Daily Archives: July 15, 2020

बेफिकिरी भोवेल!

राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसागणिक नियंत्रणापलीकडे चालली आहे. गेले काही दिवस रोज सातत्याने आढळणारे शंभरहून अधिक रुग्ण, दिवसाला होणारे दोन – तीन मृत्यू, नवनव्या गावांमध्ये होत असलेला कोरोनाचा फैलाव आणि एवढे सगळे होऊनही सार्वजनिक जीवनामध्ये सर्रास दिसत असलेली बेशिस्त आणि बेफिकिरी ही अस्वस्थ करणारी बाब आहे. ही बेफिकिरी केवळ जनतेकडूनच दिसते आहे असे नव्हे, तर नेत्यांकडून आणि आरोग्य खाते, पोलीस, कदंब ... Read More »

चोवीस तासांत राज्यात तब्बल १७० पॉझिटिव्ह

>> आणखी एका रुग्णाचे निधन >> एकूण बळींची संख्या १८ राज्यात काल नवीन कोरोना पॉझिटिव्ह १७० रूग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाबाधित आणखी एका रूग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार चालू असताना निधन झाले असून कोरोना बळींची संख्या १८ झाली आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या निधनाच्या घटनेची नोंद झाली आहे. मुरगावात ५६२ पॉझिटिव्ह कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या चिखली ... Read More »

सचिन पायलटना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले

>> प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदही काढले अखेर कॉंग्रेस पक्षाने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांना हटवले आहे. तसेच त्यांचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदही काढून घेण्यात आले आहे. राजस्थानमध्ये पायलट यांनी गेहलोत सरकारविरोधात बंड केले होते. त्यामुळे कॉंग्रेसने हा निर्णय घेतला असल्याचे कॉंग्रेसचे नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांनी सांगितले. पायलट यांच्यासह त्यांच्या गोटात असणार्‍या दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, काल जयपूरच्या ... Read More »

खाणप्रश्‍नी न्यायालयाकडून न्याय मिळेल ः मुख्यमंत्री

>> दिल्लीत उद्या सुनावणी खाणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालय गोव्याला न्याय देईल असा विश्‍वास काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील बंद पडलेल्या खाणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू व्यवस्थितपणे मांडली आहे. त्यामुळे आम्हाला न्याय निश्‍चितपणे मिळेल, असे काल डॉ. सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खाणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या दि. १६ रोजी सुनावणी ... Read More »

सासष्टीत नवे १६ बाधित

सासष्टी तालुक्यातील आर्ले, घोगळ, कारगिल दवर्ली व कुंकळ्ळी येथे आणखी १६ कोरोनातबाधित सापडले असून कुंकळ्ळीत आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले की, घोगळ गृहनिर्माण वसाहत मोठी असून तेथे दाटीवाटीने घरे आहेत. तेथे कंटेनमेंट विभाग करून सर्वांची तपासणी करणे गरजेचे आहे. दवर्ली येथे एक बाधित सापडला या आधी तेथे तीन सापडले होते. कुंकळ्ळीत १२ बाधित कुंकळ्ळी ... Read More »

गोवा विद्यापीठाची ३ पासून अंतिम वर्षाची ऑनलाइन परीक्षा

कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर गोवा विद्यापीठाने येत्या ३ ऑगस्टपासून बीए, बीएससी, बीकॉम व इतर पदवी कार्यक्रमासाठी अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधीचे परिपत्रक गोवा विद्यापीठाचे निबंधक प्रा. वाय. व्ही. रेड्डी यांनी जारी केले आहे. युजीसीच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार पदवी अभ्यासक्रमासाठी अंतिम सत्रातील परीक्षा घेतली जात आहे. सर्व महाविद्यालयांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका असणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी १० ... Read More »

धर्मामुळेच अध्यक्षपदावरून हटवले

>> हॉकी इंडियाच्या मोहम्मद मुश्ताक अहमद यांचा क्रीडा मंत्रालयावर आरोप केवळ अल्पसंख्याक असल्यामुळेच हॉकी इंडिया अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास आपल्याला भाग पाडल्याचा आरोप मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी क्रीडा मंत्रालयावर काल मंगळवारी केला. सुधांशू मित्तल (अध्यक्ष, खो खो असोसिएशन), राजीव मेहता (अध्यक्ष, तलवारबाजी) व आनंदेश्‍वर पांडे (सरचिटणीस, हँडबॉल) यांच्यावर मात्र क्रीडा संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची खंत अहमद यांनी ... Read More »

होल्डरची दुसर्‍या स्थानी झेप

वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडीजच्या कोणत्याही गोलंदाजाला मागील २० वर्षांत शक्य न झालेले रँकिंग गुणदेखील होल्डर याने मिळविले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ४२ धावांत ६ बळींसह सामन्यात एकूण ७ बळी घेतले होते. कारकिर्दीतील सर्वोत्तम ८६२ रेटिंग गुणदेखील होल्डरने मिळविले आहेत. ऑगस्ट २००० मध्ये कर्टनी ... Read More »

हेमांग अमिन हंगामी सीईओ

हेमांग अमिन यांची बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावर हंगामी स्वरुपाची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त झाले होते. २०१७ सालापासून आयपीएलचे मुख्य परिचालन अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या अमिन यांच्या नियुक्तीची घोषणा काल मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली. २००९ व २०१४ या निवडणुक वर्षांत झालेल्या आयपीएल स्पर्धा पूर्ण किंवा काही प्रमाणात अन्यत्र हलवाव्या ... Read More »