Daily Archives: June 26, 2020

संजीवनी मिळेल?

संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मृत्युघंटा वाजू लागली आहे. प्रशासकांनी ऊस उत्पादकांच्या बैठकीत सरकारने हा कारखाना कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूतोवाच केले, परंतु ऊस उत्पादकांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र असंतोषामुळे राज्य सरकारने काही तासांतच घूमजाव करून कारखाना कायमचा बंद करण्याचा विचार नसल्याचे गुळमुळीत स्पष्टीकरण दिले. पण हा कारखाना चालू ठेवणे सोपे नाही. तो नफ्यात आणणे तर त्याहून कठीण आहे. ‘संजीवनी’चे ... Read More »

गोव्यात कोरोनाचे रुग्ण हजाराच्या उंबरठ्यावर

>> सर्व तालुक्यांत सामाजिक संक्रमणाचा धोका राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत असून कोरोनाच्या सामाजिक संक्रमणाचा धोका वाढला आहे. राज्यात गुरूवारी नवीन ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मागील दहा दिवसांत राज्यभरात ४०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९९५ वर पोहोचली आहे. ... Read More »

चित्रीकरणास नियमावलीचे पालन करून मान्यता

राज्यात चित्रपट व इतर प्रकारच्या चित्रीकरणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या कोविड मार्गदर्शक सूचना आणि नियमावलीचे पालन करून चित्रपट व इतर प्रकारचे चित्रीकरण केले जाऊ शकते, असे गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतीजा यांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. कोविड महामारीच्या काळात राज्यात चित्रपट व इतर प्रकारच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. आता, राज्य ... Read More »

बारावीचा निकाल आज

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार २६ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता जाहीर केला जाणार आहे. बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर वेबसाईटवर तो उपलब्ध केला जाणार आहे. ७ जुलै पासून गुणपत्रिका विद्यालयात उपलब्ध करण्यात येणार आहेत. ही परीक्षा राज्यातील १७ केंद्रांतून घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण १८,१२१ विद्यार्थी बसले आहेत. Read More »

गुंडगिरी करणार्‍यांवर कडक कारवाई

>> मुख्यमंत्री : पोलीस मुख्यालयात अधिकार्‍यांशी संवाद राज्यात गुंडगिरी, टोळीयुद्ध खपवून घेतली जाणार नाहीत. गुंडगिरी करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस अधिकार्‍यांशी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. पोलीस मुख्यालयात पोलीस महानिरीक्षक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. ... Read More »

‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक क्षेत्राची घडी विस्कळीत झाली असून आता सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आयसीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द केली आहे. केंद्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे. १ ते १५ जुलै दरम्यान या परीक्षा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, या परीक्षा रद्द ... Read More »

ज्येष्ठ गायक शरद जांभेकर यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायक शरद जांभेकर यांचे काल लिलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना लिलावतीत दाखल करण्यात आले होते. अनेक संगीत नाटकांत त्यांनी काम केले. त्यांचे संगीत ‘सौभद्र’ नाटकातील राधाधर मधु मिलिंद हे नाट्यगीत विशेष गाजले. ते मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते. Read More »

‘संजीवनी’बाबत सरकारकडून दिशाभूल

>> सुदिन ढवळीकर यांचा आरोप राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. संजीवनी सहकारी साखर कारखाना कायमचा बंद करण्याचा डाव चालला आहे आणि त्यामुळेच सरकारकडून लपवाछपवी केली जात आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला. मडकई येथील पाणी समस्येची पाहणी करण्यासाठी सुदिन ढवळीकर आल्यानंतर ‘संजीवनी’ कारखान्याबाबत विचारले असता ढवळीकर म्हणाले, कारखान्याचे ... Read More »

राज्यात ४०० युवा शेतकरी तयार करणार

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : कृषी संपर्क सेवा योजनेचा शुभारंभ राज्यात नवीन ४०० युवा शेतकरी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी केवळ कार्यालयातील कामकाजात गुंतून न राहता शेतकर्‍यांमध्ये मिळून मिसळून युवा शेतकरी तयार करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले. टोक, पणजी येथे कृषी खात्याच्या ई. कृषी संपर्क ... Read More »

एमसीसी अध्यक्षपदी क्लेअर कोनोर

>> क्लबच्या २३३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेची निवड मेरिलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसी या क्रिकेटमधील नियम बनवणार्‍या आणि त्याचा प्रचार प्रसार करणार्‍या संस्थेने आपल्या २३३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिला खेळाडूची क्लबच्या अध्यक्षपदी निवड करत ‘पुरुषी’ परंपरा मोडून काढली आहे. इंग्लंडची माजी खेळाडू आणि कर्णधार क्लेअर कोनोर हिची मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) ... Read More »