Daily Archives: July 4, 2020

ताठ कण्याचा भारत

भारत आणि चीन दरम्यान गलवानमधील धुमश्चक्रीनंतर उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट लेहजवळच्या नीमू लष्करी तळावर जाऊन आपले नेतृत्व हे पिछाडीवरून नव्हे, तर आघाडीवरून लढणारे आहे हे जगाला दाखवून दिले आहे. लेह – लडाखमध्ये अत्यंत प्रतिकूल हवामानामध्ये आणि खडतर परिस्थितीमध्ये भारतीय सीमांच्या संरक्षणार्थ सदैव सिद्ध असणार्‍या आपल्या लष्करी जवानांचे मनोधैर्य प्रचंड उंचावणारी ही पंतप्रधानांची भेट आहे यात ... Read More »

राज्यात पुन्हा ९४ पॉझिटिव्ह

>> लागोपाठ दुसर्‍या दिवशीही कोरोनाचा कहर >> विद्यमान रुग्णसंख्या ८००; राज्यात आणखी दोन मृत्यू राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून नवीन ९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ८०० वर पोहोचली आहे. दक्षिण गोव्यातील बाळ्ळी येथे नवीन २१ रुग्ण आढळले आहे. करंजाळे, उसगाव, पेडणे, ताळगाव, नुवे, बेतकी, आगशी येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह ... Read More »

पावसाळी अधिवेशन केवळ एक दिवसाचे

>> सरकारसह विरोधी पक्षाची मान्यता सभापती राजेश पाटणेकर यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी केवळ एक दिवस घेण्यावर सर्वांनुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे हे अधिवेशन आता २७ जुलै रोजी एकच दिवस होणार आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला. बैठकीला हजर असलेले विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर, गोवा ... Read More »

कानपूरमध्ये गोळीबारात ८ पोलीस शहीद

उत्तर प्रदेशमधील कानपूरमद्ये पोलीस पथकावर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ८ पोलीस हुतात्मा झाले. विकास दुबे याच्याविरोधात गुन्हा दाखल असून त्याला पकडण्यासाठी हे पोलीस पथक गेले असता दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. यात डीएसपीसह ८ पोलीस शहद झाले. दरम्यान, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डीजीपींना दिले असून मुख्यमंत्र्यांनी घटनेचा अहवालही मागवला आहे. Read More »

पोलिसांच्या आरोग्याला प्राधान्य ः महासंचालक

राज्यातील पोलीस कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती नूतन पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. पोलीस महासंचालकपदाचा ताबा मुकेश कुमार मिना यांनी काल स्वीकारला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मीना यांनी सांगितले की, पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन ... Read More »

नीट, जेईई परीक्षा पुन्हा लांबणीवर

येत्या दि. १८ जुलैपासून सुरू होणार्‍या नीट आणि जेईई परीक्षा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. कोरोनामुळे यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान ... Read More »

विस्तारवादाचे युग संपले ः मोदी

>> लेह दौर्‍यात पंतप्रधानांचा चीनला इशारा जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश आरंभला आहे. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणार्‍या शक्ती पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. संपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटले असून भारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. संपूर्ण जगाने आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. ... Read More »

चित्रपट नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान (७२) यांचे गुरूवारी दुपारी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्या अनेक दिवसांपासून इस्पितळात उपचार घेत होत्या. दि. २० जून रोजी त्यांना गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले होते. याआधी त्यांची केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. सरोज खान यांनी २ हजारांहून अधिक गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘देवदास’मधील ‘डोला रे ... Read More »

चाचणीसाठी धारगळच्या रेडकर इस्पितळाची निवड

भारत बायोटेक आणि इंडियन कॉन्सील ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त सहकार्याने तयार केलेल्या कोविड १९ लसीच्या चाचणीसाठी ओशेलबाग धारगळ येथील रेडकर इस्पितळाची निवड करण्यात आली आहे. इस्पितळाचे डॉ. सागर रेडकर यांनी याबाबत सांगितले की, सर्व सोपस्कार कागदोपत्री झाल्यानंतर लस इस्पितळात उपलब्ध होणार आहे. हे इस्पितळ कोविड रुग्णांसाठी नाही. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांनुसारच निवडक इच्छुक स्वंयसेवकांना लस दिली जाईल अशी माहिती त्यांनी ... Read More »

बाबर करू शकतो ‘त्या’पेक्षाही चांगली कामगिरी ः इंझमाम

२०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पाकिस्तानच्या विद्यमान मर्यादित षट्‌कांच्या कर्णधाराने आतापर्यंत शानदार कामगिरी केलेली आहे. त्याची तुलना भारताचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहलीशी केली जात आहे. परंतु पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या मते बाबर अजूनही त्याने केलेल्या आतापर्यंतच्या कामगिरीपेक्षा आणखी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. बाबरने आतापर्यंत खेळलेल्या २६ कसोटी सामन्यांतून १८५०, ७४ वनडेतून ३३५९ तर ३८ टी -२० लढती खेळताना १४७१ ... Read More »