Daily Archives: June 27, 2020

सामाजिक संक्रमणाची कबुली

राज्यातील कोरोना काही आटोक्यात येताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस तो नवनव्या गावांमध्ये फैलावत चालला आहे. सालसेतमध्ये त्याचे तांडव हळूहळू सुरू झाले आहे आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दूरदूरच्या गावांमध्ये देखील दर दिवशी तो अचानकपणे प्रकटू लागला आहे. गेल्या काही दिवसांत नवनव्या गावांमध्ये हे संसर्गाचा कोणताही आगापिछा नसलेले रुग्ण वाढू लागताच दैनंदिन पत्रकार परिषदा घेणार्‍या आरोग्य सचिव एकाएकी गेले काही दिवस ... Read More »

राज्यात कोरोनाचे सामाजिक संक्रमण

>> मुख्यमंत्र्यांची कबुली : एकूण रुग्ण हजार पार राज्यात कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव झाल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. राज्यातील सर्वच तालुक्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना फैलावाचे मूळ मांगूर हिल आहे. कोरोना पॉझिटिव्ह एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. मास्क, सॅनिटायझर्स, सामाजिक अंतर राखण्याची नितांत गरज आहे. मार्केटमध्ये ... Read More »

बारावीचा निकाल ८९.२७ टक्के

>> वाणिज्य शाखेचा सर्वाधिक ९२.८२ टक्के निकाल >> एकूण १५३३९ उत्तीर्ण गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी इयत्तेचा निकाल ८९.२७ टक्के एवढा लागल्याची माहिती काल मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना दिली. कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शाखेत मिळून एकूण १७१८३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १५३३९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. वाणिज्य ... Read More »

दहावीचा निकाल १० ते १५ जुलै दरम्यान

दहावी इयत्तेच्या परीक्षेची पेपर तपासणी अजून चालू असून दहावी इयत्तेचा निकाल येत्या महिन्याच्या १० ते १५ तारखेच्या दरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती काल गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी दिली. यंदा कोरोना आपत्तीमुळे परीक्षा खूपच विलंबाने झाल्या. त्यामुळे पेपर तपासणीचे काम अजून चालू असल्याचे ते म्हणाले. हे काम पूर्ण होऊन निकाल तयार करावा लागणार असून त्यामुळे तो जुलै ... Read More »

पोलीस महासंचालकपदी मुकेश कुमार मिना

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी मुकेश कुमार मिना यांची नियुक्ती काल करण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक प्रनब नंदा यांच्या गेल्या नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या निधनानंतर महासंचालकपद गेले कित्य्ेक महिने रिक्त होते. मुकेश कुमार मिना यांनी दिल्ली येथे एसीबीचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. Read More »

‘संजीवनी’ला ऊर्जितावस्था आणण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा

>> मंत्री गोविंद गावडे : उच्चस्तरीय बैठकीनंतर निर्णय राज्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, भागधारक व इतर संबंधितांना विश्वासात घेऊन साखर कारखान्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे काल ठरविण्यात आले आहे. सरकारने संजीवनी साखर कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. साखर कारखाना जुनाट झालेला असल्याने नूतनीकरणासाठी विविध पर्यायावर विचार ... Read More »

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील युुसुफ मेमनचा मृत्यू

१९९३ साली झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि फरार असलेल्या टायगर मेमनचा भाऊ युसुफ मेमनचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील कारागृहात युसूफ मेमनचा मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकले नाही, अशी माहिती कारागृह प्रशासनाने दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळे येथे पाठवण्यात आला. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे. युसुफ मेमनला २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात त्याला ... Read More »

टीकेआरकडून खेळू शकतो तांबे

>> बीसीसीआयच्या ‘ना हरकत’ दाखल्याची आवश्यकता मुंबईचा ४८ वर्षीय लेगस्पिन गोलंदाज प्रवीण तांबे कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. तांबे राजस्थान रॉयल्स या आयपीएलमधील फ्रेंचायझीकडून २०१३ ते २०१५ या कालावधीत खेळला होता. ‘टीकेआर’ने मला स्पर्धेत खेळण्याविषयी विचारले असून अधिकृत त्यांच्याशी अजून करार झालेला नसल्याचे तांबे याने सांगितले. टीकेआरकडून खेळण्यासाठी तांबे याला सर्वप्रथम निवृत्ती जाहीर करावी लागणार ... Read More »

फेड कप फायनल्स होणार पुढील वर्षी

  नवीन स्वरुपातील फेड कप फायनल्स स्पर्धेचे पहिले सत्र पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) काल शुक्रवारी जाहीर केले. १२ देशांचा समावेश असलेली ही स्पर्धा एप्रिल महिन्यात बुडापेस्ट येथे होणार होती. परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व टेनिस कोर्टस् बंद करण्यात आल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. पुढील वर्षी १३ ते १८ एप्रिल या कालावधीत हंगेरीच्या राजधानीतील लाझलो पाप ... Read More »

हैदराबादमध्ये बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर

>> तेलंगण सरकारची परवानगी आवश्यक तेलंगण राज्य सरकारने परवानगी दिल्यास भारतीय बॅडमिंटन असोसिएशने १ जुलैपासून हैदराबाद येथे खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सरावासाठीचे नियम काहीसे शिथिल केल्यानंतर देशातील काही मोजक्या बॅडमिंटनपटूंनी बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये मागील आठवड्यात सुरुवात केली आहे. हैदराबादस्थित आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना मात्र अजून कोर्टवर उतरता आलेले नाही. ‘हैदराबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस ... Read More »