Daily Archives: July 28, 2020

शैक्षणिक नुकसान

राज्य विधानसभेचे एक दिवशीय अधिवेशन काल अभूतपूर्व परिस्थितीत आणि वादळी वातावरणात पार पडले. कोरोनासंदर्भातील राज्यातील परिस्थितीवर चर्चा घडवावी या मागणीसाठी विरोधकांनी आणलेला स्थगन प्रस्ताव सभापतींनी नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग करून राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मात्र, सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाला दोन विषयांवर रणकंदन माजले. एक होता काही दिवसांपूर्वी उजेडात आलेला मजूर मानधन घोटाळा आणि दुसरा विषय अर्थातच होता शिक्षणाच्या सध्याच्या खेळखंडोब्याचा. ... Read More »

खाल्लेले पचत नाही का?

 डॉ. मनाली म. पवार (सांतइनेज, पणजी) सामान्यतः घेतलेल्या आहाराचे सम्यक् पचन एका दिवसांत होते. परंतु आहार अतिमात्रेत घेतला असेल किंवा अवेळी, असात्म्य आहार घेतला तर पचनास अधिक कालावधी लागतो. २४ तासांपेक्षा अधिक काळाने पचते. त्यास दिनपाकी अजीर्ण म्हणतात. अशा अजीर्णामध्ये काही काही औषधोपचार न होता फक्त लंघन करावे किंवा उपाशी रहावे. खा-खा खातो, पी-पी पीतो! घरी असल्यावर खातो, बाहेर गेलो ... Read More »

उलटी होणे ः लक्षण की व्याधी?

 डॉ. सुरज स. पाटलेकर (श्री व्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) आयुर्वेदाप्रमाणे उलटीचे दोषानुसार व इतरही अनेक प्रकार आहेत. उलटीतून अन्नपदार्थ जर बाहेर पडत असतील तर अशा वेळेस उपवास करणे केव्हाही चांगले. अजीर्णावस्थेच्या कारणाने उलटीचा त्रास जर असेल आणि यामध्ये आहार जर घेतला गेला तर परिस्थिती अजूनच बिघडेल. छर्दी म्हणजेच वांती होणे म्हणजेच उलटी होणे हे फक्त लक्षण नसून व्याधीसुद्धा आहे. पोटातून (आमाशयातून) ... Read More »

योगसाधना – ४६८ अंतरंगयोग – ५३ प्रत्येकाने स्वतःचे रक्षण करावे

 डॉ. सीताकांत घाणेकर आहार-विहार-आचार-विचार… आचरणात आले तर प्रत्येक व्यक्ती चिंतेचा त्याग करून या वैश्‍विक संकटाला सामोरे जाण्यासाठी शूर योद्ध्यासारखी तयार होणार, अगदी कोरोना वॉरियर होऊ शकेल. योगसाधक आपल्या नियमित साधनेत यातील अनेक गोष्टी करतच असतील. आता इतरांना सांगूया, शिकवूया. आज विश्‍वाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोना संक्रमण वाढते आहे. भारतीय वैद्यकीय संस्थेच्या अहवालाप्रमाणे ९३ डॉक्टर्स कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना ... Read More »

‘व्हायरल हिपॅटायटीस’

 डॉ. हरीश पेशवे (गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट आणि हिपॅटॉलॉजिस्ट) यामध्ये लसीकरण प्रतिबंध करू शकते ज्याची कार्यक्षमता सुमारे ९५ टक्के आहे. हिपॅटायटीस‘बी’ विरुद्ध लसीकरण जीवनदान ठरू शकते. हिपॅटायटीस‘बी’च्या लसी स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. हिपॅटायटीस‘बी’च्या संसर्गामुळे कर्करोग होऊ शकतो; पण ही लस दीर्घकाळपर्यंत यकृत कर्करोग टाळण्यास मदत करू शकते. राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे ज्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामधील एक म्हणजे हिपॅटायटीस! यामध्ये व्हायरल ... Read More »

२५८ कोरोना रुग्णांचा राज्यात नवा उच्चांक

>> एकूण रुग्णसंख्या पाच हजार पार; आणखी एकाचा मृत्यू राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. नवीन २५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. मडगाव येथील कोविड इस्पितळात आणखी एका रुग्णाचे निधन झाल्याने कोरोना बळीची संख्या आता ३६ झाली आहे. राज्यातील कोरोना एकूण रुग्णांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला असून ऍक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १६७३ एवढी आहे. नवेवाडे वास्को येथील ... Read More »

विधानसभेत चर्चेविना अंदाजपत्रक संमत

>> विरोधकांचा गदारोळ, घोषणाबाजी कोणत्याही चर्चेशिवाय सरकारने २०२०-२१ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संमत करू नये तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विधानसभेत चर्चा करावी या दोन्ही मागण्या सभापती राजेश पाटणेकर यांनी अमान्य केल्यानंतर काल कॉंग्रेस, गोवा फॉरवड व मगो या विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला. विधानसभेत कोविडवर चर्चा घडवून आणावी या मागणीसाठी कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्ष आमदार रोहन खंवटे ... Read More »

विरोधकांचे राज्यपालांना निवेदन

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी कोविड चर्चेसंबंधीचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्याने नाराज बनलेल्या विरोधी गटातील नऊ आमदारांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. एकदिवसीय अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या कामकाजाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे. सरकारने योग्य चर्चा न करता सभागृहाच्या कामकाजाचे नियम स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा निवेदनात केला. सरकारने कोविडवर ... Read More »

शाळा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार ः शिक्षणमंत्री

राज्यातील बंद असलेल्या शाळा कधी सुरू करायच्या याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचनांनुसार त्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे काल शिक्षणमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. सुदिन ढवळीकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला राज्यातील विद्यालये कधी खुली होतील असे विचारले होते. त्यावर ते बोलत होते. रोहन खंवटे यांनी, राज्यातील बहुतेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असून त्यामुळे ऑनलाइन शिक्षण देण्यास ... Read More »

भविष्यात विधानसभेचे कामकाज ऑनलाईन ः सभापती पाटणेकर

विधानसभेचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत आगामी काळात गरज भासल्यास निर्णय घेतला जाऊ शकतो, असे प्रतिपादन सभापती राजेश पाटणेकर यांनी एक दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा समारोप करताना काल केले आहे. आमदार लुईझीन फालेरो यांनी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने अधिवेशनाची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती. परंतु, देशभरात विधानसभांचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने कुठेच घेण्यात न आल्याने निवेदनावर निर्णय घेतला नसल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. अधिवेशनात ... Read More »