Monthly Archives: July 2020

गेहलोत यांचे पंतप्रधानांना पत्र

राजस्थानातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्षांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवले आहे. Read More »

सचिन पायलट समर्थकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

राजस्थानातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस आणखी चिघळत आहे. रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष जोशी यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी आव्हान याचिका दाखल करताच सचिन पायलट समर्थकांनीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे राजस्थानातील राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालय यावर काय निकाल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. राजस्थानात कॉंग्रेसमध्ये राजकीय ... Read More »

अधिवेशनात सर्वच विषयांवर चर्चा अशक्य : सभापती

राज्य विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती राजेश पाटणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. येत्या २७ जुलैला होणार्‍या विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात समितीच्या सदस्यांनी संमती दिलेली विधेयके मांडून संमत केली जाणार आहेत. एक दिवसीय अधिवेशनात सर्वच विषयावर चर्चा होऊ शकत नाही, अशी माहिती सभापती पाटणेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. कामकाज सल्लागार समितीच्या (बीसीए) बैठकीत सर्व सदस्यांनी विविध विषय ... Read More »

‘एटीएम’बाबत माहिती देताय, तर सावधान!

>> फसवणुकीचे प्रकार : सायबर गुन्हा विभागाकडून सतर्कतेच्या सूचना गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने बँक एटीएम कार्ड धारकांच्या फसवणुकीच्या वाढत्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. बँकेच्या एटीएम कार्डधारकांना बँकेचे प्रतिनिधी, एजन्सीचे प्रतिनिधी असल्याशी बतावणी करून कार्डधारकांकडून पीन कोड घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास केली जात आहे. अनोळखी व्यक्तीने दिलेल्या ..२१, ४०१ या सारख्या क्रमांकावर एटीएम कार्डधारकांनी ... Read More »

वर्ल्ड लीग्स फोरममध्ये आयएसएलला स्थान

इंडियन सुपर लीगला (आयएसएल) प्रतिष्ठित वर्ल्ड लीग्स फोरम (डब्ल्यूएलएफ) मध्ये स्थान मिळाले आहे. या फोरममध्ये स्थान मिळवणारी ‘आयएसएल’ ही दक्षिण आशियामधील पहिली व आशिया खंडातील सातवी लीग बनली आहे. या फोरममध्ये प्रीमियर लीग, ला लिगा आणि बुंडेस्लिगा यासारख्या जगातील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक फुटबॉल लीग स्पर्धांचा समावेश आहे. सध्या या फोरममध्ये जगभरातील जवळपास १२०० पेक्षा अधिक क्लबचे प्रतिनिधित्व करणारे पाच खंडांचे ... Read More »

आनंदची पराभवाने सुरुवात

माजी विश्‍वविजेत्या विश्‍वनाथन आनंद याला लिजंडस् ऑफ द चेस या १५०,००० यूएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ऑनलाइन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलर याच्याकडून १.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला. मॅग्सन कार्लसन टूरचा भाग असलेल्या या स्पर्धेत खेळण्याची आनंद याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या फेरीतील पहिले तिन्ही सामने बरोबरीत सुटल्यानंतर चौथ्या सामन्यात आनंदला पराभव स्वीकारावा लागला. आनंदने मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन ... Read More »

संकटमोचकाची प्रतीक्षा

देशात असो वा गोव्यात असो, कोरोनाचा फैलाव आटोक्यात येताना दिसत नाही. देशामध्ये एकूण रुग्णसंख्या साडे अकरा लाखांवर जाऊन पोहोचली आहे आणि आतापर्यंत २८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गोव्यामध्ये एकूण रुग्णसंख्या कालपर्यंत ३८५३ पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत २५ बळी गेले आहेत. देशाचा विचार करता कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्क्यांवर गेले आहे, तर मृत्यूदर चार टक्के आहे. गोव्यामध्ये ... Read More »

कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

>> राज्यात नवे १७४ पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी कोविडमुळे राज्यात तिघा रुग्णांचे निधन झाले. मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणार्‍या एका ६५ वर्षीय व्यक्तीचे काल सकाळी निधन झाले. मधुमेहाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या या रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर कोविड इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. काल त्याचे निधन झाले. त्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिला रुग्णाचे गोमेकॉतून कोविड इस्पितळात नेताना ... Read More »

वास्कोत वाहनांची वर्दळ

मुरगाव तालुक्यात चार दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरी काल दुसर्‍या दिवशीही वाहनांची वर्दळ दिसली. मंगळवारी वास्को पोलिसांनी कडक बंदोबस्त करून विविध ठिकाणी नाकाबंदी केली. प्रत्येक वाहन थांबवून त्याची चौकशी केली जात होती. तसेच काही ठिकाणी सकाळी व्यापार्‍यांनी दुकाने उघडली असता ती पोलिसांनी बंद करायला लावली. दाबोळी चिखली जंक्शनवर समोर विमानतळ मार्गावर पोलिसांनी कडक नाकाबंदी केली. लोक आपल्या कामावर जाण्यासाठी ... Read More »

‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या चाचणीसाठी २५ जणांचीच नोंदणी

कोविडसाठीच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लशीची मानवी चाचणी देशातील १२ इस्पितळांतून सुरू झालेली असतानाच गोव्यातील ज्या रेडकर इस्पितळात ही मानवी चाचणी घेतली जाणार आहे, तेथे १२४ जणांची गरज असताना आतापर्यंत अवघ्या २५ जणांनीच त्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली. या समाजोपयोगी कामासाठी सर्वांत प्रथम पुढे आले ते भाजपचे एक सक्रीय कार्यकर्ते भावेश जांबावलीकर. मानवी चाचण्यांसाठी ही लस टोचून घेण्यास लोकांनी ... Read More »