Daily Archives: July 20, 2020

१०० टक्के लॉकडाऊन

राज्यातील तीन दिवसांच्या लॉकडाऊनला जनतेने मोठा प्रतिसाद दिला. शनिवार – रविवारची सुटी आणि जोडीला मुसळधार पाऊस याचाही अर्थातच त्यात मोठा वाटा होता, परंतु त्याच बरोबर कोरोनाच्या सध्याच्या थैमानाबद्दल जनतेच्या मनात असलेली भीतीही त्याला तितकीच कारणीभूत होती. गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत चाललेली आणि जवळजवळ दोनशेच्या उंबरठ्यावर झेपावणारी दैनंदिन नवी रुग्णसंख्या, गेल्या वीस – पंचवीस दिवसांत लागोपाठ ओढवलेले मृत्यू आणि एवढे ... Read More »

मुरगाव तालुक्यात २४ जुलै पर्यंत लॉकडाऊन

राज्य सरकारने मुरगाव तालुक्यातील लॉकडाऊन शुक्रवार २४ जुलै २०२० रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय काल घेतला आहे. तर, राज्यातील इतर भागातील लॉकडाऊन सोमवारी सकाळी ६ वाजता संपणार आहे. दरम्यान, राज्यात १० ऑगस्टपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ यावेळेत संचारबंदी कायम राहणार आहे. राज्य सरकारने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शुक्रवार १७ ते २० जुलै दरम्यान राज्यात लॉकडाऊन करण्याचा ... Read More »

राज्यात पावसाची संततधार सुरुच

राज्यात संततधार पाऊस सुरूच असून मागील चोवीस तासांत ३.४५ इंच पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण गोव्याला पावसाने झोडपून काढले असून काणकोण येथे ६.०८ इंच पावसाची नोंद झाली. राज्याच्या किनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात मागील ४८ तासांत ७ इंच पाऊस कोसळला आहे. मागील चोवीस तासात दाबोळी येथे ५ इंच, मुरगाव येथे ३.९८ इंच, केपे येथे ... Read More »

पणजीत इमारतीचा भाग कोसळला

>> आझाद मैदानाजवळील घटना; तिघांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश येथील आझाद मैदानाजवळील प्रकाश लॉज, प्रकाश कॅफे या इमारतीचा पुढील भाग पहाटे ३ च्या सुमारास कोसळला. इमारतीच्या कोसळलेल्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघा जणांना पणजी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे प्रकाश लॉजच्या इमारतीचा पुढील भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पहाटे तीनच्या ... Read More »

श्रीराम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला

अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरत असून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची या संदर्भात बैठक झाली. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांना रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासच्यावतीने पत्र देखील पाठवण्यात आले आहे. भूमिपूजन कधी करावयाचे हे मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून सूचित करण्यात येणार आहे. मूळ आराखड्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. Read More »

खाजगी एजन्सीतर्फे रुग्णांना सुविधा पुरविण्याचा विचार

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे राज्यातील कोविड सेंटरमध्ये कोविड बाधित रुग्णांना वेळेवर साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिक एजन्सीची नियुक्ती करण्यावर विचार विनिमय केला जात आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दर्जेदार जेवण व इतर विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्यातील कोविड केअर सेंटरना भेटी देऊन तेथील समस्या व इतर गोष्टीचा ... Read More »

बुमराहचा सामना करणे सर्वांत कठीण

>> ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने केले कौतुक भारताविरुद्ध केवळ एक कसोटी सामना खेळलेला ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने भारतीय वेगवान गोलंदाजीच्या फळीमधील जसप्रीत बुमराह याचा सामना करणे सर्वांत कठीण असल्याचे काल रविवारी सांगितले. भारतीय गोलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहून डिसेंबरमध्ये होणार्‍या मालिकेत खोर्‍याने धावा जमवण्याचा विश्‍वासही त्याने व्यक्त केला आहे. लाबुशेन याने २०१८-१९ साली भारताविरुद्धच्या मालिकेत सिडनी येथे झालेला ... Read More »

खुशदिल शाहला दुखापत

पाकिस्तानचा अष्टपैलू खुशदिल शाह याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे मुकावे लागणार आहे. शनिवारी नेटस्‌मध्ये सराव करताना खुशदिल याला ही दुखापत झाल्याचे पीसीबीने जाहीर केले. खुशदिल याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असला तरी पुढील आठवड्याच्या अखेरपर्यंत त्याला सराव सुरू करता येणार असल्याचे संघाचे फिजिशियन व फिजियोथेरपिस्ट यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेल्या आंतरसंघीय सामन्याचा तो ... Read More »

हरिकृष्णाने जिंकली ‘चेस ९६०’ स्पर्धा

भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णा याने ‘चेस९६०’ या स्वित्झर्लंडमधील ५३व्या बाईल चेस महोत्सवाचा भाग असलेली स्पर्धा काल ७ पैकी ५.५ गुण मिळवत जिंकली. हरिकृष्णा (इलो (२६९०) याने अपराजित कामगिरी केली. पोलंडच्या राडोस्लाव वोताझेक याचा अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या नोए स्टुडर याच्याकडून झालेला पराभव हरिकृष्णाच्या पथ्यावर पडला. जर्मनीचा १५ वर्षीय व्हिनेसेंट केयमार याने ५ गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला. ४.५ गुण घेतलेल्या वोताझेक याला ... Read More »

जंतर-मंतर

 मीना समुद्र शब्दातलं ‘जंतर-मंतर’ लक्षात आलं की लेखनातलं ‘तंतर’ (तंत्र) लक्षात आलंच म्हणून समजावं. सध्याच्या ‘मरगळलेल्या’ काळात आठवणींचा ‘तिळा उघडल्या’वर असे वरवर निरर्थक वाटणारे ‘कळीचे’ शब्द भोवती गोळा होतात आणि मनात स्मरण-रंजनाचा खेळ रंगतो. तिन्हीसांजेला काळोख दाटत आला तशी चिंटूची आई देवाजवळ सांजवात लावायला उठली. बाहेर अंगणात खेळणारे चिंटूचे सवंगडीही घरोघर पसार झाले तेव्हा आईची हाक ऐकून चिंटू धावत धावत ... Read More »