Daily Archives: July 14, 2020

राजस्थानातले वादळ

राजस्थानच्या राजकारणामध्ये वादळी हवा वाहू लागली आहे. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी जे केले, त्याचीच पुनरावृत्ती करायला तेथील तरुण तुर्क नेते सचिन पायलट निघाले आहेत अशी चिन्हे दिसत आहेत. ज्योतिरादित्य काय किंवा सचिन पायलट काय, कॉंग्रेसमध्ये यापुढे भविष्य नाही हाच मूलभूत विचार या बंडाळीमागे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. खरे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान पक्षाने जिंकले – नव्हे ... Read More »

२४ तासांत कोरोनाचे आणखी ३ बळी

>> राज्यात एकूण १७ मृत्यू, नवीन १३० पॉझिटिव्ह राज्यात कोरोना विषाणूमुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना विषाणूमुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह तिघांचा मृत्यू झाला. मागील ७२ तासात कोरोना पॉझिटिव्ह ८ रुग्णांचा बळी गेला असून एकूण बळी १७ झाले आहेत. दरम्यान, राज्यात नवीन १३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल ... Read More »

राजस्थानमधील राजकीय पेच कायम

राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर तेथे पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक सेहलोत यांचे सरकार अल्पमतात आलेले आहे. तसेच पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा केलेला दावा पायलट यांनी फेटाळून लावत आपल्याला ३० आमदारांचे पाठबळ असल्याचे पायलट यांचे म्हणणे आहे. गेहलोत यांच्याकडे बहुमत एसल तर त्यांनी ... Read More »

आज, उद्या जोरदार पावसाची शक्यता

राज्यात काही भागात मंगळवार १४ आणि बुधवार १५ जुलैला जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली असून केसरी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत केपे येथे सर्वाधिक ३.४० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाची रिपरिप सुरूच असून राज्यभरात चोवीस तासात १.८५ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे २.७० इंच, सांगे येथे २.३० इंच, काणकोण येथे ... Read More »

पत्रपरिषदेसंदर्भात मानवी हक्क आयोगाची पोलिसांना नोटीस

सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला असलेल्या विरोधासंबंधी पत्रकारांना माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद बळाचा वापर करून बंद केल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन काल गोवा मानवी हक्क आयोगाने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून व वाळपईचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांना नोटिसा जारी केल्या आहेत. ३१ जुलैपर्यंत नोटिसीला उत्तर द्यावे असे त्यांना कळवण्यात आले आहे. दिव्यांग महिलेच्या बदलीप्रकरणी नोटीस ... Read More »

ब्रॉड इंग्लंड संघात परतेल

>> माजी गोलंदाज डॅरेन गॉफ याला विश्‍वास वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंड आपला प्रमुख वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याला संघात स्थान देईल, असा विश्‍वास इंग्लंडकडून ५८ कसोटी व १५९ सामने खेळलेला जलदगती गोलंदाज डॅरेन गॉफ याने व्यक्त केला आहे. मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामने १६ जुलै व २४ जुलैपासून मँचेस्टर येथे खेळविण्यात येतील. एजिस बाऊल साऊथहॅम्पटन येथे झालेल्या ... Read More »

विदेशींविना आय लीग शक्य ः दास

  विदेशी खेळाडूंविना आय लीग शक्य असल्याचे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास यांनी काल सोमवारी बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांनी आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले. २०२०-२१चा आय लीग मोसम वेळापत्रकानुसार खेळविण्याचे महासंघाचे मत असल्याचे ते म्हणाले. आय लीग स्पर्धा समितीचे चेअरमन सुब्रता दत्ता यांनी सहमती दर्शवली तर विदेशी खेळाडूंविना स्पर्धा होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय ... Read More »

वॉनकडून आर्चरचा बचाव

इंग्लंडच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दोषारोपांचे सत्र सुरू झाले आहे. यजमानांच्या या पराभवानंतर माजी कसोटीपटू मायकल वॉन याने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा बचाव केला आहे. वेगवान गोलंदाजांना सातत्याने ताशी ९० मैल वेगाने गोलंदाजी करणे कठीण असल्याचे सांगत वॉन याने आर्चरची बाजू घेतली आहे. विंडीजचा माजी जलदगती गोलंदाज टिनो बेस्ट याने मात्र आर्चरवर सडकून टीका केली आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ... Read More »

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम

 डॉ. मनाली म. पवार (सेंट इनेज, पणजी) दिवसाअखेरीस सतत मोबाइल/लॅपटॉपच्या अतिवापरानंतर मुले/मोठेसुद्धा चिडचिडे बनतात. कारण नसताना रागावतात. म्हणजेच या मोबाइलच्या अतिवापरामुळे नुसत्या डोळ्यांचेच आजार होतात असे नाही तर इतरही ताण-तणाव वाढून काही आजार बळावत आहेत. मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट इ. प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहे. कागद ते कॉम्प्युटरचा प्रवास हा इतका वेगवान घडला की कॉम्प्युटर आपल्या शरीर-मन-बुद्धीवर कधी आरूढ झाला ... Read More »

योगसाधना – ४६६ अंतरंग योग – ५१ स्वरक्षणार्थ करा योगसाधना

डॉ. सीताकांत घाणेकर मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरोना नाकपुड्यांतून शरीरात प्रवेश करतो. हा मास्क श्‍वास घेता यावा म्हणून नाकपुड्यांवर न ठेवता खाली ओठांवर ठेवला जातो. मग अशा मास्कचा फायदा काय? दक्षता घेतली नाही तर अत्यंत दुःखदायक घटना घडू शकतात. म्हणून तर प्रत्येक व्यक्तीने फार दक्षता घ्यायला हवी… स्वतःसाठी व इतरांसाठीही! पावसाळा सुरू झाला. कमी-जास्त प्रमाणात पण नियमित पाऊस ... Read More »