Daily Archives: July 6, 2020

प्रसार रोखणे महत्त्वाचे

क्रिकेटची धावसंख्या सांगावी तसे राज्याचे आरोग्य खाते गेले काही दिवस कोरोनाबाधितांचे मोठमोठे आकडे सांगते आहे. ९४, ९५, १०८ अशी बाधितांची ही दैनंदिन वाढती संख्या आणि बघता बघता लागोपाठ गेलेले सात बळी यामुळे गोमंतकीय जनता चिंतित आहे. या पार्श्वभूमीवर दहा – बारा दिवस गायब असलेल्या आरोग्य सचिव शनिवारी प्रकटल्या आणि रविवारी स्वतः मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला सामोरे गेले ही स्वागतार्ह बाब आहे. ... Read More »

कोविड केअर सेंटरांची क्षमता ५०० खाटांनी वाढवणार

>> मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या पोलिसांना हॉटेलांतून ठेवणार राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोविड केअर सेंटरची क्षमता आणखी ५०० खाटांनी वाढविली जाणार आहे. कोरोनाबाधित आणि कटेंनमेंट झोनमध्ये काम करणार्‍या पोलिसांची हॉटेलमध्ये निवासाची सोय केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५० ... Read More »

नगरसेवक डिसोझा यांचे कोरोनामुळे निधन

मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक पास्कोल डिसोझा (७२) यांचे शनिवारी मध्यरात्री मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले. संध्याकाळी वास्कोत सेंट ऍन्ड्र्यू चर्च दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू जुझे फिलिप डिसोझा व अन्य कुटुंबीय उपस्थित होते. Read More »

केपे, बाळ्ळीत ४ रुग्ण

केपे येथे नवीन २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या १४ झाली आहे. बाळ्ळी येथे आणखी २ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २३ झाली आहे. जुवारीनगर येथे आणखी १ रुग्ण आढळून आला असून रुग्णांची संख्या ९८ झाली. खारीवाडा येथे १ रुग्ण, न्यूववाडे येथे २ रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या ५९ झाली आहे. पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलाच्या ... Read More »

राज्यात नवे ७७ रुग्ण

>> पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१८वर राज्यात नवीन ७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. कुडचडे, थिवी येथे नवीन आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१८ झाली आहे. मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुरगाव नगरपालिकेच्या एका नगरसेवकांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह १११ रुग्ण काल बरे झाले ... Read More »

कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती : राणे

  राज्यातील कोरोना नियंत्रणाचे कार्य गतिमान करण्यासाठी नवीन आरोग्य कर्मचार्‍यांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली जाणार आहे. त्या कर्मचार्‍यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्रात नियुक्त केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. या आरोग्य कर्मचार्‍यांच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. राज्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या अन्नसेवेमध्ये सुसूत्रता आणण्यावर ... Read More »

पंतप्रधानांची राष्ट्रपतींशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांची माहिती दिली व त्यावर चर्चा केली. पंतप्रधान नुकतेच लडाख दौर्‍यावरून परतले आहेत. लडाख येथे जवानांची भेट घेऊन त्यांनी त्यांना धीर दिला. त्यांचे मनोबल वाढविले. सीमावादाच्या मुद्यावरून भारत व चीन दरम्यान सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तान सीमेवर घुसखोरी वाढली आहे. ... Read More »

राज्यात तीन दिवसांत १०.९८ इंच पाऊस

राज्याला मागील तीन दिवस झोडपून काढल्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. मागील चोवीस तासात साडे तीन इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, मागील तीन दिवसांत १०.९८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात २ जुलैपासून जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती. या दिवशी साडे चार इंच पावसाची नोंद झाली. ३ रोजी पावणे तीन इंच आणि ४ रोजी ३.४९ इंच पावसाची नोंद झाली ... Read More »

क्रिकेटपटू कुशल मेंडीसला अटक

>> कारखाली चिरडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू श्रीलंका क्रिकेट संघातील नियमित सदस्य असलेल्या कुशल मेंडीस याच्या कारखाली चिरडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ‘हिट अँड रन’ प्रकरणी कुशल मेंडीसला कोलंबो पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलीस प्रवक्ता एसएसपी जालिया सेनारत्ने यांनी मेंडीसच्या अटकेची पुष्टी केली आहे. कोलंबोपासून ३० किमी दूर असलेल्या पानादुरा शहरात आज सकाळी (रविवार) हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी २५ ... Read More »

बीसीसीआयची बैठक होणार १७ रोजी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची १७ जुलै रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत चीनमधील पुरस्कर्ते, टीम इंडियाचा सुधारित फ्युचर टूर प्रोग्राम व देशांतर्गत क्रिकेट मोसमाची सुरुवात या संबंधी निर्णय अपेक्षित आहेत. मंडळाची मागील बैठक ६ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने झाली होती. १७ रोजीच्या बैठकीत इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे चीनी प्रायोजक व्हिवो संबंधी चर्चा अपेक्षित आहे. प्रायोजकत्व रद्द करण्यासंबंधी निर्णय मात्र आयपीएल ... Read More »