Daily Archives: June 29, 2020

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

 डॉ. सोमनाथ कोमरपंत सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती निसर्गाकडूनच माणसाला लाभलेल्या आहेत. हे जैविक नाते अभेद्य आहे. त्यामुळे निसर्गाशी समतानता साधून सुष्ट प्रवृत्तींचे उन्नयन करणे आणि दुष्ट प्रवृत्तींचे दमन करणे माणसाच्या अधीन आहे. माणूस संस्कृतिप्रिय असल्यामुळे त्याला ते शक्य आहे. भवतालाचा ताल, तोल आणि लय सांभाळायला वृक्ष कशी मदत करतात हे अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही. वैज्ञानिकांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. लेखक-कवींनी वृक्षवेलींचा ... Read More »

दुखरं सुख

 पौर्णिमा केरकर मला तर पार नदीच्या काठावर स्थित असलेली ती वास्तू साहित्यिक-सांस्कृतिक स्पंदनांच्या अनुभूतीची संवेदना देते. पार नदी साक्षीला आहे तुमच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी… ते तरंग घेऊन तिचा प्रवास चालू आहे. धो-धो पाऊस कोसळत होता… हवेत गारवा भरून राहिलेला… या गारव्याचा गारठा सर्वांगावर शहारे उमटवत होता. अंग झिम्माड ओलेचिंब… गुरांच्या गळ्यातील घंटानाद… दुदिन सड्यावरील त्या छोट्या टेकडीआड हळूहळू अस्ताला चाललेला ... Read More »

आषाढ-योग

 मीना समुद्र निसर्गाचे मानवीकरण आणि ते करताना मानवी भावनांचे आरोपण यामुळे ‘मेघदूत’ हे सौंदर्य, प्रासादिकता, उदारमनस्कता, कल्पकता, अति हळुवार संवेदनशीलता, जीवनसत्ये यांमुळे ‘अति हळुवारपण चित्ता आणोनिया’ वाचण्याचे, काव्यानंदात आकंठ डुंबण्याचे आनंदनिधान आहे एवढे मात्र खरे! माणसाच्या एकूणच जीवनात योग आणि आषाढ या दोन्ही गोष्टींचे अतिशय महत्त्व. आणि योगायोगानं यंदा दोन्ही दिवस एकमेकांना जोडून किंवा एकमेकापाठोपाठ आले. २१ जून हा आंतरराष्ट्रीय ... Read More »

गावरान गोष्टी

– दत्ताराम प्रभू-साळगावकर …अशा गोष्टींच्या जोरावरच अजूनही गावात गावपण टिकून आहे; लाल मातीचा तो गुणच आहे. शहरी जीवनाच्या धकाधकीनं वैतागलेलं मन शांत व सुंदर गावात, रम्य वातावरणात निश्‍चितच रमेल! ‘जिथं-तिथं भेटेल, अवघा आनंदी-आनंद!’ ‘खरा भारतदेश खेडेगावात राहतो’ असं कोणीतरी म्हटलेलं ऐकलं आहे. हे उद्गार तंतोतंत खरे आहेत. आता खेडीपाडी बरीचशी सुधारली आहेत, लोकांचं राहणीमान काहीसं उंचावलं आहे. साधनसुविधा खेड्यापर्यंत पोहोचत ... Read More »

गोव्यातील नागरी सहकारी बँका व नागरी पतसंस्था

–  प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना एक लाख कोटी रुपयांचे भांडवल पुरवले आहे. गोवा सरकारने भारत सरकारकडे १५० कोटी रुपये सहकारी नागरी बँकांसाठी मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत. एखाद्या परिवारातील नागरिकांनी स्वखुशीने एकत्र येऊन स्वतःच्या आणि इतरांच्या सामूहिक सेवेसाठी स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय! ज्यांना सहकारी संस्थेची सेवा हवी असेल तर त्यांनी संस्थेचा सभासद ... Read More »

पदार्पणातील शतकवीर

– सुधाकर नाईक कसोटी पदार्पणात तब्ब्ल पंधरा फलंदाजांनी तीन अंकी जादुई आकडा पार करण्याची मर्दुमकी गाजविली पण यातील सात भारतीय दिग्गजांना मात्र कसोटी पदार्पणातील शतकानंतर कारकिर्दीत पुन्हा तीन अंकी जादुई आकडा पार करण्यात यश आले नाही. भारतीय क्रिकेटचा इतिहास अत्यंत रोमांचक असून अनेक भारतीय दिग्गजांनी आपल्या अजोड कामगिरीने तो संस्मरणीय बनविला आहे. कसोटी पदार्पणात शतक हा उमद्या क्रिकेटपटूंच्या कारकिर्दीतील सर्वोच्च ... Read More »