालेले आहे. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी द्रुतगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला संधीची अपेक्षा होती. परंतु सामन्याच्या आदल्या रात्री त्याला प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने अंतिम अकरातून वगळल्याचे समजल्याने ब्रॉड संतप्त झाला आहे. ब्रॉडने संघातून असा आकस्मिक वगळण्याचा निर्णय न समजण्या पलिकडचा ... Read More »

रहाणेवर होतोय अन्याय ः चोप्रा

अजिंक्य रहाणे हा सध्या भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून कार्यरत आहे. कसोटी प्रमाणेच त्याच्याकडे वनडेतही सरस कामगिरी करण्याची मता आहे आणि हे त्याने बर्‍याचदा सिद्धही करून दाखवलेली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्याला वन-डे मध्ये स्थान देण्यात येत नाहीये. तो त्याच्यावर एक प्रकारचा अन्यायच होत असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटपटू तथा विद्यमान समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केले. अजिंक्यने वनडेत ... Read More »

भावी पिढीच्या भवितव्यासाठी ः ‘वनमहोत्सव’

पौर्णिमा केरकर वनमहोत्सव ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कित्येक जण ही बांधीलकी आजही जतन करीत आहेत. वृक्षांचे जीवन म्हणजे एक आगळावेगळा सुगंध. त्याची मुळे जमिनीत खोलवर जाऊन स्वतःसाठी जीवनरस शोषतात… मानवी मनाला जीवन जगण्याचा संदेश देत तो सर्वदूर पसरतो. तो संदेश ओळखून कार्यरत राहिलो तरच मानवी अस्तित्व टिकेल.! महोत्सव म्हटला की प्रचंड उत्साह… अमर्याद आनंद… आणि वातावरणात भरून राहिलेले चैतन्य… ... Read More »

‘छोटा परिवार, सुखी परिवार’

 प्रा. नागेश सु. सरदेसाई आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकजूट होऊन या विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक छोटा परिवार ठेवला तर आपण आपल्या देशाला फार मदत करू शकतो. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा! ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जनमानसामध्ये जागृती घडवून आणणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ... Read More »