Daily Archives: July 8, 2020

नवे आकलन

कोरोनाचा धोका जगाला कळला त्याला आता सहा महिने उलटून गेले आहेत. एखादी गोष्ट जेवढी जुनी होते, तेवढी तिच्याविषयी अधिकाधिक माहिती आपल्याला कळत असते. कोरोनाच्या बाबतीतही तसेच झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संक्रमणाबाबत आजवर जे सांगितले आहे, त्याहून हे संक्रमण अधिक जटिल असल्याचे जगाला एव्हाना जाणवू लागले आहे. नुकतेच ३२ देशांतील २३९ वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेला खुले पत्र लिहून कोरोना ... Read More »

कोविड इस्पितळ पूर्ण भरले

>> सरकारची कबुली : पर्याय विचाराधीन मडगाव येथील कोविड-१९ इस्पितळातील सगळ्या २२० खाटा आता भरल्या असून या इस्पितळातील खाटा वाढवण्याबरोबरच गरज भासल्यास लवकरच उत्तर गोव्यातही एक कोविड-१९ इस्पितळ सुरू करण्यात येणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. कोविड इस्पितळ व व्यवस्थापन यासाठीचा सरकारचा प्लॅन बी तयार आहे. त्यामुळे कुणी घाबरून जायची गरज नाही, अशी माहितीही राणे ... Read More »

राज्यात कोरोनाचे नवे ९० रुग्ण

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून नव्याने आणखी ९० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे गोव्यासाठी चिंतेची बाब बनून राहिली आहे. मडगाव येथील कोविड – १९ इस्पितळातील २२० खाटा भरल्याने आता कोविड रुग्णांसाठी आणखी इस्पितळ उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता १९०३ वर पोहोचली असून सध्या राज्यात ... Read More »

फोंड्यात अग्निशमन जवानही पॉझिटिव्ह

फोंडा पोलिसांबरोबरच आता अग्निशमन दलाचेही जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळू लागले आहेत. कुंडई येथील अग्निशमन दलाचा एक जवान जो कुर्टी येथील रहिवासी आहे, तो पॉझिटिव्ह आहे. याशिवाय पणजी मुख्यालयातही पॉझिटिव्ह सापडू लागल्याने इतरांनी आपापली चाचणी करवून घेण्यास प्राधान्य दिले असून फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड निगा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, वाडी – तळावली येथील एकाच कुटुंबातील तिघा ... Read More »

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कारवाईचे राज्यपालांचे पत्र

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचे पुत्र रेमंड फिलीप फर्नांडिस यांनी अव्वल कारकून पदासाठी अर्ज करताना बनावट पदवी प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर एफ्‌आय्‌आर नोंद करण्यात यावी, यासाठी आयरिश रॉड्रिग्ज यांनी जी तक्रार नोंदवली आहे, त्यासंबंधी योग्य ती कारवाई केली जावी, अशी मागणी करणारे पत्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना लिहिले आहे. ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गेल्या आठवड्यात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना ... Read More »

‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी होणार

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षा (सीबीएसई) बोर्डाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी नववी ते १२ वी इयत्तेचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पर्यायाने जगात कोरोनाचा फैलाव जोरदार सुरू असून सीबीएसईला नववी ते १२ इयत्तेपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षण तज्ज्ञांकडून ... Read More »

सुभाष वेलिंगकर घेणार राजकीय संन्यास

गोवा सुरक्षा मंच पक्षाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी काल सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. ‘भारत माता की जय’ या आपल्या संघटनेच्या सूचनेवरून आपण सक्रीय राजकारणाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे ते पत्रकार परिषदेतून बोलताना म्हणाले. मात्र यापुढेही आपले बिगर राजकीय काम चालूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘भारत माता की जय’ ही गोवा सुरक्षा मंचची पालक संघटना असून ... Read More »

गोव्यात पुन्हा मुसळधार पाऊस

>> पणजीत झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली दोन दिवस उसंत घेतलेला पाऊस पुन्हा एकदा मुसळधार कोसळत असून ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे लोकांचे हाल झाले. पणजी येथील आंबेडकर उद्यानाजवळ एक भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ बंद होती. दरम्यान सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस बरसल्याने ठिकठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. सायंकाळी ५.३० पर्यंत गोव्यात २९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. कुडचडेतील, कामराळ येथे रेल्वे रुळावर ... Read More »

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आज पुनरागमन

>> इंग्लंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून पाहुणा वेस्ट इंडीज व यजमान इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून रोझ बॉल येथे जैव सुरक्षित वातावरणात खेळविला जाणार आहे. कोरोना विषाणूंमुळे तब्बल चार महिन्यांचा ब्रेक मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचे पुनरागमन या सामन्याद्वारे क्रिकेटच्या मायभूमीत होणार आहे. इंग्लंडचा संघ नियमित कर्णधार ज्यो रुट याच्याविना मैदानात उतरणार आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स त्याच्या अनुपस्थितीत ... Read More »

ऍथलेटिक प्रशिक्षक बहादूर सिंगना हटवले

भारताचे प्रमुख ऍथलेटिक प्रशिक्षक बहादूर सिंग यांची प्रशिक्षक म्हणून २५ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द संपुष्टात आली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वयाच्या बंधनाचे कारण देत त्यांचा करार वाढवला नाही. १९७८ व १९८२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बहादूर यांनी गोळाफेक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. ७४ वर्षीय बहादूर यांचा करार ३० जून रोजी संपला. क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकासाठीची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे ... Read More »