Daily Archives: July 30, 2020

वैश्विक ज्ञानकेंद्राकडे

अजूनही कैक युगे मागे असलेल्या देशातील शिक्षण व्यवस्थेचा धागा एकविसाव्या शतकातील वर्तमानाशी जुळविण्याचा प्रयास करणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काल संध्याकाळी अखेर केंद्र सरकारने जाहीर केले. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व बाबतींमध्ये अनेक क्रांतिकारक निर्णय या धोरणाअंतर्गत घेण्यात आलेले आहेत, ज्यांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होऊ शकली तर त्याचे अनेक फायदे देशाला होऊ शकतात. या नव्या धोरणाचा, त्यातील बर्‍या वाईट गोष्टींचा दूरगामी परिणाम ... Read More »

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर

केंद्र सरकारकडून देशाचे नवे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काल एक बैठक झाली. या बैठकीत नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. तब्बल ३४ वर्षांनंतर शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, नव्या धोरणानुसार दहावी आणि बारावी बोर्डाचे महत्त्व कमी केले असून पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाणार आहे. काल नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ... Read More »

अखेर ‘राफेल’ भारतात दाखल

एकाच वेळी वेगवेगळी कामे करण्याची क्षमता असलेल्या राफेल विमानांच्या पाच विमानांचा पहिला ताफा काल बुधवारी भारतात दाखल झाला. पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरूपी तळ राहणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरून सोमवारी सकाळी उड्डाण केलेली ही विमाने संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर एक दिवस थांबून काल बुधवारी भारतात दाखल झाली. यातील ... Read More »

कोरोनामुळे राज्यात आणखी चार मृत्यू

>> बळींची संख्या ४०, नवे २०२ पॉझिटिव्ह राज्यात कोरोना विषाणूने आणखी चौघांचा बळी घेतला असून कोरोना बळीची संख्या ४० झाली आहे. राज्यात नवीन २०२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १६६६ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह १८९ रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये मडगाव येथील कोविड इस्पितळातून वास्को येथील एमपीटी कोविड केअर सेंटरमध्ये पाठविलेलण्यात आलेल्या सडा वास्को येथील ७१ ... Read More »

मच्छीमारांसाठी शनिवारपासून मार्गदर्शक सूचना जारी करणार

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमारी खात्याकडून राज्यात येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या मच्छीमारी हंगामासाठी खास मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी करण्यात येणार आहेत. मच्छीमारी ट्रॉलर्सनी पकडलेल्या मासळीपैकी १० टक्के मासळी स्थानिक पातळीवर विक्रीसाठी देण्याची अट घालण्यात येणार आहे, अशी माहिती मच्छीमारमंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन मंत्री रॉड्रीगीस यांनी मच्छीमारी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर विविध ... Read More »

राज्यात १ ऑगस्टनंतर जोरदार पावसाची शक्यता

राज्यात पावसाचे प्रमाण येत्या १ ऑगस्टनंतर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात मागील दहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचे कमी प्रमाण जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासात अर्धा इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८७.४४ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे ... Read More »

कोविड इस्पितळातील बहुतेक डॉक्टर, नर्सना बाधा : कामत

राज्यात कोविड स्थिती गंभीर बनली असून मडगाव येथील कोविड इस्पितळात सेवा देणार्‍या डॉक्टर व नर्सेसना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ लागला असल्याचे काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या परिस्थितीमुळे कोविड योद्धे असलेल्या डॉक्टर व नर्सेस तणावाखाली असल्याचे ते म्हणाले. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल मिळण्यास आता फारच उशीर होऊ लागलेला असून ती सर्वांत मोठी डोकेदुखी ... Read More »

शाळा, महाविद्यालये ३१ ऑगस्टपर्यंत बंद

>> कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक ३ साठी नवीन मार्गदर्शक सूचना काल जाहीर केल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे येत्या ३१ ऑगस्टपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. व्यायामशाळा, योग इन्स्टिट्यूट यांना ५ ऑगस्टपासून सुरू करण्यास मान्यता दिली जाणार आहे. रात्रीच्या वेळी फिरण्यावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. फक्त, कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. व्यायामशाळा, ... Read More »

इंग्लंड संघात बदल नाही

>> पाकविरुद्ध खेळणार ५ ऑगस्टपासून कसोटी मालिका इंग्लंडने नुकतीच झालेली वेस्ट इंडीजविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. आता ते पाकिस्तानविरुद्ध ५ ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळणार आहेत. मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने कोणताही बदल न करताना विंडीजविरुद्ध खेळविण्यात आलेला संघच कायम ठेवला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जैव-सुरक्षित वातावरणात बंदिस्त स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या ऐतिहासिक कसोटी कसोटी मालिकेत इंग्लंडला पहिल्या लढतीत विंडीजकडून ... Read More »

स्टुअर्ट ब्रॉड तिसर्‍या स्थानी

>> आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ८२३ गुण जमा आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या शेवटच्या दोन कसोटींत तब्बल १६ बळी घेत त्याने सात स्थानांची सुधारणा केली आहे. साऊथहॅम्पटन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत त्याला स्थान देण्यात आले नव्हते. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०४ गुणांसह पहिल्या ... Read More »