Daily Archives: July 1, 2020

बंदी ही संधी

चिनी कंपन्यांशी संबंधित असलेल्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घालून भारत सरकारने चीनला एका वेगळ्या – डिजिटल रणभूमीवर आव्हान दिले आहे. गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या वीस भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या घटनेनंतर दिली होती. आपल्या गेल्या रविवारच्या ‘मनकी बात’ मधूनही त्यांनी भारतीय नागरिकांना ‘आत्मनिर्भर भारत’ चे आवाहन करताना अप्रत्यक्षरीत्या चिनी कंपन्यांवर बहिष्कार घालावा ... Read More »

सासष्टीतील भाजप आमदाराला कोरोना

>> दोन पोलीस कर्मचारी बाधित >> साखळीत मायक्रो कंटेनमेंट झोन राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या कोरोनाची बाधा आता राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत पोहोचला आहे. काल सासष्टी तालुक्यातील एका भाजप आमदाराला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर आमदाराला मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यात नवीन ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल ... Read More »

अधिवेशनासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणार : सभापती

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर गोवा विधानसभेच्या येत्या २७ जुलैपासून सुरू होणार्‍या दहा दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे चालविण्यासाठी खास मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी केली जाणार आहे. विधानसभेच्या या अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या पावसाळी अधिवेशनात सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर्स आदी सूचनांचे पालनासाठी खास मार्गदर्शक सूचना जारी ... Read More »

५९ ऍप्सवर बंदीनंतर चीनकडून चिंता व्यक्त

केंद्र सरकारने भारतात ५९ चिनी ऍप्सवर बंदी आणल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, त्यांचा देश भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असल्याचे म्हटले आहे. याबाबतच्या परिस्थितीची पडताळणी चीनकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चिनी ऍप्सवर बंदी घातल्याच्या भारताच्या निर्णयावर चीनकडून ही पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. वापरकर्त्यांची माहिती चोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी ... Read More »

अनलॉक २.०ची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारने गृह मंत्रालयाने अनलॉक २ साठीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवारी जारी केली आहे. तथापि, गोवा सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. नवीन मार्गदर्शक तत्त्वावर विचारविनिमय सुरू असून लवकरच जारी केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यालय, महाविद्यालये ३१ जुलै २०२० पर्यत बंद राहणार आहेत. थिएटर, व्यायामशाळा, ... Read More »

गरिबांच्या मोफत अन्न योजनेत नोव्हेंबरपर्यंत वाढ ः पंतप्रधान

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटींहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे दिले जाणार आहेत. काल मंगळवारी देशवासीयांना व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी वरील घोषणा केली. यावेळी पंतप्रधानांनी, केंद्र सरकार ... Read More »

जून महिन्यात ४० इंच पावसाची नोंद

राज्यात मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली असून जून महिन्यात साधारण ४० इंच पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत मोसमी पावसाचे सरासरी प्रमाण १८ टक्के जास्त आहे. दरम्यान, पेडण्यात मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक (५०.७५ इंच) पूर्ण केले आहे. राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे आगमन चार- पाच दिवस उशिराने झाले. या महिन्यात ११ ते २० जून या काळात जोरदार पाऊस पडल्याने पावसाचे सरासरी प्रमाण ... Read More »

अर्जुन पुरस्कारासाठी ब्रिज खेळाडूंची शिफारस

>> वर्धन – सरकार जोडीचे नाव पाठवले क्रीडा मंत्रालयाकडे भारतीय ब्रिज महासंघाने प्रणव वर्धन व शिवनाथ सरकार यांची काल मंगळवारी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धेत या दुकलीने सुवर्णपदक मिळवले होते. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले हे पहिलेच ब्रिज खेळाडू आहेत. यापूर्वी पुरस्कारांसाठीच्या यादीत ब्रिज या खेळाचा समावेश नव्हता. ‘बीएफआय’ने दोन्ही खेळाडूंची नावे क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली आहेत. ... Read More »

झिंबाब्वेचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर

ऑस्ट्रेलिया व झिंबाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका दोन्ही मंडळांनी सहमतीने पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. तीन सामन्यांच्या मालिका ऑगस्ट महिन्यात होणार होती. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात एकूण कोरोनाची ७५०० प्रकरणे झाली असून ७ हजारांहून जास्त लोकांनी यावर मात केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १०४ झाली आहे. मालिकेचे अल्प स्वरूप, ऑगस्ट ... Read More »