Daily Archives: July 21, 2020

प्रियोळचा आदर्श

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनिशी त्यांच्या व्यवस्थापनाचा फार मोठा पेच सरकारसमोर उभा असताना वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये ग्रामपंचायतीने स्वतःहून कोविड रुग्णांसाठी सुसज्ज सुविधा निर्माण करून जो आदर्श समोर ठेवला आहे, तो सर्वांसाठी अनुकरणीय ठरावा. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. मधु घोडकिरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियोळ पंचायतीने गावच्या कोविड रुग्णांसाठी पंचायत सभागृह तर उपलब्ध करून दिले आहेच, शिवाय तेथेच त्यांच्या देखभालीची सोयही आरोग्य ... Read More »

कोरोनाचे नवे १९६ रुग्ण

>> चिंबलमधील युवकाचा मृत्यू >> बळींची संख्या २३ राज्यात कोरोना विषाणूच्या २३ व्या बळीची नोंद काल झाली आहे. चिंबल – पणजी येथील एका २९ वर्षीय युवकाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये निधन झाले आहे. दरम्यान, नवीन १९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १४६९ झाली आहे. तर १४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. चिंबलमधील या कोरोना ... Read More »

मुरगावात सकाळी वर्दळ… सायंकाळी रस्ते निर्मनुष्य!

मुरगाव तालुक्यात २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र काल रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसत होती. दुपारी बारा वाजल्यापासून वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी भागातील रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात आढळली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सायंकाळी येथील रस्ते मात्र निर्मनुष्य दिसत होते. वास्को गोवा शिपयार्ड जवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. सडा, जेटी, बोगदा, एमपीटी कॉलनी परिसरातील नागरिकांनी टाळेबंदीला बर्‍यापैकी प्रतिसाद दिला. सायंकाळी रस्त्यावर ... Read More »

आमदारांची अपात्रता याचिका ः ७ ऑगस्टला सुनावणी

कॉंग्रेस पक्षातून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले दहा आमदार व मगोतून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले दोघे आमदार अशा बारा आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकेवर येत्या ७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेले दोघे आमदार बाबू आजगावकर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावस्कर यांच्याविरुद्धची मगो पक्षाची अपात्रता याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. त्यासंबंधीची सुनावणी काल ... Read More »

शिक्षण संचालक पदावरून वंदना राव यांची हकालपट्टी

सरकारने वादग्रस्त बनलेल्या शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव (आयएएस) यांची एका आदेशाद्वारे तडकाफडकी बदली काल केली असून वंदना राव यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी (१) नियुक्ती केली आहे. शिक्षण खात्याच्या संचालकपदाचा ताबा उपशिक्षण संचालक संतोष आमोणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. शिक्षण खात्याच्या संचालकपदी कार्यरत असलेल्या वंदना राव ह्या विविध निर्णयामुळे वादग्रस्त बनल्या होत्या. राज्यातील अनुदानीत विद्यालयातील कर्मचार्‍यांचा पगार शिक्षण ... Read More »

लॉकडाऊननंतर दैनंदिन व्यवहार सुरु

राज्यातील चार दिवशीय लॉकडाऊननंतर सोमवारपासून दैनंदिन व्यवहारांना पुन्हा सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची आस्थापने वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. राज्यातील बर्‍याच भागातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍या व्यावसायिकांनी सुध्दा आपला व्यवसाय बंद ठेवून लॉकडाऊनला पाठिंबा दिला. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी आवश्यक वस्तूंची आगाऊ खरेदी करून ठेवल्याने नागरिकांना घराबाहेर पडावे लागले नाही. Read More »

म्हापसा अर्बन : खातेदारांना दावे दाखल करण्यासाठी मुदत

म्हापसा अर्बन बँकेच्या लिक्वीडेटरनी बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांना दावे दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आरबीआयने म्हापसा अर्बन बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर खातेदार, ठेवीदारांचे दावे निकालात काढण्यासाठी लिक्विडेटर म्हणून दौलत हवालदार यांची नियुक्ती केली आहे. खातेदार, ठेवीदारांनी नजीकच्या शाखेत दावे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. बँकेत दावे सादर करताना कोविड नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. बँकेच्या ... Read More »

नववी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात

>> शिक्षण मंडळाकडून परिपत्रक जारी गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी ९ वी ते १२ वी पर्यंत अभ्यासक्रमात २८ ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी यासंबंधीचे एक परिपत्रक काल जारी केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षा डोळ्यासमोर ठेवून सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित ... Read More »

कोविड महामारी आणि अर्थव्यवस्था यावर कृती आराखडा तयार करा

>> दिगंबर कामत यांची राज्यपालांकडे मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल राज्यपाल सत्यपाल मलीक यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली व कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गोवा सरकारने कोणती पावले उचलायला हवीत त्यासंबंधीच्या आपल्या सूचना व उपाय योजनासंबंधीचे एक निवेदन त्यांना सादर केले. राज्य सरकारने कोरोनासंबंधी राज्यभरातील लोकांची चाचणी करण्याचे काम हाती घ्यावे. त्याचबरोबर कोविड महामारी व अर्थव्यवस्था यावर त्वरीत कृती ... Read More »

इंग्लंडने जिंकली दुसरी कसोटी

>> वेस्ट इंडीजचा ११३ धावांनी पराभव >> बेन स्टोक्सची अष्टपैलू चमक बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर यजमान इंग्लंडने दुसर्‍या कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडीजचा ११३ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. विजयासाठी इंग्लंडने ठेवलेल्या ३१२ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव ७०.१ षटकांत १९८ धावांत संपला. इंग्लंडकडून दुसर्‍या डावात ब्रॉडने सर्वाधिक ३ तर वोक्स, स्टोक्स व ... Read More »