Daily Archives: July 29, 2020

राफेल येत आहेत!

देशाचे माजी संरक्षणमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी अत्यंत घासाघिशीच्या वाटाघाटींद्वारे देशाचा पैसा न् पैसा वाचविण्याचा ज्या व्यवहारात आटोकाट प्रयत्न केला, ती भारतीय हवाई दलाची शान ठरणार असलेली राफेल विमाने आज भारतात येत आहेत. तब्बल सात हजार मैलांवरून फ्रान्समधून ती भारतात यायला निघाली आहेत. वाटेत अबुधाबीत विसावली आहेत आणि आज ती पाच अत्याधुनिक लढाऊ विमाने भारतामध्ये दिमाखात उतरणार आहेत. राफेलचे आगमन ... Read More »

दहावीचा निकाल ९२.६९ टक्के

>> यंदाही मुलींची बाजी, ११८ विद्यालयांचा निकाल १०० टक्के गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मे-जून २०२० मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के लागला आहे. राज्यातील १८९३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १७५५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२७ तर मुलांची ९२.०८ टक्के एवढी आहे. राज्यातील ११८ विद्यालयाचा निकाल शंभर ... Read More »

अधिवेशन कामकाजाला विरोध हा बालिशपणा ः भाजपची टीका

डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सोमवारी झालेल्या गोवा विधानसभेच्या एक दिवशीय अधिवेशात २०२०-२१ या वर्षासाठीचे अंदाजपत्रक व अकरा महत्त्वाची सरकारी विधेयके संमत केली. मात्र अधिवेशनाच्या कामकाला विरोध करत विरोधकांनी बालिशपणाच दाखवल्याची टीका भाजपने केली तर अर्थसंकल्प मंजुरीबद्दल भाजपने सरकारचे अभिनंदन केले. यासंबंधी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना पक्षाचे पणजी मतदारसंघातील माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर म्हणाले की, जर ... Read More »

एक दिवशीय अधिवेशनास सहमती नव्हती ः कामत

सर्वपक्षीय बैठकीत एक दिवशीय अधिवेशन घेण्यास विरोधी आमदारांनी सहमती दर्शवली असेल तर सदर निर्णयासबंधी विरोधी आमदारांच्या सह्या असलेला सदर बैठकीचा इतिवृतांत जाहीर करावा. एक दिवसीय अधिवेशनाचे कामकाज कसे असावे ते मी सभागृह कामकाज समितीच्या बैठकीवेळी सादर केलेल्या पत्रात स्पष्ट केल्याचा दावा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आरोग्यमंत्र्यांसह कोविडवर चर्चा करण्याची तयारी दाखवायला हवी होती. मात्र सरकार ... Read More »

केंद्राकडून गोव्याला १०९३ कोटींचा निधी

केंद्र सरकारने वर्ष २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी जीएसटी नुकसान भरपाईपोटी गोवा राज्य सरकारला १०९३ कोटी रूपयांचा निधी हस्तांतरित केला आहे. केंद्र सरकारने देशात जीएसटी कायदा लागू केल्यानंतर राज्याना होणारे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ३१ राज्यांना १६५३०२ कोटी रूपयांच्या निधीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. या निधीमुळे राज्य सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळणार ... Read More »

आणखी एका कोविड इस्पितळाचा विचार ः मुख्यमंत्री

>> मडगाव जिल्हा इस्पितळ कोविड केंद्र करणार नाही दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळ कोविड केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार नाही. या इस्पितळात जुन्या हॉस्पिसियुतील सर्व विभाग हलविण्यासाठी प्रयत्न असून हे पूर्ण जिल्हा इस्पितळ बनविण्यात येईल. तसेच आणखी एक कोविड इस्पितळ बनविण्याचा विचार चालू असून वैद्यकीय महाविद्यालय व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ते बनविण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल त्यांनी ... Read More »

यजमान इंग्लंडचा मालिका विजय

>> तिसर्‍या कसोटीत विंडीजवर २६९ धावांनी मात यजमान इंग्लंडने तिसर्‍या व शेवटच्या कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा २६९ धावांनी पराभव करत तीन सामन्यांची ‘विस्डेन’ मालिका २-१ अशी जिंकली. विंडीजने पहिली कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने उर्वरित दोन्ही कसोटी एकतर्फी जिंकल्या. तिसर्‍या सामन्यात ६७ धावा देत १० गडी बाद केलेला स्टुअर्ट ब्रॉड सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. इंग्लंडने विजयासाठी ... Read More »

पाक संघात फवाद आलम परतला

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला २० सदस्यीय संघ जाहीर केला असून या संघात फलंदाज फवाद आलम याला स्थान देण्यात आले आहे. ‘अंतिम ११’मध्ये संधी मिळाल्यास तो तब्बल ११ वर्षांनंतर पाकिस्तानकडून कसोटी खेळेल. मुख्य प्रशिक्षक व निवड समिती प्रमुख मिसबाह उल हक यांनी इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, फखर झमान व हैदर अली यांना स्थान दिलेले नाही. फवाद याने २००९ साली ... Read More »