Daily Archives: July 23, 2020

बेभरवशाचे ऍप

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी ‘आरोग्यसेतू’ ऍप ज्यांना ‘सुरक्षित’ असल्याचा निर्वाळा देत असेल, त्यांनाच प्रवेश देण्याचे जे परिपत्रक काढले, त्याबाबत वाद निर्माण होताच मुख्यमंत्र्यांनी काल स्वतः त्यासंदर्भात स्पष्टीकरण केले. ज्यांच्याजवळ स्मार्टफोन आहेत, त्यांनाच हे परिपत्रक लागू असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने या वादाला जे राजकीय स्वरूप देण्याचे प्रयत्न चालवले होते, ते ... Read More »

लक्षणविरहित रुग्णांना घरीच क्वारंटाइन

>> केंद्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार राज्य सरकारचा प्रस्ताव सध्या तरी आणखी लॉकडाऊनचा विचार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना स्पष्ट केले. तसेच लक्षण विरहित रुग्णांना घरीच क्वारंटाइन करण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव असून केंद्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार तो अमलात आणला जाईल, असे ते म्हणाले. कोरोनाचा संसर्ग झालेल्या मात्र त्यासंबंधीची कोणतीही लक्षणे व दिसणार्‍या रुग्णांना होम क्वारंटाइन ... Read More »

राज्यात नवे १४९ पॉझिटिव्ह रुग्ण

>> तिघांचा मृत्यू : बळींची संख्या झाली २९ >> वास्कोत सर्वाधिक २८ रुग्ण सापडले राज्यात सलग दुसर्‍या दिवशी तिघांचा कोरोनाने बळी घेतला असून बळींची संख्या २९ झाली आहे. नवीन १४९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १६०७ झाली आहे. बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह ९२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतपर्यंत ४१७६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून आत्तापर्यंत २५४१ ... Read More »

चीनला वाणिज्य दुतावास बंद करण्याचे आदेश

अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दुतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली. अमेरिका व चीन यांच्यातील संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. चीन विरोधात टीका करणार्‍या ट्रम्प प्रशासनाने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. Read More »

गेहलोत यांचे पंतप्रधानांना पत्र

राजस्थानातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्षांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवले आहे. Read More »

सचिन पायलट समर्थकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

राजस्थानातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस आणखी चिघळत आहे. रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष जोशी यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी आव्हान याचिका दाखल करताच सचिन पायलट समर्थकांनीही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे राजस्थानातील राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालय यावर काय निकाल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. राजस्थानात कॉंग्रेसमध्ये राजकीय ... Read More »

अधिवेशनात सर्वच विषयांवर चर्चा अशक्य : सभापती

राज्य विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती राजेश पाटणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. येत्या २७ जुलैला होणार्‍या विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात समितीच्या सदस्यांनी संमती दिलेली विधेयके मांडून संमत केली जाणार आहेत. एक दिवसीय अधिवेशनात सर्वच विषयावर चर्चा होऊ शकत नाही, अशी माहिती सभापती पाटणेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. कामकाज सल्लागार समितीच्या (बीसीए) बैठकीत सर्व सदस्यांनी विविध विषय ... Read More »

‘एटीएम’बाबत माहिती देताय, तर सावधान!

>> फसवणुकीचे प्रकार : सायबर गुन्हा विभागाकडून सतर्कतेच्या सूचना गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने बँक एटीएम कार्ड धारकांच्या फसवणुकीच्या वाढत्या प्रकाराच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. बँकेच्या एटीएम कार्डधारकांना बँकेचे प्रतिनिधी, एजन्सीचे प्रतिनिधी असल्याशी बतावणी करून कार्डधारकांकडून पीन कोड घेऊन त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास केली जात आहे. अनोळखी व्यक्तीने दिलेल्या ..२१, ४०१ या सारख्या क्रमांकावर एटीएम कार्डधारकांनी ... Read More »

वर्ल्ड लीग्स फोरममध्ये आयएसएलला स्थान

इंडियन सुपर लीगला (आयएसएल) प्रतिष्ठित वर्ल्ड लीग्स फोरम (डब्ल्यूएलएफ) मध्ये स्थान मिळाले आहे. या फोरममध्ये स्थान मिळवणारी ‘आयएसएल’ ही दक्षिण आशियामधील पहिली व आशिया खंडातील सातवी लीग बनली आहे. या फोरममध्ये प्रीमियर लीग, ला लिगा आणि बुंडेस्लिगा यासारख्या जगातील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक फुटबॉल लीग स्पर्धांचा समावेश आहे. सध्या या फोरममध्ये जगभरातील जवळपास १२०० पेक्षा अधिक क्लबचे प्रतिनिधित्व करणारे पाच खंडांचे ... Read More »

आनंदची पराभवाने सुरुवात

माजी विश्‍वविजेत्या विश्‍वनाथन आनंद याला लिजंडस् ऑफ द चेस या १५०,००० यूएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ऑनलाइन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलर याच्याकडून १.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला. मॅग्सन कार्लसन टूरचा भाग असलेल्या या स्पर्धेत खेळण्याची आनंद याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या फेरीतील पहिले तिन्ही सामने बरोबरीत सुटल्यानंतर चौथ्या सामन्यात आनंदला पराभव स्वीकारावा लागला. आनंदने मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन ... Read More »