Daily Archives: July 22, 2020

संकटमोचकाची प्रतीक्षा

देशात असो वा गोव्यात असो, कोरोनाचा फैलाव आटोक्यात येताना दिसत नाही. देशामध्ये एकूण रुग्णसंख्या साडे अकरा लाखांवर जाऊन पोहोचली आहे आणि आतापर्यंत २८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गोव्यामध्ये एकूण रुग्णसंख्या कालपर्यंत ३८५३ पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत २५ बळी गेले आहेत. देशाचा विचार करता कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्क्यांवर गेले आहे, तर मृत्यूदर चार टक्के आहे. गोव्यामध्ये ... Read More »

कोरोनामुळे एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

>> राज्यात नवे १७४ पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी कोविडमुळे राज्यात तिघा रुग्णांचे निधन झाले. मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणार्‍या एका ६५ वर्षीय व्यक्तीचे काल सकाळी निधन झाले. मधुमेहाचा व उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या या रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याच्यावर कोविड इस्पितळातील अतिदक्षता विभागात उपचार चालू होते. काल त्याचे निधन झाले. त्यानंतर एक ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिला रुग्णाचे गोमेकॉतून कोविड इस्पितळात नेताना ... Read More »

वास्कोत वाहनांची वर्दळ

मुरगाव तालुक्यात चार दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरी काल दुसर्‍या दिवशीही वाहनांची वर्दळ दिसली. मंगळवारी वास्को पोलिसांनी कडक बंदोबस्त करून विविध ठिकाणी नाकाबंदी केली. प्रत्येक वाहन थांबवून त्याची चौकशी केली जात होती. तसेच काही ठिकाणी सकाळी व्यापार्‍यांनी दुकाने उघडली असता ती पोलिसांनी बंद करायला लावली. दाबोळी चिखली जंक्शनवर समोर विमानतळ मार्गावर पोलिसांनी कडक नाकाबंदी केली. लोक आपल्या कामावर जाण्यासाठी ... Read More »

‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या चाचणीसाठी २५ जणांचीच नोंदणी

कोविडसाठीच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लशीची मानवी चाचणी देशातील १२ इस्पितळांतून सुरू झालेली असतानाच गोव्यातील ज्या रेडकर इस्पितळात ही मानवी चाचणी घेतली जाणार आहे, तेथे १२४ जणांची गरज असताना आतापर्यंत अवघ्या २५ जणांनीच त्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली. या समाजोपयोगी कामासाठी सर्वांत प्रथम पुढे आले ते भाजपचे एक सक्रीय कार्यकर्ते भावेश जांबावलीकर. मानवी चाचण्यांसाठी ही लस टोचून घेण्यास लोकांनी ... Read More »

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे काल सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. टंडन यांच्यावर लखनौच्या गुलाला घाट येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. लालजी टंडन यांना गेल्या आठवड्यात लखनौच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे फुप्फुस, किडनी आणि लिव्हर व्यवस्थित ... Read More »

सचिन पायलट यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयाने २४ जुलैपर्यंत दिलासा देत सभापती सी. पी. जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. राजस्थानमध्ये राजकीय नाट्य सुरूच असून सध्या सचिन पायलट यांच्या गटाने विधानसभेचे सभापती सी. पी. जोशी यांनी बजावलेल्या नोटिसीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. Read More »

अमरनाथ यात्रा रद्द

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री अमरनाथ बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अमरनाथ यात्रा २१ जुलैपासून सुरु होणार होती. याआधी जूनमध्ये बोर्डाने बालटाल भागातून यात्रेचा मार्ग निश्चित केला होता. पण रस्ता पूर्णपणे तयार नसल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर २१ जुलैपासून यात्रा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत ... Read More »

आरोग्य सेतू ऍप’ असेल तरच कार्यालयात या!

>> दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांचे आदेश >> सर्वसामान्य लोकांमधून संताप दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी इमारतीत प्रवेश करण्यास लोकांना निर्बंध लादले आहेत. आरोग्य सेतू ऍप नसलेल्या लोकांना प्रवेश देऊ नका, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सुरक्षा रक्षकांना दिला आहे. त्यामुळे नागरिक व सर्वसामान्य लोकांनी या आदेशाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. दक्षिण गोवा जिल्हा इमारत संकुलात सर्व सरकारी कचेर्‍या आहेत. तलाठ्यांपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत नागरी पुरवठा खाते, ... Read More »

अष्टपैलूंत बेन स्टोक्स नंबर १

इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्स याने विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याला दुसर्‍या स्थानी ढकलत आयसीसी कसोटी अष्टपैलूंच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या विंडीजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पहिल्या डावात संयमी १७६ व दुसर्‍या डावात केवळ ५७ चेंडू ७८ धावा कुटलेल्याचे फळ त्याला मिळाले आहे. फलंदाजांच्या यादीत त्याने वैयक्तिक सर्वोत्तम तिसरे स्थान मिळविले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव ... Read More »

अमिरातीमध्ये होणार आयपीएल

>> केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा यंंदाची इंडियन प्रीमियर लीग टी-ट्वेंटी स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये होणार आहे आणि आम्ही भारत सरकारच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. आम्ही आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत पुढील कार्यवाही विषयी चर्चा करू, अशी माहिती समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. सोमवारी आयसीसीने टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत स्थगित केल्यावर सप्टेंबर-नोव्हेंबरच्या विंडोचा उपयोग करुन यावर्षी आयपीएलला ... Read More »