Daily Archives: July 25, 2020

लोकशाहीचे धिंडवडे

राजस्थानमधील राजकीय रण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे. तेथील कॉंग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे झेंडे रोवल्यापासून तेथे उफाळलेला राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालय आणि राजभवनपर्यंत येऊन थडकला आहे. काल मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शंभर आमदारांनी राजस्थानच्या राजभवनवर जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने केली. राज्यपालांनी राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलवावे आणि लवकरात लवकर आपल्याला बहुमत सिद्ध करू द्यावे असा गहलोत ... Read More »

राज्यात १९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

>> कोविड व्यवस्थापनासाठी खाजगी इस्पितळांकडून अल्प प्रतिसाद : आरोग्य सचिव नीला मोहनन यांची माहिती राज्यात नवीन १९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळले असून ऍक्टीव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६४६ झाली आहे. तसेच, कोरोना पॉझिटिव्ह २१० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५४० झाली असून त्यातील २८६५ ... Read More »

पणजीत ११ रुग्ण सापडले

पणजी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी नवीन ११ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ४६ झाली आहे. रायबंदर, फोंडवे भागात ११ रुग्ण आढळले आहेत. मिरामार, सांतइनेज, मळा या भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. मळा भागातील २० जणांच्या स्वॅबची चाचणी काल करण्यात आली आहे. हळदोणा, कांदोळी परिसरात रुग्ण आढळून आले आहेत. हळदोणा येथे २ रुग्ण आढळले ... Read More »

आमदार अपात्र याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांविरुद्ध प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्य विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे अपात्रतेची जी याचिका दाखल केलेली आहे, त्यासंबंधीची सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयात झाली असता न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली. कालच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. प्रतिवादी आमदारांचे वकील रोहतगी यांनी यावेळी आमदारांना ई-मेल केलेल्या नोटीसा मिळू शकल्या ... Read More »

नवीन राजभवन उभारणार

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती राज्यात नवीन राजभवन बांधण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजभवन इमारतीच्या देखभाल बैठकीत बोलताना काल दिली. नवीन राजभवन बांधण्यासाठी जमीन निश्‍चित करणे, राजभवन संकुलाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्याची सूचना करण्यात आली असून नवीन राजभवनासाठी एप्रिल २०२१ पूर्वी निविदा जारी केली जाऊ शकते, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ... Read More »

नगरपालिकांसाठी १८ ऑक्टोबरला निवडणुका

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका १८ ऑक्टोबर रोजी घेण्याच्या गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला गोवा सरकारने मान्यता दिली आहे. राज्यातील ११ नगरपालिका मंडळांचा कार्यकाल येत्या १० नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्याच्या किमान १५ दिवसांपूर्वी या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. नगरपालिका मंडळांचा कार्यकाल संपण्याच्या १५ दिवस अगोदर निवडणुका घेणे बंधनकारक असल्याचे श्रीवास्तव ... Read More »

थिवी येथे युवकाला ट्रकने चिरडले

माडेल, थिवी येथील मार्गावर काल सकाळी साडेअकराच्या सुमारास एका स्कूटर चालकाचा चालत्या वाहनावरील ताबा सुटला. त्यावेळी त्याच्यामागून येणार्‍या ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडून आग्नेलो ऊर्फ फ्रान्सिस कामिलो डिसोझा (४५, माडेल, थिवी) हा युवक जागीच ठार झाला. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल पोळेकर करीत आहेत. Read More »

नवीन प्रादेशिक पक्ष काढण्याचा विचार

>> माजी आमदार किरण कांदोळकर : पक्षीय राजकारणाला कंटाळून निर्णय केंद्रीय पक्षाच्या राजकारणाला आपण विटलेलो असून आता एका प्रादेशिक पक्षाची स्थापना करण्याचा विचार असल्याचे काल भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले. मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यापासून त्यांच्या कुटुंबियांबरोबरचे संबंध दुरावल्यासारखे झाले होते आणि म्हणूनच आपण त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांची भेट घेतल्याचे त्यांनी ... Read More »

राजस्थानात राजभवनासमोर कॉंग्रेसची निदर्शने

राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट हा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. त्याला राज्यपालांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत सर्व आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले. कॉंग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शने सुरू केली. सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना दिलेल्या अपात्रता नोटीसीवर राजस्थान उच्च न्यायालय ... Read More »

भारताला ‘जंबो’ पथकाची गरज

>> माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांचे मत ऑस्ट्रेलियात १४ दिवस क्वॉरंटाइन सक्तीचे असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ऑस्ट्रेलियात ‘जंबो’ पथक पाठवावे लागणार आहे, असे निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी काल शुक्रवारी सांगितले. विलगीकरणाच्या नियमामुळे वेस्ट इंडीज व पाकिस्तान यांनी इंग्लंड दौर्‍यासाठी अधिक सदस्यांना पाठवले आहे. इंग्लंडमधील कोरोनासंबंधी शिष्टाचारामुळे पाकिस्तानचा संघ २९ सदस्यीय संघासह इंग्लंडमध्ये आहे तर ... Read More »