Daily Archives: July 13, 2020

वाढता फैलाव रोखा

सर्दी, तापासारखा क्षुल्लक ठरवून राज्य सरकार ज्या कोरोनाला निकालात काढायला निघाले होते, त्या कोरोनाने आता आपले खरे रूप दाखवायला सुरूवात केली आहे. गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये झालेले पाच मृत्यू राज्याच्या जनतेला हादरवून टाकण्यास पुरेसे आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा कोरोनाने एखाद्याचा बळी गेला, तेव्हा ती ‘को-मॉर्बिड’ म्हणजे इतर आजारयुक्त व्यक्ती असल्यानेच मृत्युमुखी पडल्याचे सांगून त्यावर पांघरूण टाकले जात होते. वयोवृद्धता हेही एक ... Read More »

राज्यात कोरोनाचे आणखी दोन बळी

>> एकूण बळींची संख्या १४, नवीन ८५ पॉझिटिव्ह रुग्ण राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले. मागील ४८ तासांत कोरोना पॉझिटिव्ह ५ जणांचा मृत्य्ू झाल्याने खळबळ उडाली असून राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह मृताची संख्या आता १४ झाली आहे. दरम्यान, काल राज्यात नवीन ८५ रूग्ण आढळून आले आहेत. मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार घेणार्‍या पाळोळे काणकोण ... Read More »

मुरगावात आणखी एकाचा मृत्यू

कोरोनामुळे काल रविवार दि. १२ रोजी मडगावच्या कोविड इस्पितळात दाबोळी चिखली येथील ८० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे मुरगाव तालुक्यातील कोरोनामुळे बळींची संख्या ८ झाली आहे. तर गोव्यात १४ कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. मडगाव इस्पितळात दाबोळी चिखली येथील त्या वृद्धेला पंधरा दिवसांपूर्वी ताप येत होता. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सर्वांना मडगाव इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील सदर ... Read More »

बसस्थानके, बसगाड्या सॅनिटायझ करणार ः राणे

राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन राज्यातील सर्व बसस्थानके व सार्वजनिक बस गाड्या सॅनिटायझ करण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. यासंबंधी आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. सॅनिटाईझेशन करण्याचे काम आऊटसोर्स करावे लागणार आहे. त्याबाबत आपण मुख्य सचिव व आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राणे पुढे ... Read More »

राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार संकटात

>> मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांत कलह, सचिन पायलट दिल्लीत राजस्थानमधील कॉंग्रेसचे सरकार सध्या संकटात सापडले असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. कॉंग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप घोडेबाजार करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. तर या प्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांना अटक करण्यात करण्यात आली. उपमुख्यमंत्री सचिन पायलट व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पोलिसांनी नोटीस बजावली ... Read More »

ऐश्‍वर्या, आराध्याचीही कोविड चाचणी पॉझिटिव्ह

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यासह आता ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चन यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. दरम्यान अभिषेक आणि अमिताभ यांना नानावटीमध्ये भरती करण्यात आले आहे. यात अमिताभ यांच्या घराजवळील संरक्षणही वाढवण्यात आले आहे. अमिताभ यांच्या जुहू येथील दोन्ही बंगल्याच्या बाहेर अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. अमिताभ हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर अनेक चाहते ... Read More »

राज्यात आत्तापर्यंत ६७ इंच पाऊस

राज्यात मागील चोवीस तासात राज्यात २.०१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ६६.९६ इंच पावसाची नोंद झाली असून पेडणे येथे सर्वाधिक ८२.०८ इंच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, राज्यात काही निवडक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. निवडक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. मागील चोवीस तासात म्हापसा आणि ... Read More »

विंडीजचा इंग्लंडला शॉक!

>> पहिली कसोटी ४ गड्यांनी जिंकली >> ब्लॅकवूडचे शतक थोडक्यात हुकले जर्मेन ब्लॅकवूड याच्या दमदार ९५ धावा व त्याने रॉस्टन चेज याच्यासह चौथ्या गड्यासाठी केलेल्या ७३ धावांच्या भागीदारीच्या बळावर वेस्ट इंडीजने इंग्लंडचा पहिल्या कसोटी सामन्यात चार गड्यांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजने विजयासाठीचे २०० धावांचे लक्ष्य ६४.४ षटकांत ६ गडी गमावून गाठले. ... Read More »

प्रो लीगद्वारे ऑलिंपिक तयारी ः रिड

हॉकी प्रो लीग स्पर्धेत जगातील आघाडीच्या देशांविरुद्ध खेळल्यास ऑलिंपिकची तयारी करता येईल, असे भारताच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांची सुरुवात होत असल्याने भारतासाठी ही नक्कीच सुखावह बाब आहे. अत्यंत चुरशीच्या प्रो लीग स्पर्धेत खेळून खेळाडूंना दबावाखाली खेळण्याचा अधिक सराव मिळेल, असे रिड यांना वाटते. भारताने या वर्षी हॉकी प्रो लीग स्पर्धेची झंझावाती सुरुवात केली होती. नेदरलँड्‌सविरुद्ध ... Read More »

डेन्लीकडे नाही योग्यता ः वॉन

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी नियमित कर्णधार ज्यो रुट संघात परतल्यानंतर ज्यो डेन्ली याला बाहेरचा रस्ता दाखवून झॅक क्रॉवली याला संघात ठेवावे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने काल रविवारी व्यक्त केले आहे. विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १८ व २९ धावा केल्या डेन्ली याला मागील आठ कसोटी डावांत अर्धशतकी वेस ओलांडता आलेली नाही. डेन्ली याचा केंट संघातील साथी क्रॉवली याने ... Read More »