Daily Archives: July 31, 2020

.. क्रांतिकारकही!

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या घोषणेसरशी देशभरामध्ये त्यावर व्यापक विचारमंथन सुरू झाले आहे. स्वागत – विरोधाच्या प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत. कोणतीही नवी गोष्ट जेव्हा येत असते, तेव्हा तिच्याबाबत साशंकता असण्यात गैर काही नाही, परंतु यातून फारसे काही साध्य होणारच नाही असा निष्कर्ष काढून कोणी मोकळे होणे गैर आहे. या नव्या शैक्षणिक धोरणाचा गाभा कोणता हे आम्ही कालच्या अग्रलेखामध्येच सविस्तर स्पष्ट ... Read More »

राज्यात चोवीस तासांत ३ मृत्यू

>> एकूण बळी ४३ >> नवीन २१५ पॉझिटिव्ह >> सध्याची रुग्णसंख्या १६५७ राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन होण्याचे प्रकार सुरू असून बुधवारी चार जणांच्या मृत्यूनंतर गुरूवारी आणखी ३ जणांचे मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले असून कोविड मृतांची संख्या ४३ झाली आहे. तसेच, नवीन २१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या रुग्णांची संख्या १६५७ झाली असून राज्यातील एकूण कोरोना ... Read More »

जमीन रुपांतर शुल्कात १० टक्क्यांनी वाढ

राज्य सरकारने जमीन रूपांतर शुल्कात १० टक्के वाढ केली आहे. यासंबंधीची एक सूचना महसूल खात्याने सरकारी पत्रकाद्वारे काल जाहीर केली. घरासाठी जमीन रूपांतर एस १- ७० रुपयांवरून ८० रुपये केली आहे. तर, एस २- ५५ रुपयांवरून ६० रुपये, एस ३- ४५ रुपयांवरून ५० रुपये आणि एस ४ – ३५ रुपयांवरून ४० रुपये केली आहे. व्यावसायिक कामासाठी सी १ – ४०० ... Read More »

गृहआधारचे अर्ज आता ऑनलाइन ः राणे

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर महिला आणि बाल कल्याण खात्याच्या गृहआधार आणि लाडली लक्ष्मी या योजनांचे अर्ज पोर्टलवर लवकरच उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याणमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. महिला व बालकल्याण खात्याच्या विविध योजना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या गोवा ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री राणे बोलत होते. खात्याच्या स्वावलंबन व इतर योजनांचे अर्ज ऑनलाइन पोर्टलवर ... Read More »

दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद

म्यानमार सीमेनजिक असलेल्या मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून, यात सहा जवानही गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर बेछूट गोळीबार केला. यानंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. आसाम रायफल्सची तुकडी सीमेलगत असलेल्या खोंगटाळ येथील त्यांच्या ... Read More »

रामायणावर आधारित टपाल तिकिटाचे ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत अनावरण

पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत होणार्‍या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम भक्तांना पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत येऊन गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, यावेळी प्रकाशित करण्यात येणार्‍या पोस्टाचे तिकिटापैकी एक तिकीट हे राम मंदिराची प्रातिनिधिक ... Read More »

राज्यात आत्तापर्यंत ८८.४६ इंच पाऊस

राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्यास प्रारंभ झाला असून मागील चोवीस तासात १ इंच पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे सर्वाधिक ३.५१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८८.४६ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १६ टक्के जास्त आहे. चोवीस तासांत फोंडा येथे १.७३ इंच, सांगे येथे १.५३ इंच, पेडणे येथे १.२१ इंच पावसाची नोंंद झाली आहे. ... Read More »

नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शैक्षणिक मसुद्याचे स्वागत केले आहे. नवीन शिक्षण धोरण नवीन भारताच्या उभारणीसाठी मजबूत पाया घालू शकतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली आहे. जागतिकीकरणाच्या या युगात आपल्या तरुणांचा विकास करण्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून आम्ही ज्ञान आणि कौशल्य आधारित शिक्षण प्रणालीकडे वाटचाल करीत आहोत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे. ... Read More »

डावखुरा असल्याचा पंतला फायदा

ऋषभ पंत डावखुरा फलंदाज असल्यामुळेच टीम इंडियात संजू सॅमसनपेक्षा ऋषभला अधिक संधी दिली जाते, असे मत सॅमसनचे प्रशिक्षक बिजू जॉर्ज यांनी व्यक्त केले आहे. विश्‍वचषक नजरेसमोर भारतीय संघाची बांधणी सुरू आहे. एखाद्या संघात दर्जेदार डावखुरा फिरकीपटू, लेगस्पिनर किंवा डावखुरा जलदगती गोलंदाज असल्यास डाव्या हाताने फलंदाजी करणार्‍याला उजव्याच्या तुलनेच काहीशी मोकळीक मिळते. त्यामुळेच पंतला पसंती मिळत असावी, असे जॉर्ज म्हणाले. प्रतिस्पर्धी ... Read More »

आनंदची पराभवानेच सांगता

भारतीय ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या लिजंडस् ऑफ दी चेस स्पर्धेच्या नवव्या व शेवटच्या फेरीतही पराभव पत्करला. दीर्घकाळापासूनचा पारंपरिक प्रतिस्पर्धी वासिल इव्हानचुक याने आनंदला धूळ चारली. दहा खेळाडूंमध्ये आनंदला नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. पीटर लेको शेवटच्या स्थानी राहिला. चारही सामने बरोबरीत सुटल्यानंतर आर्मगेडोन टायब्रेकरचा वापर करावा लागला. टायब्रेकरवरदेखील निकाल लागू शकला नाही. त्यामुळे काळ्या मोहर्‍यांनिशी ... Read More »