Daily Archives: July 24, 2020

पूर्णांशाने पालन व्हावे

केंद्र सरकारच्या निर्देशांबरहुकूम राज्य सरकारने लक्षणविरहित अथवा अतिशय सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना घरातच विलगीकरणाखाली राहण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. देशातील सध्याची एकूण परिस्थिती पाहिली, तर प्रचंड प्रमाणात होत असलेल्या कोरोना फैलावामुळे सरकारने कोरोनासंदर्भात निर्माण केलेल्या सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर्स उभारलेली असली, तरी ती दिवसागणिक वाढत्या रुग्णांसरशी भरू लागली आहेत. त्यात या सर्व रुग्णांच्या जेवणा-खाण्याचा ... Read More »

१७४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

>> कुठ्ठाळी, लोटली, चिंबलमध्ये रुग्ण वाढले राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण कायम असून नवीन १७४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळले आहेत. राज्यातील ऍक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १६६६ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित १४४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने २९ जणांचा बळी घेतला आहे. आत्तापर्यंत ४३५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यातील २६५५ रुग्ण बरे झाले आहेत. बांबोळी ... Read More »

दहावीचा २८ जुलै रोजी निकाल

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०२० मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या मंगळवारी २८ जुलै रोजी संध्याकाळी ४.३० वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी काल दिली. कोविड महामारीच्या काळात नियोजित एप्रिल महिन्यात परीक्षा घेणे शक्य झाले नाही. त्यानंतर दहावीची परीक्षा २१ मे ते ६ जून २०२० या काळात घेण्यात आली आहे. ... Read More »

गोव्यात पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शुक्रवार दि. २४ आणि शनिवार दि. २५ जुलै रोजी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली आहे. राज्याला १६ ते १९ जुलै या काळात जोरदार पावसाने झोडपून काढले होते. मागील चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. Read More »

खाणप्रश्‍नी १८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाणप्रश्‍नी एका याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली असून या याचिकेवरील पुढील सुनावणी १८ ऑगस्ट २०२० रोजी घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयात वेदांत या खाण कंपनीने खाणप्रश्‍नी एक याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर गेल्या १६ जुलैला सुनावणी निश्‍चित करण्यात आलेली होती. परंतु सदर याचिका सुनावणीच्या यादीतून वगळण्यात आली होती. सदर याचिकेवर गुरूवार दि. २३ जुलैला सुनावणी घेण्यात ... Read More »

आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर

पणजी मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेरात यांची प्रकृती बिघडल्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये त्यांना काल दाखल करण्यात आले. आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दरम्यान, आमदार मोन्सेरात यांची प्रकृती उच्च रक्तदाबामुळे बिघडल्याची माहिती इस्पितळातील सूत्रांनी दिली. आमदार मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कारण नाही, असे पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ... Read More »

विधानसभा अधिवेशनासाठी मार्गदर्शक सूचना जारी

गोवा विधानसभेच्या येत्या सोमवार दि. २७ जुलै २०२० रोजी होणार्‍या एकदिवसीय पावसाळी अधिवेशनासाठी कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर खास मार्गदर्शक सूचना काल जारी करण्यात आल्या आहेत. या अधिवेशनातील कामकाज पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या आवारात चार वैयक्तिक कर्मचारी सोबत नेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर मंत्र्यांना २ वैयक्तिक कर्मचारी आणि आमदारांना १ वैयक्तिक कर्मचारी सोबत नेण्यास मान्यता ... Read More »

आमदारांच्या अपात्रता याचिकेवर आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर शुक्रवार दि. २४ जुलैला सुनावणी होणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ७ ऑगस्टला सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, या अपात्रता याचिकेवर जलदगतीने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याने लवकर ... Read More »

सचिन पायलट यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर काल सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना अपात्र घोषित करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला ... Read More »

सरकारी महाविद्यालयांत हॉस्टेल्स उभारणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाच्या बैठकीमध्ये केंद्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानातून साखळी, खांडोळा, केपेच्या सरकारी महाविद्यालयासाठी हॉस्टेल्स बांधण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ईडीसी इमारतीतील जीएसआयडीच्या कार्यालयात घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये पीडित महिला आणि मुलांसाठी बांबोळी येथे वन स्टॉप सेंटर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंसेला बळी पडलेल्या महिलांना वैद्यकीय, कायद्याची ... Read More »