Daily Archives: July 10, 2020

प्लाझ्मा थेरपीच्या मर्यादा

कोरोनाने बुधवारी गोव्यात १३६ नव्या रुग्णांचा उच्चांक प्रस्थापित केला. एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांची पातळी ओलांडली. आठ बळी गेले होतेच, काल पुन्हा आणखी एक बळी गेला. एकूणच कोरोनाच्या या राक्षसाला आवरायचे कसे हा पेच आज गोव्यासमोर उभा आहे. सरकारचे आधीच तोकडे असलेले हात कोरोनाला रोखण्यात दिवसेंदिवस अधिकच अपुरे पडू लागल्योचे दिसते आहे. एकीकडे वाढत्या रुग्णसंख्येनिशी उपचार सुविधांचा भासू लागलेला तुटवडा आणि ... Read More »

कोरोनाचे राज्यात पुन्हा शतक पार

>> नवे ११२ रुग्ण; ९ वा बळी राज्यात नवव्या कोरोना बळीची काल नोंद झाली असून नवीन ११२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मडकई, चिंबल, वास्को, मांगूर, शिरोडा, मडगाव, लोटली, मंडूर, कुंकळ्ळी, नेरूल, उसगाव आदी भागात नवीन रुग्ण आढळले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ८६९ झाली आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह ६६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची ... Read More »

रासई, कुंकळ्ळी, बाळ्ळीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण

काल गुरूवारी रासई, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत व बाळ्ळी येथे ३७ कोरोनाबाधित सापडले. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करणार्‍या दोन पॉझिटिव्ह कर्मचार्‍यांच्या कुटुंबीय व तेथील इतर कर्मचार्‍यांच्या लाळेची तपासणी केली असता एकंदर ७ जण पॉझिटिव्ह सापडले. बाळ्ळी येथे काल चारजण पॉझिटिव्ह सापडले. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातील दोघेजण वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करीत होते. त्या दोघांना व त्यांचा संपर्क आलेले ... Read More »

राज्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती

>> पेडणे, डिचोली, बार्देशमध्ये सतर्कतेचा इशारा राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. डिचोली तालुक्यातील बहुतेक नद्यांना पूर आल्यामुळे डिचोली तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. काणकोण तालुक्यातही मुसळधार पाऊस पडत असून तळपण नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शापोरा आणि तेरेखोल नदीच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे पेडणे तालुक्यात धोक्याचा इशारा देण्यात ... Read More »

जीसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

गोवा तांत्रिक शिक्षण संचालनालयाने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अशा तीन विषयांच्या घेतलेल्या गोवा सामान्य प्रवेश परीक्षा २०२० चा निकाल जाहीर केला आहे. अभियांत्रिकी आणि फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली होती. गौरव अवस्थी याने भौतिकशास्त्रात ७० आणि रसायनशास्त्र व गणित विषयात ७२ गुण घेऊन या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. निकालाची सविस्तर माहिती तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या ... Read More »

विनाअनुदानित विद्यालयांची शैक्षणिक शुल्क वाढ मागे

शिक्षण खात्याने विनाअनुदानित विद्यालयांची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीची शुल्क वाढ मागे घेतली आहे. या संबंधीचे परिपत्रक शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव यांनी काल जारी केले आहे. राज्यातील विनाअनुदानित विद्यालयाकडून स्वीकारण्यात येणार्‍या शैक्षणिक शुल्काबाबत अनेक पालकांनी शिक्षण खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पालकांना पूर्वसूचना न देता शुल्क वाढ करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांनी विनाअनुदानित विद्यालयांचे पदाधिकारी ... Read More »

आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी यूपीतील विकास दुबेला अटक

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी विकास दुबे याला अखेर काल पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक केली. दि. २ जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर विकास दुबे आणि त्याच्या सहकार्‍यांनी अंदाधुंद गोळीबार करत आठ पोलिसांची हत्त्या केली होती. तेव्हापासून विकास दुबे हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याच्यावर पाच लाखांचे बक्षिसही जाहीर केले ... Read More »

इंग्लंड संघात सात नवे चेहरे

>> आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा आयर्लंडविरुद्ध साऊथहॅम्पटन येथे होणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने २४ सदस्यीय संघ काल गुरुवारी जाहीर केला. ऑईन मॉर्गन याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत हे तीन सामने खेळेल. वेस्ट इंडीज व पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेसाठी केवळ एका आठवड्याचा कालावधी असल्याने ज्यो रुट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मार्क वूड, ख्रिस ... Read More »

पीसीबीच्या मदतीला आफ्रिदी धावला

राष्ट्रीय संघासाठी मुख्य पुरस्कर्ता मिळविण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट संघाचा संघर्ष सुरूच असताना शाहिद आफ्रिदी फाउंडेशन पीसीबीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. इंग्लंड दौर्‍यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या जर्सीवर शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनचा लोगो दिसणार आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्‍यावर तीन कसोटी व तीन टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. पीसीबी व पेप्सी या पुरस्कर्त्यांमध्ये बोलणी सुरू असून अजूनपर्यंत यातून निष्कर्ष निघू शकलेला नाही. पेप्सीने मागील ... Read More »

इंग्लंडचा २०४ धावांत खुर्दा

>> जेसन होल्डरचे ६ तर शेन्नन गॅब्रियलचे ४ बळी वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव ६७.३ षटकांत अवघ्या २०४ धावांत संपला. कर्णधार जेसन होल्डरने ४२ धावांत ६ व शेन्नन गॅब्रियलने ६२ धावांत ४ गडी बाद करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला त्यावेळी विंडीजने १९.३ षटकांत १ गडी गमावून ५७ ... Read More »