Daily Archives: June 29, 2020

अप्रत्यक्ष संदेश

  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या ‘मनकी बात’ मध्ये चीनचे नाव न घेताही त्याच्या सध्याच्या विस्तारवादी प्रयत्नांच्या संदर्भात सूचक इशारा दिला आहे. भारताकडे वक्रदृष्टी करून पाहणार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल हे त्यांनी आपल्या या रेडिओ संदेशातून सूचित केले आहे. विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा भारत आपल्या सार्वभौमत्वावर प्रहार झाल्यास गप्प बसणार नाही. तो प्रखर प्रत्युत्तर देईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत ... Read More »

राज्यात नवीन ७० कोरोनाबाधित

>> जुवारीनगरमध्ये नवे २४ तर राज्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ११९८ राज्यात काल नवीन ७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१७ झाली आहे. दरम्यान, ५८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ११९८ वर पोहोचली असून त्यातील ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत कोरोना ... Read More »

लाचप्रकरणी आणखी एका पंचाला अटक

दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने हॉटेल व्यावसायिकाकडून लाचप्रकरणी हणजूण कायसूव पंचायतीच्या आणखी एका पंच सदस्याला काल अटक केली असून सुरेंद्र गोवेकर असे अटक केलेल्या पंच सदस्यांचे नाव आहे. एसीबीने या प्रकरणी हणजूण पंचायतीचे पंच सदस्य हनु’ंत गोवेकर याला शनिवारी अटक केली आहे. दरम्यान, दोघाही पंच सदस्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने काल दिला. या प्रकरणातील सहभागी आणखी एक पंच ... Read More »

मैत्रीसोबतच चोख प्रत्युत्तर देणेही जाणतो

>> पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’मध्ये चीनला इशारा आकाशवाणीच्या माध्यमातून काल दुपारी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना भारत-चीन वादासह कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक, मान्सून अशा विविध बाबींवर भाष्य केले. भारत-चीन वादाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये चीनला भारताने एकदम चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. आपल्या देशाकडे डोळे वटारून पाहणार्‍यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे ... Read More »

कोविड नियमांची राज्यात पायमल्ली

>> सामाजिक अंतराचे बाजार, बसमध्ये तीनतेरा राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना सामाजिक अंतर, मास्क या सारख्या कोविड नियमांची पायमल्ली वाढत चालली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तथापि, रविवारी म्हापसा येथे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ... Read More »

इंधन दरवाढीविरोधात आज कॉंग्रेसचे धरणे

  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने डिझेल व पेट्रोलच्या दरात सतत वाढ करण्याचे जे धोरण अवलंबिले आहे त्याच्या निषेधार्थ कॉँग्रेस पक्षाने आज सोमवार दि. २९ जून रोजी उत्तर व दक्षिण गोव्यात दोन तासांच्या धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दक्षिण गोव्यात मडगाव जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर तर उत्तर गोव्यात म्हापशातील उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सकाळी १० ते १२ या दरम्यान धरणे धरण्यात येणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस ... Read More »

महिलांच्या क्रिकेटशी छेडछाड करू नका

>> शिखा पांडेचे आयसीसीला आवाहन महिलांचे क्रिकेट अधिक रंगतदार करण्यासाठी लहान आकाराचा चेंडू व कमी लांबीच्या खेळपट्टीची आवश्यकता नसल्याचे टीम इंडियाची प्रमुख मध्यमगती गोलंदाज शिखा पांडे हिने सांगितले. अनावश्यक बदल न करण्याचे आवाहनही तिने आयसीसीला केले. सोफी डिव्हाईन व भारताची फलंदाज जेमिमा रॉड्रिगीस यांचा समावेश असलेल्या आयसीसी वेबिनारपूर्वी शिखाने अनेक ट्विट्‌स करत आपले मत मांडले. शिखा ही झुलन गोस्वामी हिच्यानंतर ... Read More »

धोनीच्या नेतृत्व शैलीत झाले आमूलाग्र बदल

  टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आपल्या प्रारंभीच्या नेतृत्वकाळात (२००७) गोलंदाजांवर नियंत्रित ठेवणे आवडायचे. पण, २०१३ सालापर्यंत त्याने आपल्या शैलीत बदल करून गोलंदाजांवर विश्‍वास ठेवायला सुरुवात केली. त्याचे नेतृत्व परिपक्व बनले, असे भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज इरफान पठाण याने काल रविवारी सांगितले. स्टार स्पोर्टस्‌च्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात धोनीच्या नेतृत्वशैलीत झालेल्या बदलाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना तो बोलत ... Read More »

चीनची आर्थिक नाकेबंदी आपल्याला परवडेल?

 शशांक मो. गुळगुळे चीनची आर्थिक नाकेबंदी करायचा निर्णय झालाच तर सुरुवातीस थोडा त्रास होईल, पण आपली आर्थिक अवस्था कोलमडणार नाही. आपले वित्तीय धोरण तसे मजबूत आहे. पण याबाबतचे निर्णय घिसाडघाईने घेता येणार नाहीत. नियोजन करून टप्प्याटप्प्याने घ्यावे लागतील. पण या निर्णयाचा चीनला बसणार्‍या फटक्यापेक्षा आपल्याला जास्त फटका बसणार हा मुद्दा विसरता कामा नये. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर पाच वेळा ... Read More »

नेपाळच्या राष्ट्रवादाला भारत द्वेषाचा ज्वर

– दत्ता भि. नाईक शेजारी देशांना युद्धाची खुमखुमी आहे व भारतीय जनता व सरकारलाही शांततेची भूक आहे अशी जी प्रतिमा आहे ती बदलण्याची आता वेळ आलेली आहे असेच म्हणावे लागेल. नेपाळच्या राष्ट्रवादाला भारतद्वेषाचा ज्वर चढलेला आहे हे मात्र खरे! नेपाळने उत्तराखंडमधील लिम्पियाधुरा, लिपुलेख व कालापानी या प्रदेशांचा अंतर्भाव असलेले देशाचे मानचित्र प्रसिद्धीस दिल्याचे आतापर्यंतचे वृत्त होते. त्यामुळे ही एक राजकीय ... Read More »